Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Joshua 22 >> 

1तेव्हा यहोशवाने रऊबेनी व गादी व मनश्शेचा अर्धा वंश यांस बोलावले;

2आणि त्यांस म्हटले, परमेश्वराचा सेवक मोशे याने जे तुम्हास आज्ञा करून सांगितले होते ते तुंम्ही सर्व काही केले आणि जे मी तुम्हास आज्ञापिले त्या सर्वाविषयी तुम्ही माझी वाणी ऐकली

3आजपर्यत बहुत दिवस तुम्ही आपल्या भावांस न सोडता आपला देव परमेश्वर याच्या आज्ञेचे पालन केले आहे.

4आणि तुमचा देव परमेश्वर याने आपल्या वचनानुसार तुमच्या भावांस विसावा दिला आहे; जो परमेश्वराचा सेवक मोशेने यार्देनेच्या पलीकडे तुम्हास वतनाचा देश दिला, त्यांत तुम्ही आपआपल्या तंबूकडे परत जा.

5परतु ज्या आज्ञा आणि जे शास्त्र देवाचा सेवक मोशे याने आज्ञापिले ते तुम्ही आचरावे, म्हणजे तुंम्ही आपला देव परमेेश्वरावर प्रीती करावी, आणि त्याच्या सर्व मार्गात चालावे, आणि त्याच्या आज्ञा पाळाव्या, आणि त्याला चिकटून राहावे आणि आपल्या संपूर्ण अंतःकरणाने व आपल्या संपूर्ण जिवाने त्याची सेवा करावी म्हणून फार सांभाळा.

6यहोशवाने त्यांस आशीर्वाद देऊन निरोप दिला, मग ते आपआपल्या तंबूकडे गेले.

7मनश्शेच्या अर्ध्या वंशाला मोशेने बाशानात वतन दिले होते परंतु त्याच्या दुसऱ्या अर्ध्या वंशाला यहोशवाने त्यांच्या भावांमध्ये पश्चिमेस यार्देनेच्या अलिकडे दिले होते; अाणखी जेंव्हा यहोशवाने त्यांस त्यांच्या तंबूकडे जायला निरोप दिला, आणि त्यांस आशीर्वाद दिला.

8तेव्हां त्याने त्यांस असे सांगितले की, बहुत द्रव्य व पुष्कळ पशुधन, रूपे व सोने व तांबे व लोखंड व फारच फार वस्त्रे घेऊन तुंम्ही आपल्या तंबूकडे माघारे जा; आपल्या भावांबरोबर आपल्या शत्रूंची लूट वाटून घ्या.

9मग रऊबेन वंश, व गाद वंश व मनश्शेचा अर्धा वंश कनानाच्या देशातल्या शिलोपासून इस्राएलाच्या इतर वंशजातून निघून आपला वतनी गिलाद देश, जो मोशेकडून परमेश्वराने सांगितल्यावरून त्यांच्या वतनाचा झाला, त्यांत जाण्यास माघारे चालले.

10तेव्हा यार्देनेजवळचे गलीलोथ कनान देशांत आहे, तेथे रऊबेनाचा वंश व गादाचा वंश व मनश्शेचा अर्धा वंश पोहचल्यावर, त्यानी तेथे यार्देनेजवळ मोठी प्रेक्षणीय अशी वेदी बांधली.

11मग इस्राएलाच्या इतर लोकांनी असे ऐकले की, पाहा, रऊबेनाचा वंश व गादाचा वंश व मनश्शेचा अर्धा वंश यानी कनान देशासमोर यार्देनेवरले गलीलोथ, जेथें इस्राएलाची लोक उतरून आली होती तेथे एक वेदी बांधली आहे.

12असे जेंव्हा इस्राएल लोकांच्या साऱ्या मंडळीने हे ऐकले, तेव्हा इस्राएल लोकांचा सर्व समुदाय. त्यांवर सैन्यरूपें जायला शिलोमध्ये एकत्र मिळाला.

13आणि इस्राएल लोकांनी रऊबेन वंश, गाद वंश व मनश्शेचा अर्धा वंश यांतल्या गिलाद देशी एलाजार याजक याचा पुत्र फिनहास याला पाठवले.

14आणि त्याजबरोबर इस्राएलाच्या प्रत्येक वंशातील पूर्वजाच्या घराण्याचा एकएक अधिकारी असे दहा अधिकारी पाठवले; आणि हजार हजार इस्राएलावर ते एकएक आपापल्या पूर्वजांच्या घराण्यांत मुख्य होते.

15तेव्हां गिलाद देशांत रऊबेन वंश व गाद वंश व मनश्शेचा अर्धा वंश याजवळ ते येऊन त्यांच्याशी बोलले की,

16परमेश्वराच्या सर्व समुदाने असे म्हटले की, तुंम्ही इस्राएलाच्या देवाविरुध्द असे पातक कां केले? की आज परमेश्वराला अनुसरणे यांतून फिरून आपल्यासाठी वेदी बांधिली, येणेकरून आज तुंम्ही परमेश्वरविरुध्द बंड केले आहे.

17पौर देवावरून जो आम्हाकडला अन्याय तो लहान की काय? त्यापासून आम्ही आजपर्यंत शुध्द झालो नाही, आणि परमेश्वराच्या मंडळीवर मरी आली होती.

18तुंम्ही ही परमेश्वराला अनुसरण्याचे सोडून देत आहा काय? आज तुंम्ही परमेश्वराविरुध्द बंडाळी केली तर उद्या सर्व इस्राएल मंडळीवर त्याचा क्रोध होईल.

19आणि जर तुमच्या वतनाचा देश अशुध्द असला, तर परमेश्वर वतनाच्या देशात, जेथे परमेश्वराचा निवासमंडप राहत आहे तेथे उतरून या, आणि आम्हामध्ये वतन करून घ्या ,पण आमचा देव परमेश्वर याच्याविरुध्द बंड करू नका.

20जेराहाचा पुत्र आखान याने समर्पित वस्तुविषयी आज्ञेचा भंग केला, आणि इस्राएलाच्या सर्व मंडळीवर कोप झाला नाही काय? आणि तो पुरूष आपल्या अन्यायामुळे एकटाच मेला नाही.

21तेव्हां रऊबेन वंश व गाद वंश व मनश्शेचा अर्धा वंश यानी इस्राएलाच्या हजार हजार लोकांवर जे जे अधिकार होते त्यांस उत्तर देऊन म्हटले,

22जो समर्थ देव परमेश्वर, जो समर्थ देव परमेश्वर, तो जाणतो; आणि इस्राएल, तोहि जाणील; हे बंड असल्यास किंवा हे परमेश्वरा विरुध्द उल्लंघन असल्यास तू आज आम्हास जीवंत ठेवू नकोस;

23म्हणजे परमेश्वराला अनुसरण्याचे सोडून देण्यासाठी आम्ही ही वेदी बांधली, तिजवर होमार्पणे, पेयार्पणे आणि शांत्यर्पणे करण्यासाटी बांधली असली, तरपरमेश्वर आमची झडती घेईल.

24आम्ही पुढला विचार करून व विशेष हेतूने हे केले आहे; आम्ही म्हणालो, यदाकदाचित पुढील काळी तुमची मुले आमच्या मुलांस म्हणावयाची की इस्राएलाचा देव परमेश्वर याजशी तुमचा काय संबंध आहे?

25हे रऊबेनी व गादी लोकहो, परमेश्वराने यार्देन ही सीमा लावून दिली आहे; तुम्हास परमेश्वरावर हक्क नाही. अशी तुमचे वंशज आमच्या वंशजास परमेश्वराच्या उपासनेपासून थाबवतील.

26यास्तव आम्ही म्हटले की, आपण आपल्यासाठी हे अगत्य करावे, म्हणजे वेदी बांधावी; होमासाठी नव्हे, आणि यज्ञासाठी नव्हे;

27परंतु आमच्या व तुमच्यामध्ये, आणि आमच्यामागे आमच्या पिढयांमध्ये हे साक्ष देण्यासाठी व्हावे; अशी की आम्ही परमेश्वरापुढे आपल्या होमार्पण व आपल्या यज्ञार्पण व आपल्या शांत्यर्पणांनी त्याची सेवा करीत जावी; आणि पुढल्या काळी तुमच्या संतानानी आमच्या संतानांस असे म्हणू नये की, परमेश्वरावर तुमचा काही हक्क नाही.

28यास्तव आम्ही म्हटले की, पुढे जेंव्हा ते लोक आम्हास किंवा आमच्या वंशजास असे म्हणतील तेव्हा आम्ही त्यास असे सांगू की तुंम्ही परमेश्वराच्या वेदीचा नमुना पाहा; ही आमच्या पूर्वजानी ती होमबलि किंवा यज्ञासाठी नव्हे, परंतु ही आमच्या व तुमच्यामध्ये साक्ष देण्यासाठी म्हणून आहे.

29आमचा देव परमेश्वर यास होमार्पण, अन्नार्पण, किंवा यज्ञार्पण करण्यासाठी आमचा देव परमेश्वर याची त्याच्या निवासमंडपाच्यासमोर असलेल्या वेदीखेरीज दुसरी वेदी बांधून आम्ही परमेश्वराविरूध्द बंडावा करण्याचे आणि प्रभूला अनुसरण्याचे सोडून देण्याचे आमच्या हातून कदापि न घडो.

30तेव्हा रऊबेन वंश व गाद वंश व मनश्शेचा अर्धा वंश यानी ज्या गोष्टी सांगितल्या, त्या फिनहास याजकाने व त्याच्या बरोबर जे असलेले अधिकारी व इस्राएलाचे हजार लोकांमध्ये जे जे मुख्य पुरूष यानी ऐकल्या, तेव्हा त्यांस बरे वाटले.

31यास्तव एलाजार याजक याचा पुत्र फिनहास यांने रऊबेन वंश व गादावंश, व मनश्शे वंश यांस सांगितले, आज आम्हास कळले कीपरमेश्वर आमच्यामध्ये आहे; कारण की तुंम्ही परमेश्वराविषयी ते उल्लंघन केले नाही; येणेकरून तुंम्ही इस्राएल लोकांस परमेश्वराच्या हातांतून सोडवले आहे.

32मग रऊबेन वंश व गाद वंश यांपासून गिलाद देशांतून एलाजार याजक याचा पुत्र फिनहास व ते अधिकारी यानी कनान देशांत इस्राएलाच्या लोकांजवळ माघरे येऊन त्यांस वर्तमान सांगितले.

33तेव्हा इस्राएल लोकांचे समाधान होऊन त्यांना बरे वाटले, आणि ज्या देशांत रऊबेन वंश व गाद वंश राहिली होती, त्याचा नाश करायास त्यांवर सैन्यरूपे जावे असे आणखी कधी म्हटले नाही.

34तेव्हा रऊबेन व गाद यानी त्या वेदीला साक्षीचे असे नांव दिले; का तर त्यानी म्हटले की, ते आपल्यामध्ये अशी साक्ष देईल की ,परमेश्वरच देव आहे.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Joshua 22 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran