Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Joshua 11 >> 

1जेव्हा हसोराचा राजा याबीन याने हे ऐकले तेव्हा त्याने सादोनाचा राजा योबाब आणि शिम्रोनाचा राजा व अक्षाफाचा राजा यांना,

2आणि तसेच उत्तरेकडील डोंगराळ प्रदेशांत, कित्रेरोथाच्या दक्षिणेकडील अराबात. तळवटीत आणि पश्चिमेकडील नाफोत-दोरांत असलेल्या राजांना.

3आणि पूर्वेकडले व पश्चिमेकडले कनानी, तसेच अमोरी, हित्ती, परीज्जी व डोंगरवटीतले यबूसी आणि हर्मोन डोंगराच्या तळाशी मिस्पा प्रांतांत राहणारे हिव्वी यांना बोलावणे पाठवले.

4तेव्हा त्यांचे सर्व सैन्य समुद्रकिनाऱ्यावरील वाळूसारखा अगणित समुदाय घेऊन निघाले. त्यांच्याबरोबर पुष्कळ घोडे व रथ होते.

5या सर्व राजांनी एकत्र जमून इस्राएलाशी लढण्यासाठी मेरोम सरोवराजवळ तळ दिला.

6मग देव यहोशवा म्हणाला, त्यांच्या उपस्थितीला भिऊ नको, कारण उद्या मी याच वेळी त्या सर्वांना इस्राएलाच्या हाती देऊन मारणार आहे. त्यांच्या घोड्यांच्या घोडशिरा तोडून टाक व त्यांचे रथ अग्नीत जाळून टाक.

7तेव्हा यहोशवा आपल्या सर्व योद्धयांसह मेरोम पाण्याजवळ अकस्मात येऊन त्यांच्यावर तुटून पडला.

8परमेश्वराने त्यांना इस्राएलाच्या हाती दिले; त्यांनी त्यांना मार देऊन सीदोन महानगरापर्यंत व मिस्त्रफोथ माईमापर्यंत आणि पूर्वेस मिस्पे खोऱ्यापर्यंत पाठलाग करून त्यांच्या एवढा संहार केला की त्यांतला एकही जिवंत राहिला नाही.

9यहोवाच्या सांगण्याप्रमाणे यहोशवाने केले, म्हणजे त्यांच्या घोड्यांच्या घोडशिरा तोडल्या व त्यांचे रथ अग्नीत जाळून टाकले.

10त्या समयी यहोशवाने माघारी येऊन हासोर घेतले, व त्याच्या राजाला तरवारीने ठार मारले. पूर्वी हासोर त्या सर्व राज्यांमध्ये प्रमुख होते.

11तेथल्या प्रत्येक जीवंत प्राण्यांना त्यांनी तरवारीने ठार मारून त्यांचा समूळ नाश केला; आणि कोणताही जिवंत प्राणी जिवंत ठेवला नाही; नंतर त्याने हासोर नगरला आग लावून ते जाळून टाकले.

12परमेश्वराचा सेवक मोशे याच्या आज्ञेप्रमाणे यहोशवाने त्या राजांची सर्व नगरे सर्व राजासह हस्तगत करून त्यांना तरवारीने ठार मारले व त्यांचा समूळ नाश केला.

13टेकड्यांवर वसलेली कोणतीही नगरे इस्राएलाने जाळली नाहीत; हसोर मात्र यहोशवाने जाळले.

14या नगरांतील सर्व मालमत्ता व गुरेढोरे इस्राएल लोकांनी लुटून नेली, पण त्यांनी तरवार चालवून प्रत्येक माणूस मारून टाकला, एकही जिवंत प्राणी जिवंत ठेवला नाही.

15परमेश्वराने आपला सेवक मोशे याला आज्ञा केल्याप्रमाणे मोशेने यहोशवाला आज्ञा केली; आणि त्याप्रमाणे यहोशवाने केले. यहोशवाने मोशेला आज्ञा दिलेली कोणतीही गोष्ट करण्याचे त्याने सोडले नाही.

16अशा प्रकारे यहोशवाने डोंगरी मुलुख, सर्व नेगेब, सर्व गोशेन प्रांत, तळवट, असा सर्व देश घेतला.

17तसेच सेईरच्या वाटेवरील हालाक डोंगरापासून हर्मोन पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या लबानोनाच्या खोऱ्यांतील बाल-गाद येथपर्यंतचा सर्व प्रदेश त्याने हस्तगत केला; त्यांच्या सर्व राजांना त्याने धरून ठार मारले.

18त्या सर्व राजांशी यहोशवाने पुष्कळ दिवस युद्ध केले.

19गिबोनांत राहणाऱ्या हिव्व्याखेरीज कोणत्याही नगराने इस्राएल लोकांशी समेट केला नाही; ती सर्व त्यांनी लढून घेतली,

20कारण परमेश्वर देवाचा असा हेतू होता की, आपण मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्यांचा समूळ नाश करावा, आणि त्यांना काहीच दयामाया न दाखविता त्यांचा संहार करावा. त्यांनी इस्राएलाशी युद्ध करावयाला बाहेर पडावे म्हणून त्याने त्यांची ह्रदये कठीण केली.

21त्या वेळी यहोशवाने डोंगराळ प्रदेशांत राहणाऱ्या व इस्राएलाच्या सबंध डोंगराळ प्रदेशांत राहणाऱ्या अनाकी लोकांचा उच्छेद केला. यहोशवाने त्याचा व त्यांच्या नगरांचा समूळ नाश केला.

22इस्राएल लोकांच्या देशांत एकही अनाकी उरला नाही; मात्र गज्जा, गठ व अश्दोद यांतले थोडे उरले.

23परमेश्वराने मोशेला सांगितले होते त्याप्रमाणे यहोशवाने सर्व देश काबीज केला. यहोशवाने तो इस्राएल लोकांना वंशांच्या नियमाप्रमाणे वाटून वतन करून दिला; तेव्हा देशाला युद्धापासून विसावा मिळाला.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Joshua 11 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran