Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Joshua 23 >> 

1मग देवाने इस्राएलास त्यांच्या आसपासच्या सर्व शत्रूपासून विसावा दिल्यावर बरच काल गेला व यहोशवा वयाने वृध्द झाला.

2तेव्हा यहोशवाने सर्व इस्राएल, त्यांचे वडील व त्यांचे मुख्य पुरूष व त्यांचे न्यायाधीश व त्यावरले कारभारी यांस बोलावून सांगितले, मी वयाने वृध्द झालो आहे.

3आणि तुमचा देव परमेश्वर याने या सर्व राष्ट्रांस तुमच्यापुढून घालवून त्यांस जे केले, ते अवघे तुंम्ही पाहिले, कारण की तुमचा देव परमेश्वर याने स्वत: तुमच्यासाठी लढाई केली आहे.

4पाहा, या उरलेल्या राष्ट्रांचा आणि जी राष्ट्र मी मारून टाकली त्याचा सर्व देश यार्देनेपासून पश्चिमेकडल्या मोठया समुद्रापर्यंतहि मी तुम्हास तुमच्या वंशाप्रमाणे वतनासाठी वाटून दिला आहे.

5अाणखी तुमचा देव परमेश्वर स्वत: त्यांस तुमच्यापुढून घालवील, आणि त्यांस तुमच्यापुढून वतनांतून काढीलच, आणि जसे तुमचा देव परमेश्वर याने तुम्हास सांगितले, तसे तुंम्ही त्यांचा देश वतन करून घ्याल.

6फार मजबूत व्हा, यास्तव मोशेच्या नियमशास्त्राच्या पुस्तकांत जे लिहिलेले त्या सर्वांचे पालन करा आणि त्यांपासून उजवीकडे किंवा डावीकडे वळू नका.

7अाणखी तुमच्याजवळ जी राष्ट्रे उरलेली, त्यांमध्ये तुंम्ही जाऊ नका, आणि त्यांच्या देवाच्या नांवाची आठवण करू नका, आणि त्यांची शपथ घालू नका; त्यांची सेवाहि करू नका, आणि त्यांच्या पाया पडू नका.

8परंतु आजपर्यंत जसे तुंम्ही करीत आला, तसे आपला देव परमेश्वर याला चिकटून राहा.

9कारण की देवाने तुमच्यापुढून मोठी व पराक्रमी राष्टे वतनातून घालवली, परतु तुमची अशी गोष्ट आहे की तुमच्यापुढे आजपर्यंत कोणीहि माणूस उभा राहू शकला नाही.

10तुमच्यांतला एक माणूस हजारांची पाठ पुरवील, कारण की तुमचा देव परमेश्वर याने जसे तुम्हास सांगितले, तसा तो स्वत: तुमच्यासाठी लढतो.

11तर तुंम्ही आपला देव परमेश्वर यावर प्रीती करण्यासाठी आपल्या चित्ताची फार खबरदारी घ्या.

12पण जर तुंम्ही कोणत्याहिप्रकारे मागे वळाल, आणि जी तुमच्याजवळ उरलेली राष्ट्रे यांशी चिकटून राहाल आणि त्यांच्याशी विवाह करून त्यांच्यामध्ये जाल, आणि ते तुमच्यामध्ये येतील;

13तर तुंम्ही हे पक्के समजा की यापुढे तुमचा देव परमेश्वर या राष्ट्रांस तुमच्या नजरेपुढून आणखी घालवणार नाही; आणि जी ही उत्तम भूमि तुमचा देव परमेश्वर याने तुम्हास दिली, तिजवरून तुंम्ही नाश पावून जाल तोंपर्यंत ती तुम्हास सांपळा व पाश व तुमच्या पाठीला चाबूक व तुमच्या डोळ्यांत काटे असे होतील.

14तर पाहा, आज मी सर्व जग जाते त्या वाटेने जात आहे; परंतु तुंम्ही आपल्या संपूर्ण मनात व आपल्या संपूर्ण चित्तात जाणता की ज्या चांगल्या गोष्टी तुमचा देव परमेश्वरयाने तुमच्याविषयी सांगितल्या, त्या सर्वातली एकहि गोष्ट कमी पडली नाही; अवघ्या तुम्हास प्राप्त झाल्या; त्यांतली एकहि गोष्ट कमी पडली नाही.

15तर अस होईल की तुमचा देव परमेश्वर याने तुम्हास सांगितलेली जी प्रत्येक चांगली गोष्ट, ती जशी तुम्हास प्राप्त झाली तशी देव तुम्हास प्रत्येक वाईट गोष्ट प्राप्त व्हावी अशी करील; जी ही उत्तम भूमि तुमचा देवाने तुम्हास दिली आहे, तिजवरून तो तुमचा नाश करून तुम्हास घालवी तोपर्यत असे करील.

16तुमचा देव परमेश्वर याने जो करार पाळण्याची तुम्हास आज्ञा केली आहे, ती मोडून दुसऱ्या देवाची उपासना कराल, आणि त्यांच्या पाया पडाल, तर देवाचा राग तुम्हावर भडकेल, आणि जो उत्तम देश त्याने तुम्हास दिला आहे, त्यातून तुम्हास त्वरीत नष्ट करेल.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Joshua 23 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran