Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Joshua 12 >> 

1यार्देनेच्या पूर्वेकडील सूर्य उगवतो त्या बाजूला, अर्नोन नदीपासून ते हर्मोन डोंगरापर्यंत, आणि पूर्वेकडील संपूर्ण अराबाचा प्रदेश इस्राएल लोकांनी जिंकून घेतला, त्याच्या राजांची नावे ही आहेत.

2अमोऱ्यांचा राजा सिहोन; जो हेशबोनात रहात होता, तो अरोएर, जे खोऱ्याच्या मध्यावर आर्णोन गोर्गच्या काठावर होते, तेथून,आणि अम्मोन्यांच्या अर्ध्या गिलादावर खाली याब्बोक सीमेपर्यंत राज्य करत असे.

3किन्नेरोथ समुद्रापर्यंत आराबावर, आराबाच्या समुद्राच्या(क्षार किंवा मृत समुद्राच्या ) पूर्वेकडे, बेथयशिमोथापर्यंत आणि दक्षिणेकडे, पिसगा पर्वताच्या उतरणीपर्यंत सुध्दा सिहोन राज्य करत असे.

4बाशानाचा राजा ओग, उरलेल्या रेफाई लोकांतून राहीलेल्यांपैकी एक होता, तो अष्टारोथ व एद्रई येथे राहत होता.

5तो हर्मोन पर्वत, सलेख, आणि संपूर्ण बाशानावर, गशूर लोकांच्या सीमेपर्यंत आणि मक्काथी, आणि अर्ध्या गिलादावर, हेश्बोनचा राजा सिहोन याच्या सीमेपर्यंत राज्य करत असे.

6परमेश्वराचा सेवक मोशे, आणि इस्राएली लोकांनी त्यांचा पराभव केला, आणि परमेश्वराचा सेवक मोशे, याने ती भूमी रऊबेनी, गादी, आणि मनश्शेचा अर्धा वंश यांना वतन म्हणून दिली.

7यार्देनेच्या पश्चिमेस लबानोन खोऱ्यातील बालगादापासून सेईरास जाणाऱ्या घाटातील हालाक डोंगरापर्यंत ज्या राजांचे देश होते व ज्यांचा यहोशवा व इस्राएल लोकांनी मारले ते हे, हा देश यहोशवाने इस्राएल वंशाना त्यांच्या वाट्याप्रमाणे वतन म्हणून दिला,

8डोंगराळ प्रदेशात, तळवटीत, अराबात, उतरणीत, रानात आणि नेगेबात, हित्ती, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी व यबूसी राहत होते.

9या राजांमध्ये, यरीहोचा राजा, बेथेल शेजारी असलेल्या आयचा राजा,

10यरुशलेमचा राजा, हेब्रोनाचा राजा,

11यर्मूथाचा राजा, लाखीशचा राजा

12एग्लोनाचा राजा, गेजेराचा राजा,

13दबीरचा राजा, गेदेरचा राजा,

14हर्माचा राजा, अरादचा राजा,

15लिब्नाचा राजा, अदुल्लामाचा राजा.

16मक्केदाचा राजा बेथेलचा राजा,

17तप्पूहाचा राजा, हेफेरचा राजा,

18अफेकाचा राजा, लशारोनचा राजा,

19मादोनचा राजा, हासोरचा राजा,

20शिम्रोन-मरोनचा राजा, अक्षाफाचा राजा,

21तानखाचा राजा, मगिद्दोचा राजा,

22केदेशचा राजा, कर्मेलांतील यकनामचा राजा,

23नाफत-दोर येथील दोराचा राजा, गिलगाल येथील गोयीमचा राजा,

24तिरसाचा राजा; या प्रमाणे एकंदर एकतीस राजे होते.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Joshua 12 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran