Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Joshua 21 >> 

1मग लेवी वंशातील वडिलांच्या घराण्याचे मुख्य एलाजार याजक व नूनाचा पुत्र यहोशवा व इस्राएली वंशाच्या वडिलांच्या घराणाचे मुख्य त्यांच्याजवळ आले.

2परमेश्वराने मोश्याच्या योगे याप्रमाणे आज्ञा दिली होती की आम्हास राहण्यासाठी नगरे आणि आमच्या पशूंसाठी त्यांचे कुरणे द्यावी.

3यास्तव इस्राएल लोकांनी परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे आपल्या वतनांतून ही नगरे आणि त्यांची कुरणे लेव्यांस दिली.

4तेव्हा कहाथीच्या कुळांसाठी चिठ्ठी निघाली लेव्यांतला अहरोन याजकाच्या वंशजास यहूदा व शिमोन, बन्यामीन या वंशांच्या वाट्यातून तेरा नगरे मिळाली.

5कहाथीच्या राहिलेल्या वंशजास एफ्राइमाच्या वंशांतल्या कुळातून व दानाच्या वंशांतून व मनश्शेच्या अर्ध्या वंशातून दहा नगरे चिठ्ठ्या टाकून मिळाली.

6आणि गेर्षोनाच्या वंशजास इस्साखार वंशांतील कुळांच्या व आशेर, नाफताली, बाशानांत मनश्शेच्या अर्ध्या वंशांच्या नरगापैकी तेरा नगरे चिठ्ठ्या टाकून मिळाली.

7मरारीच्या वंशजास त्यांच्या कुळांप्रमाणे, रऊबेन, व गाद व जबूलुन याच्या वंशांतून, बारा नगरे मिळाली.

8यहोवाने मोशाला दिलेल्या आज्ञेप्रमाणे इस्राएल लोकांनी चिठ्ठ्या टाकून ही नगरे आणि यांचेकरणे लेव्यांस दिले

9त्यांनी यहूद व शिमोन यांच्या कुळाच्या विभागातली नगरे दिली, त्यांचीं नावे सांगितलेली आहेत,

10लेवी वंशातील कहाथीच्या कुळांतल्या अहरोनाच्या वंशजास प्रथम वाटा मिळाला,

11त्यास त्यानी यहूदाच्या डोंगराळ प्रदेशातले अनाकाचा बाप याचे नगर किर्याथ आर्बा म्हणजेच हेब्रोन, हे आणि त्याचे चहुंकडले कुरणे त्यांना दिले.

12परंतु नगराची शेतभूमी व त्याकडली खेडी यफुन्नेचा पुत्र. कालेब याला वतन करून दिली होती.

13त्यानी अहरोन याजकाच्या वंशजास हत्या करणा-याच्या आश्रयाचे म्हणून हेब्रोन नगर व त्याचे कुरणे दिले, आणि लिब्ना व त्याचे कुरणे;

14आणि यत्तीर व त्याचे कुरण, आणि एष्टमोवा व त्याचे करण;

15होलोन व त्याचे कुरण आणि दबीर व त्याचे कुरण;

16अइन व त्याचे कुरण, आणि युट्टा व त्याचे कुरण, बेथशेमेश व तिचे कुरण; अशी त्या दोन वंशांतली नऊ नगरे दिली;

17बन्यामीन वंशांतले गिबोन व त्याचे कुरणे; जेबा व त्याचे कुरण;

18अनाथोथ व त्याचे कुरण, आणि अलमोन व त्याचे कुरण, अशी चार नगरे दिली.

19अहरोन वंशातील याजकास त्यांचीं तेरा नगरें व त्याचे कुरणे मिळाली.

20राहिलेल्या कहाथी वंशातील लेव्यास एफ्राइम वंशाच्या विभागापैकी चिठ्ठी टाकून नगरे दिली.

21त्यानी हत्या करणा-याच्या आश्रयासाठी एफ्राइमाच्या डोंगरावरले नगर शखेम व त्याचे कुरण त्यांस दिले; आणि गेजेर व त्याचे कुरण;

22किबसाईम व त्याचे कुरण; आणि बेथहोरोन तिचे कुरण अशी एकंदर चार नगरे दिले;

23दानाच्या वंशांतून एलतके व त्याचे कुरण, गिब्बथोन व त्याचे कुरण;

24अयालोन व त्याचे कुरण, गर्थारेम्मोन व त्याचे कुरण अशी चार नगरे दिली;

25मनश्शेच्या अर्ध्या वंशांतले तानख व त्याचे कुरण, अशी दोन नगरे दिली;

26बाकी राहिलेल्या कहाथाच्या वंशजास एकंदर दहा नगरे व त्यांचे कुरणे दिली.

27लेवी वंशातील गेर्षोनाच्या कुळास मनश्शेच्या दुस-या अर्ध्या वंशांतून हत्या करणा-याच्या आश्रयाचें नगर बाशानातले गोलान व त्याचे कुरण, आणि बैश्तरा व त्याचे कुरण, अशी दोन नगरे दिली;

28इस्साखार वंशातले किश्योन व त्याचे कुरण, दाबराथ व त्याचे कुरण;

29यर्मूथ व त्याचे कुरण, एनगन्नीम व त्याचे कुरण, अशी चार नगरे दिली;

30आणि आशेराच्या वंशांतलीं मिशाल व त्याचे कुरण, अब्दोन व त्याचे कुरण,

31हेलकाथ व त्याचे कुरण, आणि रहोब व त्याचे कुरण, अशी चार नगरे दिली;

32नफतालीच्या वंशातले हत्या करणा-याच्या आश्रयाचे नगर गालीलातले केदेश व त्याचे कुरणर, आणि हम्मोथदोर व त्याचे कुरण, आणि कार्तान व त्याचे कुरण, अशी तीन नगरे दिली.

33गेर्षोन्याचीं सर्व नगरे त्याच्या कुळांप्रमाणे तेरा नगरे व त्याचे कुरणे,

34आणि राहिलेले लेवी मरारी वंशजाच्या कुळासं जबुलूनाच्या वंशांतले यकनाम व त्याचे कुरण, कर्ता व त्याचे कुरणे;

35दिम्रा व त्याचे कुरण, नहलाल व त्याचे कुरण, अशी चार नगरे दिली;

36आणि रऊबेन वंशांतले बेजेर व त्याचे कुरण, आणि याहस व त्याचे कुरण;

37कदेमोथ व त्याचे कुरण, आणि मेफाथ व त्याचे कुरण, अशी चार नगरे दिली;

38आणि गादाच्या वंशांतले हत्या करणा-याच्या आश्रयाचे नगर गिलादांतले रामोथ व त्याचे कुरणे, महनाइम व त्याचे कुरण

39हेशबोन व त्याचे कुरण, याजेर व त्याचे कुरण, सर्व चार नगरे दिली.

40लेव्यांच्या कुळांतली राहिलेली मरारीची वंशज त्यांच्या कुळांप्रमाणे एकंदर बारा नगरे चिठ्ठ्या टाकून त्यांना दिली.

41इस्राएल लोकांच्या वतनातून लेव्यांस एकंदर अठ्ठेताळीस नगरे, त्यांच्या कुरणासहित दिली.

42ती नगरे अशी होती की त्या प्रत्येक नगरास त्याच्या सभोवार कुरणे होती, असे त्य सर्व नगरांस होते.

43याप्रमाणे परमेश्वराने इस्राएलास जो देश त्यांच्या पूर्वजांस देण्याची शपथ वाहिली होती तो अवघा दिला; आणि ते तो वतन करून घेऊन त्यांत राहिले.

44आणि परमेश्वराने त्यांच्या पूर्वजांजवळ जशी शपथ वाहिली होती, तसा त्याप्रमाणेच त्यांस चहूकडून विसावा दिला, त्याच्या सर्व शत्रूतला कोणी त्यांच्यापुढे टिकला नाही; परमेश्वराने त्यांचे सर्व शत्रू त्यांच्या हाती दिले.

45परमेश्वराने इस्राएलाच्या घराण्यास जी कांही चांगले सांगितले होते, त्यातली एकही गोष्ट पूर्ण झाल्यावाचून राहिली नाही; सर्व घडून आले.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Joshua 21 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran