Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Joshua 24 >> 

1तेव्हा यहोशवाने इस्राएलाचे सर्व वंश शखेमांत एकवट करून इस्राएलाचे वडील व त्याचे पुढारी व त्याचे न्यायाधीश व त्यावरले अधिकारी यांस बोलावले, आणि ते देवापुढे हजर झाले.

2तेव्हा यहोशवाने सर्व लोकांना सांगितले, इस्राएलाचा देव परमेश्वर असे म्हणतो की, पूर्वकाळी तुमचे पूर्वज फरात महानदा पलिकडे राहत होते; अब्राहामाचा बाप व नाहोराचा बाप तेराह तेथे होता; तेव्हा त्यानी दुसऱ्या देवाची सेवा केली.

3परंतु त्या तुमचा पूर्वज अब्राहाम यास महानदाच्या पलिकडून आणले, आणि त्याला कनान देशांत नेले आणि तेव्हा मी त्याला इसहाकाव्दारे पुष्कळ वंशज दिले,

4आणि इसहाकाला याकोब व एसाव दिला, एसावाला सेईर डोंगर तो वतन करून दिला, परंतु याकोब हा त्याच्या मुलाबाळांसहित मिसर देशी गेला.

5मग मी मोशे व आहरोन यांस पाठवले आणि मिसऱ्यास पीडा देऊन पीडिले, नंतर मी तुम्हास बाहेर आणले.

6तेव्हा मी तुमच्या पूर्वजांस मिसरांतून बाहेर आणले आणि तुंम्ही समुद्रापर्यंत येऊन पोहचला, तेव्हां मिसरी, रथ व घोडे घेऊन, तांबड्या समुद्रापर्यंत त्यांच्या पाठीस लागले.

7तेव्हा त्यानी देवाचा धावा केला, मग त्याने तुमच्या व मिसऱ्यांच्या मध्ये काळोख पाडला, आणि त्याजवर समुद्र आणून त्यांस बुडवले; मी मिसरांत जे केले, ते तर तुमच्या डोळ्यानी पाहिले, आणि मग तुझी रानांत बहुत दिवस राहिला.

8मग जे अमोरी यार्देनेच्या पलिकडे राहत होते, त्यांच्या देशांत मी तुम्हास आणले; तेव्हां त्यानी तुमच्याशी लढाई केली, परंतु मी त्यांना तुमच्या हाती दिले, आणि तुंम्ही त्यांचा देश ताब्यात घेतला; मी त्यांचा तुमच्यापुढे नाश केला.

9नंतर मवाबचा राजा सिप्पोरपुत्र बालाक त्याने उठून इस्राएलाशी लढाई केली; तेव्हा त्याने दूत पाठवून बोराचा पुत्र बलाम याला तुम्हास शाप देण्यासाठी बोलावले.

10परंतु बलामाचे मी ऐकले नाही; यास्तव त्याने तुम्हास आशीर्वादच दिला, आणि मी तुम्हास त्याच्या हातांतून सोडवले.

11मग तुम्ही यार्देन उतरून यरीहोजवळ आला, तेव्हां यरीहोचे लोक अमोरी, आणि परिज्जी व कनानी व हित्ती व गिर्गाशी, हिव्वी व यबूसी, यानी तुम्हाशी लढाई केली, परंतु मी ते तुमच्या हाती दिले;

12मी तुमच्यापुढे गांधीलमाशा पाठविल्या, आणि त्यानी त्यांस तुमच्या समोरून घालवले; अमोऱ्याचे दोन राजे यांस घालवलें; तुझ्या तरवारीने आणि तुझ्या धनुष्यानेहि हे झाले नाही.

13याप्रमाणे ज्या देशाविषयी तुम्ही श्रम केले नाहीत, आणि जी नगरे तुंम्ही बांधली नाहीत ती मी तुम्हास दिली आहेत, आणि तुझ्यी त्यांत राहत आहा; द्राक्षामुळे व जैतूनबने जी तुम्ही लावली नाहीत, त्यांचे तुम्ही फळ खाता.

14तर आता तुम्ही पूर्णपणाने व सत्यतेनेपरमेश्वराला भिऊन त्याची सेवा करा, आणि नदीच्या पलिकडे व मिसरांत तुमच्या पूर्वजानी ज्या देवांची सेवा केली, त्यांस दूर करूनपरमेश्वर देवाचीच सेवा करा.

15जर परमेश्वर देवाची सेवा करणे हे जर तुम्हास वाईट वाटते, तर तुंम्ही ज्याची सेवा कराल, त्याला आज आपल्यासाठी निवडून घ्या; नदीच्या पलिकडे तुमच्या पूर्वजानी ज्या देवांची सेवा केली, त्यांची सेवा करा, किंवा ज्या अमोऱ्यांच्या देशांत तुंम्ही राहता त्यांच्या देवांची सेवा करा, परंतु मी व माझ्या घरची माणसे आम्हीपरमेश्वराची सेवा करू.

16तेव्हा लोकानी असे उत्तर केले की ,परमेश्वर देवाला सोडून आम्ही दुसऱ्या देवांची सेवा कधीच करणार नाही;

17कारण परमेश्वर आमचा देव आहे; त्यानेच आम्हास व आमच्या पूर्वजांस मिसर देशांच्या दास्यांतून बाहेर आणले; आणि ज्याने आमच्या नजरेसमोर मोठमोठे चिन्ह केले, आणि ज्या वाटेने आम्ही गेलो व ज्या ज्या राष्ट्रा मधून आम्ही मार्गक्रमण केले त्यांत त्याने आमचे रक्षण केले,

18आणि देशांतल्या राहणाऱ्या अमोऱ्यांसुद्धा सर्व राष्ट्रांस परमेश्वराने आमच्यापुढून घालवले आहे; आणखी परमेश्वर आमचा देव आहे म्हणूनही आम्ही त्याची सेवा करू.

19परंतु यहोशवाने लोकांस सांगितले, तुंम्ही परमेश्वर देवाची सेवा करू शकणार नाही; कारण की तो पवित्र देव आहे. तो ईर्षावान देव आहे; तो तुमच्या अधर्माची व तुमच्या पापांची क्षमा करणार नाही. त्याने तुमचे चांगले केले तो तुम्हाला भस्म करेल.

20जर तुम्ही परमेश्वराला सोडून आणि परक्या देवांची आराधना कराल, तो उलटून तुमचे वाईट करील, तुमची हानीही करील.

21तेव्हां लोकानी यहोशवाला म्हटले, असे नाही, आम्ही परमेश्वराची उपासना करू.

22तेव्हा यहोशवा लोकांना म्हणाला, तुंम्ही आपल्या स्वत:चे साक्षी आहात, तुंम्ही परमेश्वराची उपासना करण्यास त्याला आपल्यासाठी निवडून घेतले आहे. ते म्हणाले, आम्ही साक्षी आहोत.

23असे आहे तर आता तुमच्यामध्ये जे परके देव असतील, ते तुंम्ही दूर करा, आणि आपले अंत:करण इस्राएलाचा देव परमेश्वर याकडे लावा.

24तेव्हां लोकांनी यहोशवला म्हटले, आमचा देव परमेश्वर याची सेवा आम्ही करू; आम्ही त्याची वाणी ऐकू.

25त्याच दिवशी यहोशावाने लोकांबरोबर करार केला, आणि शखेमांत त्यांठिकाणी नियम व कायदे स्थापले.

26तेव्हां यहोशवाने ही वाक्ये देवाच्या नियमशास्त्राच्या पुस्तकांत लिहिली, आणि मोठी धोंड घेऊन, तेथे यहोवाच्या पवित्र स्थानी जे एला झाड, त्याच्याखाली ती उभी केली.

27आणि यहोशवाने सर्व लोकांस म्हटले, पाहा, ही धोंड आमच्याविषयी साक्षीदार होईल, कारण कीं देवाने आपली जी सर्व वचने आमच्याजवळ सांगितली ती हिने एेकली आहेत; तर ही तुम्हाविषयी साक्षीदार यासाठी व्हावी की तुंम्ही आपल्या देवाला कधी नाकारू नये.

28मग यहोशवाने लोकांस त्यांना त्यांच्या वतनाकडे रवाना केले.

29मग या गोष्टी झाल्यावर असे झाले की नुनाचा पुत्र देवाचा सेवक यहोशवा एकशे दहा वर्षांचा होऊन मेला.

30मग त्याच्या वतनाच्या सीमेत एफ्राइमाच्या डोंगरवटीवर जे तिम्राथसेरह आहे त्यांत, गाश डोंगराच्या उत्तरेस लोकांनी त्याला पुरले.

31आणि यहोशवाच्या सर्व दिवसांत, आणि जे वडील यहोशवाच्या मागे अधिक आयुष्य पावले, म्हणजे परमेश्वराने आपले जे काम इस्राएलासाठीं केले होते, ते अवघे ज्यांनी पाहिले होते, त्याच्या सर्व दिवसांत इस्राएलानी परमेश्वराची सेवा केली.

32आणि शखेमांत जो शेतभूमीचा भाग याकोबाने शखेमाचा बाप हमोर याच्या संतानांजवळून शंभर रुप्याच्या तुकड्यावर विकत घेतला होता, आणि जो योसेफाच्या संतानांच्या वतनांचा झाला त्यांत, योसेफाची जी हाडे इस्राएली लोकांनी मिसरातून वर आणली होती, तीं त्यानी पुरली.

33आणि अहरोनाचा पुत्र एलाजार मेला, तेव्हा त्याचा पुत्र फिनहास याची टेकडी जी एफ्राइमच्या डोंगरवटीत, याला दिली होती, तिजवर त्यांनी त्याला पुरले.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Joshua 24 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran