Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  1 Samuel 29 >> 

1मग पलिष्ट्यांनी आपली सर्व सैन्ये अफेक येथे एकत्र जमवली आणि इस्त्राएली माणसांनी इज्रेलात एका झऱ्याजवळ छावणी दिली.

2आणि पलिष्ट्यांचे सरदार आपापल्या शंभरासोबत व हजांरासोबत पुढे चालले आणि त्यांच्या पिछाडीस दावीद व त्याची माणसे आखीशाबरोबर चालली.

3तेव्हां पलिष्ट्यांचे सरदार बोलले हे इब्री येथे काय करतात? मग आखीश पलिष्ट्यांच्या सरदाराना म्हणाला इस्त्राएलाचा राजा शौल याचा चाकर दावीद तो हाच आहे की नाही? तो माझ्याजवळ काही दिवस किंवा काही वर्षे राहिला आहे आणि तो माझ्याकडे आला त्या दिवसापासून आजपर्यत त्याच्याकडे मला काही अपराध सापडला नाही.

4मग पलिष्ट्यांचे सरदार त्याच्यावर फार रागावले; आणि पलिष्य्ट्यांचे सरदार त्याला म्हणाले जे ठिकाण तू या माणसाला नेमून दिले येथे त्याच्या ठिकाणी त्याने जावे म्हणून त्याला परत जाण्यास लाव; त्याने आमच्याबरोबर लढाईला येऊ नये; तो आला तर कदाचित तो लढाईत आमचा विरोधी होईल; कारण हा आपल्या प्रभूशी कशाने समेट करील बरे? या मनुष्याच्या शिरांनी की नाही?

5शौलाने हजाराना मारले व दावीदाने दहा हजारांना मारले असे ते नाचत व गात ज्याच्याविषयी एकमेकांना म्हणाले तो हाच दावीद आहे की नाही?

6मग आखीशाने दावीदाला बोलानून त्याला म्हटले यहोवा देव जिवंत आहे; तू सरळपणाने वागला आहेस व माझ्याबरोबर सैन्यात तुझे बाहेर निघून जाणे व तुझे आत जेणे माझ्या दृष्टीने बरे आहे आणि तू माझ्याजवळ आला त्या दिवसापासून आजपर्यत तुझ्याठायी काहीं वाईट मला सापडले नाही तथापि तू सरदारांच्या मनास येत नाहीस.

7तर तू पलिष्याच्या सरदारांना असंतूष्ट करू मये म्हणून आता शांतीने निघून परत जा.

8तेव्हा दावीद आखीशाला म्हणाला मी आपला धनी राजा याच्या शत्रूशी लढायला येऊ नये असे मी काय केले आहे? आणि मी तुझ्यापुढे आलो त्यादिवसापासून आज पर्यंत तुला आपल्या दासाच्याठायी काय सापडले आहे?

9तेव्हा आखीशाने दावीदाला उत्तर देऊन म्हंटले तू माझ्या दृष्टीने देवाच्या दूतासारखा चांगला आहेस असे मी जाणतो परंतु त्याने आमच्याबरोबर लढाईला येऊ नये असे पलिष्ट्यांचे सरदार म्हणाले आहेत.

10तर आता तुझ्या धन्याचे जे चाकर तुझ्याबरोबर आले आहेत त्यांच्यासहित तू पहाटेस ऊठ आणि तुम्ही पहाटेस उठल्यावर तुम्हांला उजेड झाला म्हणजे जा.

11मग पलिष्यांच्या देशांत परत जाण्यास दावीद व त्याची माणसे मोठ्या पहाटेस उठली; आणि पलिष्टी वर इज्रेल येथे गेले.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  1 Samuel 29 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran