Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Joshua 17 >> 

1मनश्शेच्या वंशजाला हे वतन नेमून दिलेली होते. कारण मनश्शे योसेफाचा प्रथम पुत्र, याच्या वंशाचा भाग चिठ्या टाकून ठरविला तो हा, म्हणजे मनश्शेचा प्रथम पुत्र माखीर, गिलदाचा बाप हा तर मोठा शूर होता, आणि त्याला गिलाद व बाशान हा भाग मिळाला होता.

2मनश्शेच्या राहिलेल्या वंशाजासही त्यांच्या कुळाप्रमाणे विभाग मिळाले ते असे, अबियेजेर व हेलेक व अस्त्रिएल व शेखेम व हेफेर व शमीदा हे आपआपल्या कुळांप्रमाणे योसेफ पुत्र जो मनश्शे त्याच्या वंशातले पुरुष होते, त्यांच्या निरनिराळ्या कुळांसाठी हे विभाग ठरले;

3मनश्शेचा पुत्र माखीर, याचा पुत्र गिलाद, याचा पुत्र हेफेर, याचा पुत्र सलाफहाद, याला मुले नव्हते, परंतु मुली होत्या; आणि त्याच्या मुलींची नावे ही आहेत, महला व नोआ, हाग्ला, मिल्का व तिरसा.

4आणि एलाजार याजक व नुनाचा पुत्र यहोशवा व अधिकारी यांपुढे त्या येऊन म्हणाल्या ,परमेश्वराने मोशेला अशी आज्ञा दिली की आम्हास आमच्या भाऊबदांमध्ये वतन द्यावे. यास्तव त्याने परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे त्यांस त्यांच्या बापाच्या भाऊबदांमध्ये वतन दिले.

5आणि यार्देनेच्या पलीकडे जे गिलदार व बाशान त्या प्रांताखेरीज मनश्शेला दहा भाग मिळाले.

6कारण की मनश्शेच्या मुलींना त्याच्या मुलांमध्ये वतन मिळाले, आणि मनश्शेच्या इतर वंशास गिलाद प्रांत मिळाला.

7आणि मनश्शेची सीमा आशेरापासून शखेमाच्या समोरल्या मिखमाथाथापर्यंत झाली, आणि ती सीमा एनतप्पूहाच्या लोकवस्तीच्या उजव्या भागापर्यंत पोहचते.

8तप्पूहा प्रांत मनश्शेचा होता, परंतु मनश्शेच्या सीमेजवळचे तप्पूहा नगर एफ्राइमाच्या वंशाचे होते.

9आणि सीमा काना ओढ्यावरून, ओढ्याच्या दक्षिणेस गेली; ही नगरे एफ्राइमाची होती, ती मनश्शेच्या नगरांमध्ये होती; आणि मनश्शेची सीमा ओढ्याच्या उत्तरेस होती, आणि तिचा शेवट समुद्राजवळ होता.

10दक्षिणभाग एफ्राइमाचा, आणि उत्तरभाग मनश्शेचा, आणि समुद त्याची सीमा होता, आणि उत्तरेस आशेरात व पूर्वेस इस्साखारात ते एकत्र झाले.

11आणि इस्साखारात व आशेरात बेथशान व त्याची खेडी, आणि इब्लाम व त्याची खेडी, आणि दोर व त्याची खेडी यातले राहणारे, आणि एनदोर व त्यांचीखेडी यातले राहणारे, आणि तानख व त्यांची खेडी यांतले राहणारे, आणि मगिद्दो व त्यांची खेडी यांतले राहणारे, हे तीन परगणे मनश्शेचे झाले.

12पण या नगरातील रहिवाश्यांस मनश्शेचे वंशज बाहेर घालवायला समर्थ नव्हती; या प्रातांत राहायास कनान्यानी तर हट्ट धरिला.

13तरी असे झाले की जेव्हा इस्राएल लोक बळकट झाली, तेव्हा त्यांनी कनान्यांचा नेमलेले काम करायला लावले आणि त्यांना अगदीच घालवून दिले नाही.

14तेव्हा योसेफाचे वंशज यहोशवाला म्हणाले की, परमेश्वराने मला येथपर्यत आशीर्वाद दिला आहे आम्ही संख्येने बहुत झालो आहो तर तूं चिठ्ठी टाकून आम्हास वतनाचा एकच विभाग कां दिला आहे?

15तेव्हा यहोशवाने त्यांस म्हटले, जर तुम्ही संख्येने बहुत आहात व लोक आणखी एफ्राइम डोंगराळ प्रदेश तुम्हांस पुरत नाही तर परिज्जी व रेफाई यांच्या देशांतले रान तोडून तेथे वस्ती करा.

16नंतर योसेफाच्या वंशजांनी म्हटले, डोंगराळ प्रदेश आम्हास पुरत नाही; आणि जे कनानी तळप्रांती राहतात, त्या सर्वांस लोखंडी रथ आहेत; म्हणजे बेथशान व तिजकडली खेडीं यांतले, आणि इस्त्रेल खोरे जे, त्यांस आहेत.

17तेव्हा यहोशवाने योसेफाच्या घराण्यास, म्हणजे एफ्राइम व मनाश्ये यांस असे म्हटले की, तुम्ही संख्येने बहुत आहात, व तुझी शक्तिहि मोठी आहे; तुम्हाला एकच विभाग मिळावयाचा असे नाही;

18याकरितां डोंगराळ प्रदेश तुझा होईल; तो अरण्य आहे तरी तू ते तोडशील; बाहेरले भागही तुझे होतील, कारण कनान्यांना जरी लोखंडी रथ आहेत आणि ते बळकट आहेत तरी तू त्यांना घालवशील.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Joshua 17 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran