Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Joshua 16 >> 

1योसेफ वंशाला नेमून दिलेली जो भाग चिठ्या टाकून ठरविला तो हा, याची सीमा यरीहोजवळ यार्देने नदी पासून यरीहोच्या पूर्वेकडल्या जलसंचयापाशी जाऊन रानातील डोंगराळ प्रदेशांतून बेथेलास निघते.

2मग बेथेलापासून लूजास जाऊन अर्की लोकांची सीमा अटारोथ याजवळून गेली.

3मग पश्चिमेस यफलेटी लोकांच्या सीमेवरून खालच्या बेथहोरोनाच्या सीमेपर्यंत व गेजेरापर्यंत उतरून गेली; आणि तिचा शेवट समुद्राजवळ होता.

4याप्रमाणे योसेफाची वंशज मनाश्शे व एफ्राइस यांस वतन मिळाले.

5आणखी एफ्राइमाच्या वंशजाचे जे त्यांची सीमा कुळाप्रमाणे अशी पडली की त्यांच्या वतनाची सीमा अटारोथ अद्दार याच्या पूर्वेपासून वरल्या बेथहोरोना पर्यंत होती.

6आणि ती सीमा मिखमथाथाजवळ समुद्राकडे उत्तर बाजूस गेली, आणि पूर्वेस तानथ शिलोपर्यंत ती सीमा वळली, मग त्याजावळून पूर्वेस यानोहा तेथवर गेली.

7नंतर ती यानोहा पासून अटारोथ व नारा येथपासून उतरली, मग यरीहोस मिळून बाहेर यार्देनेस गेली.

8तप्पूहा यापासून पश्चिमेस काना ओढ्यापर्यंत सीमा गेली; आणि तिचा शेवट समुद्रापर्यंत होता; एफ्राइमाच्या वंशाचे त्यांच्या कुळांममाणे हेच वतन आहे.

9आणि मनश्श्येच्या वंशजाच्या वतनापैकी कित्येक नगरे एफ्राइमाच्या वंशजासाठी वेगळी केलेली होती; ती सर्व नगरे व त्यांची गांवे होती;

10तथापि जे कनानी गेजेरात राहत होते. त्यांस एफ्राइम्यांनी घालविले नाही; यास्तव ते कनानी एफ्राइमामध्ये आजपर्यंत राहत आहे; आणि नेमून दिलेले काम करण्यास ते दास झाले आहेत.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Joshua 16 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran