Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Joshua 19 >> 

1दुसरा चिठ्ठी शिमोनाच्या नावाची म्हणजे शिमोनाच्या वंशाची त्यांच्या कुळांप्रमाणे निघाली; त्यांचे वतन तर यहूदाच्या वंशजाच्या वतनामध्ये त्यांना वतन मिळाले.

2आणि त्यांचे वतन म्हणून ही नगरे त्यांना मिळाली; बेरशेबा म्हणजे शेबा व मोलादा;

3हसर शुवाल व बाला व असेम;

4एलतोलद व बथूल व हर्मा;

5आणि सिकलाग व बेथ मर्काबोध व ह्सरसूसा;

6आणि बेथ लबवोथ व शारुहेन; ही तेरा नगरे, आणि त्यांची गांवे;

7एनरिम्मोन व एथेर व आशान; अशी नगरे चार, आणि त्यांकडले गांव;

8बालथ बैर, म्हणजेच दक्षिण प्रदेशातील रामा येथपर्यंत या नगरांच्या चहूकडली सर्व गावे. शिमोनी वंशजांचा त्यांच्या कुळांप्रमाणे हाच वतन भाग होय.

9शिमोनाला यहूदी वंशजाच्या वतनभागातच वांटा देण्यात आला. कारण यहूदी वंशाचे वतन त्यांच्या संख्येच्या मानाने फार मोठे होते, म्हणून त्यांच्या वतनात शिमोनी वंशजास वतन मिळाले.

10तिसरा चिठ्ठी जबुलून वंशजाची त्यांच्या कुळाप्रमाणे निघाली; आणि त्यांच्या वतनाची सीमा सारीदपर्यंत आहे;

11त्यांची सीमा पश्चिमेस, वर मरलापर्यत जाऊन दब्बेशेथ येथे पोहचते आणि यकनामा समोरील ओहोळास जाऊन लागते.

12ती सारीद येथून पूर्वेकडे सूर्याच्या उगवतीस वळून किसलोथ ताबोर याच्या सीमेस लागते; तेथून दाबरथ येथे जाऊन याफीयपर्यत वर जाते.

13तेथून पूर्वे दिशेकडे गथहेफेर व इत्ताकासीन येथवरजाते. आणि तेथून नेयाजवळील रिम्मोन येथे निघते;

14ती सीमा त्याला वळसा घालून उत्तरेस हन्नाथोनपर्यंत जाते व तेथून इफता एल खोऱ्यांत संपते.

15कट्टाथ, नहलाल व शुम्रोन, इदला, बेथलहेम आदिकरून बारा नगरे दिली, त्यात गांवे मोजली नाहीत.

16जबुलून वंशातील लोकांची त्यांच्या कुळांप्रमाणे नगरे व त्यांच्या आसपासची गांव हे होत.

17इस्साखाराच्या वंशजाची त्यांच्या कुळांप्रमाणे चवथी चिठ्ठी निघाली.

18त्यांच्या सीमेच्या आंत ही नगरे होती; इज्रेल व कसुल्लोथ व शूनेम;

19आणि हफराईम, शियोन व अनाहराथ;

20रब्बीथ, किशोन व अबेस;

21रेमेथ व एनगन्नीम, एनहद्दा व बेथपसेस,

22त्याची सीमा ताबोर, शहसुमा व बेथशेमेश, येथवर जाते आणि त्यांच्या सीमेचा शेवट यार्देन येथे झाला; ही सोळा नगरे व त्यांची गांवे.

23इस्साखाराच्या वंशाजांची त्यांच्या कुळाप्रमाणे नगरे व त्यांच्या आसपासचे गांव हे होत.

24पांचवी चिठ्ठी आशेर वंशजांच्या नावाची त्यांच्या कुळांप्रमाणे निघाली.

25त्यांच्या सीमेच्या आंत ही नगरे होती हेलकथ, हली, बटेन व अक्षाफ;

26अल्लामेलेख, अमाद व मिशाल, त्यांची सीमा पश्चिमेस कर्मेल व शिहोरलिब्राथ येथवर जाते;

27ती वळून सूर्याच्या उगवतीस बेथदागोन येथवर जाऊन उत्तरेस जबुलून वतनभागापर्यत आणि इफताह एल खोऱ्यााच्या उत्तरेकडून व बेथ एमेक व नियेल येथपर्यत पोहचते, तशीच डावीकडे काबूल येथे निघते.

28तेथून एब्रोन, रहोब व हम्मोन व काना यांवरून जाऊन मोठ्या सिदोनापर्यत पोहचते.

29तेथून ती वळसा घेऊन रामापर्यत जाते व तेथून सोर नामक तटबंदीच्या नगरापर्यत जाते. तेथून ती होसाकडे वळते आणि अकबीज प्रदेशांतून जाऊन समुद्रास मिळते.

30उम्मा, अफेक व रहोब, ही बावीस नगरे व त्यांची गावे त्यास मिळाली;

31आशेरच्या वंशाजांची त्यांच्या कुळांप्रमाणे नगरे व त्यांच्या आसपासचे गांव हे होत.

32सहावी चिठ्ठी नफताली वंशजांच्या नांवाची त्यांच्या कुळांप्रमाणे निघाली.

33त्यांची सीमा हेलेफ आणि साननीमांतील एला वृक्ष यापासून अदामी नेकेब व यबनेल यावरून लक्कुम येथे जाऊन यार्देनेपाशी निघते.

34तेथून ती सीमा पश्चिमेस वळून अजनोथ ताबोर येथे जाते व तेथून हुक्कोक येथे जाते; व तेथून दक्षिणेस जबूलूनाच्या वतन भागापर्यत आणि पश्र्चिमेस आशेरच्या वतनभागापर्यत उगवतीस यार्देनेपाशी यहूदाच्या वतनभागाला जाऊन मिळते.

35त्यातील तटबंदीचे नगरे हे, सिद्दीम, सेर, हम्मथ, रक्कथ व किन्नेरेथ;

36अदामा, राम व हासोर;

37केदेश, एद्रई व एन हासोर;

38इरोन मिग्दलएल, हरेम, बेथ अनाथ व बेथ शेमेश ही एकोणीस नगरेआणि त्यांचे गांव.

39नफतालीच्या वंशजांची त्याच्या कुळांप्रमाणे हे तीं नगरे आणि त्यांचे गांव.

40सातवी चिठ्ठी दान वंशजाच्या नावाची त्याच्या कुळांप्रमाणे निघाली.

41त्यांच्या वतन सीमेच्या आंत ही नगरे होती; सरा, एष्टाबोल, ईर शमेश.

42शालब्बीन व अयालोन व इथला;

43एलोन व तिम्राव एक्रोन;

44एलतके, गिब्बथोन व बालाथ;

45यहूद, बने बराक व गथरिम्मोन.

46मीयार्कोन व रक्कोन, याफोच्या समोरला प्रदेश.

47दानाच्या वंशजाची सीमा त्यांच्या मूळ वतनाबाहेरहि गेली, कारण की दान वंशजांनी लेशेमाशी लढून त्याला धरिले; आणि तरवारीने त्याला मारल्यावर त्यांचा ताबा घेऊन त्यांत वस्ती केली, आणि आपला पूर्वज दान याचे नांव त्यांनी लेशेमास ठेवले.

48दानाच्या वंशजास त्यांच्या कुळांप्रमाणे जी नगरे आणि त्यांचे गांवमिळाले ते हे.

49इस्राएल लोकांनी देशाच्या सीमांप्रमाणे वतन करून घेण्याची समाप्ति केल्यावर नुनाचा पुत्र यहोशवा याला आपल्यांमध्ये वतन दिले.

50परमेश्वराच्या आज्ञे प्रमाणे त्यांनी एफ्राइम डोंगरावरले तिम्नाथसेरह नगर, जे त्याने मागितले, मग तो ते नगर बांधून त्यांत राहिला.

51एलाजार याजक व नुनाचा पुत्र यहोशवा व इस्राएलाच्या वंशांतले वडील अधिकारी यानी शिलोमध्ये सभामंडपाच्या दारी परमेश्वरासमोर, चिठ्ठ्या टाकून जी वतने वाटून दिली ती ही; याप्रमाणे देश त्यांनी देश वांटून देण्याचे संपले.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Joshua 19 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran