Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Joshua 18 >> 

1मग इस्राएलाची सर्व मंडळी शिलो येथे एकत्र झाली, आणि तेथे त्यानी सभामंडप उभा केला, आणि त्यांच्यापुढे सर्व देश जिंकलेला होता.

2तरी ज्यांना आपले वाटे मिळाले नव्हते, असे इस्राएलाच्या लोकांपैकी सात वंश राहिले होते.

3यास्तव यहोशवाने इस्राएलाच्या लोकांस म्हटले, जो देश तुमच्या पूर्वजाचा देव परमेश्वर याने तुम्हास दिला, तो आपल्या देशात जाण्यासाठी कीती वेळपर्यत उशीर करणार आहात?

4तुम्ही आपल्यासाठी प्रत्येक वंशातली तीन माणसे नेमा; म्हणजे मी त्यांस पाठवीन, आणि त्यानी देशांत जाऊन चोहोकडे फिरून त्यांच्या वतनाच्या विभागाप्रमाणे, वर्णन लिहून माझ्याजवळ आणावे.

5म्हणजे त्यांनी त्याचे सात वांटे करावे; यहूदाने दक्षिणेस आपल्या सीमेत राहावे, आणि योसेफाच्या घराण्याने उत्तरेस आपल्या सीमेत राहावे.

6तसे तुम्ही देशाच्या वेगवेगळ्या सात वाट्याचे वर्णन करा आणि ते वर्णन इकडे माझ्याजवळ आणा; मग येथे आमचा देव परमेश्वरासमोर मी तुमच्यासाठी चिठ्या टाकीन.

7लेव्यांना तर तुमच्यामध्ये वाटा नाही; कारण की परमेश्वराचे याजकपण तेच त्यांचे वतन आहे; आणि गाद व रऊचेन व मनश्शेचा अर्धा वंश यांचे, यार्देनेच्या पलिकडे पूर्वेस, जे वतन परमेश्वराचा सेवक मोशे याने त्यांस दिले, ते त्यांस मिळालेच आहे.

8तेव्हा ती माणसे तेथून निघून देशभर फिरले आणि यहोशवाने देशाचे वर्णन करणाऱ्यांना आज्ञा दिली; तो म्हणाला, देशात चोहोकडे फिरून त्याचे वर्णन करा आणि माझ्याकडे परत या. मी येथे शिलोत यहोवासमोर तुम्हासाठी चिठ्या टाकीन.

9याप्रमाणे ती माणसे जाऊन देशभर फिरली, आणि त्यातील नगरांप्रमाणे त्यांच्या सात विभागाचे वर्णन वहीत लिहून शिलोतल्या छावणीत यहोशवाजवळ आणले.

10मग यहोशवाने त्यांच्यासाठी शिलोमध्ये परमेश्वरासमोर त्यांच्या नावाच्या चिठ्या टाकल्या; असे यहोशवाने तेथे तो देश इस्राएलाच्या लोकांस त्यांच्या त्याच्या वतन भागाप्रमाणे वाटून दिला.

11तेव्हा बऱ्यामीनाच्या वंशजास नेमून दिलेला प्रदेश त्यांच्या कुळांप्रमाणे चिठ्ठी टाकून जो वांटा मिळाला तो असा; त्यांच्या वाट्याची सीमा यहुदाच्या वंशज व योसेफाचे वंशज यांच्या मध्यभागी निघाली.

12म्हणजे उत्तर बाजूस त्यांची सीमा यार्देनेपासून सुरू होऊन यरीहोच्या उत्तर कडून वर जाऊन, पश्चिमेकडे डोंगरावरून बेथवेनापर्यंत रानांत निघते.

13मग तेथून ती लूज तेच बेथेल येथे पोहचते आणि लूजच्या दक्षिण बाजूकडून निघून खालच्या बेथहोरोनाच्या दक्षिणेस जो डोंगर त्याकडे अटरोथ अद्दार येथे निघते

14तेथून मग पश्चिम सीमा वळसा घेऊन बाजूस बेथहोरोनाच्यासमोरून त्याच्या दक्षिणेस जो डोंगर तेथून यहूदाचे नगर आणि किर्याथबाल तोच किर्याथयारीम येथे निघते. याची पश्र्चिम सीमा हीच.

15दक्षिणेकडील सीमा पश्र्चिमेस सुरू होऊन बाजू किर्याथयारीमाच्या वरच्या टोका पासून निघून नफ्तोहा झऱ्याकडे जाते.

16मग ती सीमा हिन्नोमाच्या पुत्राच्या खिडीसमोरला डोंगर, जो रेफाईमाच्या तलवटीच्या उत्तरेस, त्याच्या काठी उतरली, आणि यबूसी यांच्या दक्षिण भागी हिन्नोम खिंडीत उतरून खाली एनरोगेलाकडे गेली.

17मग उत्तरेकडे वळून एनशेमोशाकडे गेली, आणि अदुम्मीम येथील चढणीच्या समोरल्या गलीलोथाकडे गेली; मग रऊबेनाचा मुलगा बोहन याच्या धोडीकडे ती उतरली.

18मग ती अराबा याच्या समोरल्या भागी उत्तरेस जाऊन अराबास उतरली.

19मग ती सीमा बेथ होग्लाच्या उतरभागी गेली, आणि सीमेचा शेवट क्षारसमुद्राच्या उत्तरेच्या खाडीपर्यंत दक्षिणेकडे यार्देनेच्या मुखापाशी झाला; ही दक्षिणसीमा झाली.

20आणि पूर्वबाजूस त्याची सीमा यार्देन नदी झाली; बन्यामीनाच्या संतानांचे वतन, त्यांच्या कुळाप्रमाणे, त्यांच्या चहूकडल्या सीमाप्रमाणे, हे होते.

21आणि बन्यामीनाच्या लोकाच्या वंशाला त्यांच्या कुळाप्रमाणे ही नगरे मिळाली; यरीहो व बेथहोग्ला व एमेक केसीस

22आणि बेथ अराबा व समाराइम व बेथेल;

23अव्वीम व पारा व आफ्रा;

24कफर अम्मोनी व अफनी व गेबा; अशी बारा नगरे आणि त्यांची गावे;

25गिबोन व रामा व बैरोथ;

26मिस्पा व कफीरा व मोजा;

27रेकेम व इर्पैल व तरला;

28सेला, एलेफ व यबूसी म्हणजेच यरूशालेम, गिबाथ, किर्याथ; अशी चवदा नगरे, आणि त्यांची गावे; बन्यामिनाच्या संतानांचे वतन, त्यांच्या कुळांप्रमाणे त्यांचे आहे.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Joshua 18 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran