Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Joshua 20 >> 

1मगपरमेश्वर यहोशवास म्हणाला,

2तू इस्राएल लोकांस सांग, मी मोशेच्या व्दारे तुम्हास सांगितले होते की तुम्ही आपल्यासाठी शरणपुरे ठरवा;

3म्हणजे जो चुकून, नकळत कोणा मनुष्याला जीवे मारले असता त्या हत्या करणाऱ्याने त्यांत पळून जावे; याप्रमाणे ती नगरे रक्तपाताचा सूड घेणाऱ्यापासून रक्षण होण्यास तुम्हास असावी.

4आणि त्याने त्यांतल्या एका नगराकडे पळून गेल्यावर नगराच्या वेशीच्या दाराशी उभे राहून आपले प्रकरण त्या नगराच्या वडिलांना सांगावे; मग त्यानी त्याला आपल्या नगरात घेऊन त्याला ठिकाण नेमून द्यावे, आणि त्याने त्यांच्यामध्ये राहावे.

5आणि जो रक्ताचा सूड घेण्याऱ्याने, त्याचा पाठलाग केला, तेव्हा त्या नगराच्या लोकांनी मनुष्यवध करणाऱ्याला त्याच्या स्वाधीन करू नये; कारण की त्याने न कळत आपल्या शेजाऱ्याला मारले, त्याचे त्याच्याशी पूर्वीपासूनचे वैर नव्हते.

6मंडळीसमोर न्याय होईपर्यत किंवा जो मुख्य याजक त्या दिवसांत असेल त्याच्या मरणापर्यंत त्या नगरांत त्याने राहावे; नंतर त्या हत्या करणाऱ्याने आपल्या नगरात म्हणजे ज्या नगरातून तो पळाला त्यात आपल्या घरी माघारे जावे.

7यास्तव त्यानी गालीलांत नफतालीच्या डोंगरााळ प्रदेशातील केदेश, एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशातील शखेम, आणि यहूदाच्या डोंगराळ प्रदेशातील किर्याथआर्बा म्हणजेच हेब्रोन, ही वेगळी करून ठेवली.

8पूर्वेस यरीहोजवळ यार्देनेच्या पलीकडे रानांतल्या सपाटीवर रऊबेनाच्या वंशांतले बेजेर, आणि गिलादात गाद वंशातले रामोथ, आणि बाशानात मनश्शेच्या वंशातले गोलान ही नगरे वेगळी करून ठेवली.

9ही नगरे इस्राएलाच्या सर्व लोकांसाठी, आणि त्यांत राहणारा जो परदेशी त्यासाठी अशी नेमलेली होती की जो कोणी चुकून माणसाला मारतो, त्याने त्यांत पळून जावे, आणि तो सभेपुढे उभा राहीपर्यंत त्याने रक्ताचा सूड घेणाऱ्याला, त्याच्या हाताने मरू नये.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Joshua 20 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran