Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  1 Samuel 30 >> 

1आणि असे झाले की दावीद व त्याची माणसे तिसऱ्या दिवशी सिकलागास आली तेव्हा अमालेकी यांनी दक्षिण प्रदेशावर व सिकलागावर घाला घातला होता आणि त्यांनी सिकलाग हाणून अग्नीने जाळले होते.

2आणि त्यांतल्या स्त्रिया व त्यात जे लहान मोठे होते त्या सर्वांना त्यांनी धरून नेले होते; त्यांनी कोणालाही जिवे मारले नव्हते पण त्यांना घेऊन आपल्या वाटेने गेले.

3तर दावीद व त्याची माणसे गावाजवळ आलीं तेव्हा पाहा ते अग्नीने जाळले. आहे आणि त्यांच्या बायका आणि त्यांचे मुलगे व त्यांच्या मुली धरून नेलेल्या आहेत असे त्यांनी पाहिले.

4तेव्हा दावीद व त्याच्याजवळचे लोक हेल काढून इतके रडले की आणखी रडायला त्यांना शक्ती राहिली नाही.

5आणि दावीदाच्या दोघी बायका अहीनवाम इज्रेलीन व पूर्वी नाबाल कर्मेली याची बायको होती ती अबीगईल ह्या धरून नेलेल्या होत्या.

6तेव्हा दावीद मोठ्या संकटात पडला कारण त्याला धोंडमार करावा असे लोक बोलू लागले; कारण सर्व माणसांचे जीव आपल्या मुलांसाठी व आपल्या मुलींसाठी दु:खित झाले होते; परंतु दावीदाने यहोवा आपला देव याच्याकडून आपणाला सशक्त केले.

7मग दावीद अहीमलेखाचा मुलगा अब्याथार याजक याला म्हणाला एफोद माझ्याकडे आण. मग अब्याथाराने एफोद दावीदाकडे आणले.

8आणि दावीदाने देवाला विचारले तो म्हणाला जर मी या सैन्याच्या पाठीस लागलो तर मी त्यांना आटोपीन काय? आणि त्याने त्याला उत्तर दिले की पाठीस लाग कारण खचित तू त्यांना आटोपशील व सर्वांना सोडवून घेशील.

9मग दावीद व त्याच्याकडील सहाशे पुरुष घेऊन बसोर नदीजवळ पोहचले. जे मागे ठेवले होते ते तेथे राहिले.

10तेव्हा दावीद व चारशे माणसे शत्रूच्या पाठीस लागली कारण दोनशे माणसे तेथे थांबली; ती इतकी थकली होती की त्यांच्याने बसोर नदीच्या पलिकडे जाववेना.

11आणि रानांत एक मिसरी त्यांना आढळला तेव्हा त्यांनी. त्याला दावीदाकडे आणले. मग त्यांनी त्याला भाकर दिली आणि ती त्याने खाल्ली व त्यांनी त्याला पाणी पाजले.

12मग त्यांनी अंजिराच्या ढेपेचा तुकडा व द्राक्षाचे दोन घड त्याला दिले मग त्याने खाल्ल्यावर त्याच्या जिवात जीव आला कारण तीन दिवस व तीन रात्री त्याने भाकर खाल्ली नव्हती पाणीही तो पिला नव्हता.

13तेव्हा दावीद त्याला म्हणाला तू कोणाचा? कोठला आहेस? त्याने म्हटले मी मिसरी तरुण एका अमालेकी माणसाचा चाकर आहे: तीन दिवसामागे मी दुखण्यात पडलो म्हणून माझ्या धन्याने मला सोडले.

14आम्ही करेथी यांच्या दक्षिण प्रदेशावर व यहूदाच्या प्रांतावर व कालेबाच्या दक्षिण प्रदेशावर घाला घातला आणि सिकलाग आम्ही अग्नीने जाळले.

15मग दावीद त्याला म्हणाला तू मला या टोळीकडे खाली नेशील काय? त्याने म्हंटले तू मला जिवे मारणार नाहीस व माझ्या धन्याच्या हाती मला देणार नाहीस अशी देवाची शपथ माझ्याशी वाहा म्हणजे मी तुला या टोळीकडे खाली नेईन.

16आणि त्याने त्यांना खाली नेले तेव्हां पाहा ते लोक अवघ्या भूमीवर पसरून खात व पीत व नाचत होते कारण त्यांनी पलिष्याच्या देशातून व यहूद्याच्या देशांतून पुष्कळ लूट घेतली होती.

17आणि दावीद पहाटेपासून दुसऱ्या दिवसाच्या संध्याकाळपर्यत त्यांना मारीत गेला; आणि त्यांच्यातील चारशे तरुण माणसे उंटावर बसून पळाली त्यांच्याशिवाय त्यांच्यातला कोणीएक सुटला नाही.

18आणि जे सर्व अमालेक्यांनी नेले होते ते दावीदाने सोडवले व आपल्या दोघी बायका सोडवल्या.

19आणि लहान किंवा मोठा किंवा मुलगे किंवा मुली किंवा लूट किंवा जे सर्व त्यांनी नेले होतें त्यातले काहीच त्यांना उणे पडले नाही; दावीदाने सर्व माघारी आणले.

20आणि अवघी मेंढरे व गुरे दावीदाने घेतली; ती त्यांनी इतर सामानापुढे हाकून म्हटले ही दावीदाची लूट आहे.

21मग जी दोनशे माणसे थकल्यामुळे दावीदाच्या मागे गेली नाहीत ज्याना त्याने बसोर नदीपाशी ठेवले होते त्यांच्याकडे दावीद आला तेव्हां ती दावीदाला भेटायला व त्यांच्याबरोबरच्या लोकांना भेटायला निघाली आणि दावीदाने त्या माणसांजवळ येऊन त्यांना कुशलप्रश्न केला.

22तेव्हा जी माणसे दावीदाबरोबर गेली होती त्यांच्यापैकी जी वाईट व दुष्ट होती ती सर्व असे म्हणू लागली की ही माणसे आम्हाबरोबर आली नाहीत म्हणून जी लूट आम्ही सोडवली तिच्यातले काही आम्ही त्यांना देणार नाही; प्रत्येकाला ज्याची त्याची बायकापोरे मात्र देऊ; मग त्यांनी ती घेईन निघून जावें.

23तेव्हा दावीद म्हणाला माझ्या भावांनो जे देवाने दिले आम्हांला दिले आहे त्याचे असे करू नका कारण त्याने आम्हाला संभाळले व जी टोळी आम्हावर आली ती आमच्या हाती दिली.

24या गोष्टीविषयी तुमचे कोण ऐकेल? जो लढाईत गेला त्याचा जसा वाटा तसा जो सामानाजवळ राहतो त्याचा वाटा होईल; त्यांना सारखाच वाटा मिळेल.

25आणि त्या दिवसापासून पुढें तसे झाले; त्याने तसा नियम व रीत इस्त्राएलात आजपर्यंत करून ठेवली.

26आणि दावीद सिकलागास आला तेव्हा त्याने यहूदाच्या वडिलांकडे आपल्या मित्रांकडे लुटीतले काही पाठवून सांगितले की पाहा देवाच्या शत्रूंच्या लुटीतून तुम्हास ही भेट आहे.

27जे बेथेलात होते त्यांना जे दक्षिण प्रदेशातील रामोथात होते त्यांना व जे यतीरात होते त्यांना

28आणि जे अरोएरात होते त्यांना व जे सिफमोथात होते त्यांना व जे एष्टमोत होते त्यांना

29आणि जे राखासांत होते त्यांना व जे येरहमेली यांच्या नगरांत होते त्ना वजे केनी यांच्या नगरांत होते त्यांना

30आणि जे हर्मात होते त्यांना व जे कोरशानात होते त्यांना व जे अथाखात होते त्यांना

31आणि जे हेब्रोनात होते त्यांना जेथे दावीद व त्याची माणसे फिरत असत त्या सर्व ठिकाणाकडे त्याने लुटीतले काही पाठवले.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  1 Samuel 30 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran