Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  1 Samuel 31 >> 

1आणि पलिष्टी इस्त्राएलाशी लढले तेव्हा इस्त्राएल पलिष्ट्यांच्या पुढून पळून गिलबोवा डोंगरात मारलेले पडले.

2आणि पलिष्टी शौलाच्या व त्याच्या मुलांच्या पाठीस लागले; आणि पलिष्टयांनी शौलाचे मुलगे योनाथान व अबीनादाब व मलकीशुवा यांना जिवे मारले.

3आणि शौलावर लढाई भारी पडली व धनुष्यधारांनी त्याला गाठले आणि धनुर्धरामुळे तो फार संकटात पडला.

4तेव्हां शौल आपल्या शस्त्रवाहकाला म्हणाला तू आपली तरवार उपसून तिने मला आरपार भोसक नाही तर हे बेसुंती येऊन मला भोसकून माझी विटंबना करतील. परंतु त्याचा शस्त्रवाहक मान्य होईना कारण तो फार भ्याला. म्हणून शौल आपली तरवार घेऊन तिच्यावर पडला.

5आणि शौल मेला हे पाहून त्याचा शस्त्रवाहकही त्याप्रमाणे आपल्या तरवारीवर पडून मेला.

6असे त्या दिवशी शौल व त्याचे तिघे मुलगे व त्याचा शस्त्रवाहक व त्याचे सर्व मनुष्य एकदम मरण पावले.

7आणि इस्त्राएलांची माणसे पळाली आणि शौल व त्याचे मुलगे मेले हे इस्त्राएलाची माणसे खोऱ्याच्या पलीकडे व यार्देनेच्या पलिकडे होती त्यांनीं पाहिले तेव्हा ती आपली नगरे सोडून पळाली; मग पलिष्टी येऊन त्यात राहिले.

8आणि दुसऱ्या दिवशी असे झाले की पलिष्टी मेलेल्यांची वस्त्रे लुटायला आले तेव्हा त्यांना शौल व त्याचे तिघे मुलगे गिलबोवा डोंगरात पडलेले सांपडले.

9तेव्हा त्यांनी त्यांचे शिर छेदून त्याची शस्त्रे काढली आणि पलिष्ट्यांच्या देशांत चहूकडे त्यांच्या मूर्तीच्या देवळात व लोकांना हे वर्तमान कळवायला त्यांनी माणसे पाठवली.

10आणि त्यांनीं त्याची शस्त्रे अष्टारोथाच्या घरात ठेवली आणि त्यांनी त्यांचे प्रेत बेथ-शानाच्या भिंतीस टांगले.

11आणि पलिष्ट्यांना शौलाला जे केले त्याविषयी जेव्हा यावेश-गिलादाच्या राहणाऱ्यांनी ऐकले

12तेव्हा सर्व शूर पुरुष उठून रात्रभर चालले आणि त्यांनी शौलाचे प्रेत व त्याच्या मुलांची प्रेते बेथ-शानाच्या भिंतीवरून काढून याबेशाला आणले व तेथे ती जाळली.

13मग त्यांनी त्यांची हाडे घेऊन याबेशात चिचेंच्या झाडाखाली पुरली आणि सात दिवस उपास केला.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  1 Samuel 31 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran