Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Jeremiah 9 >> 

1जर माझे मस्तक पाण्याने भरलेले असते आणि माझे डोळे अश्रूंचे झरे असते तर मी माझ्या नाश पावलेल्या लोकांच्या कन्येसाठी अहोरात्र रडलो असतो तर किती बरे झाले असते.

2जर वाळवंटात माझासाठी एक ठिकाण असते, तर मी माझ्या लोकांना सोडून त्यांच्यापासून खूप दूर जाऊ गेलो असतो, कारण ते सर्व व्यभिचारी आणि विद्रोही असे आहेत.

3कारण ते त्यांच्या जिभेने खोटे बाण सोडतात, पण ते ह्या पृथ्वीवर विश्वासूपणात मोठे नाहीत. ते एका पापाकडून दुसऱ्या पापाकडे जातात. ते मला ओळखत नाही, परमेश्वर असे म्हणातो.

4“तुम्ही प्रत्येक आपल्या शेजाऱ्याविषयी सावध असा आणि कोणत्याही भावावर विश्वास ठेवू नका? कारण प्रत्येक भाऊ फसवणारा आहे आणि प्रत्येक शेजारी निंदा करणारा आहे.

5प्रत्येक मनुष्य आपल्या शेजाऱ्याची थट्टा करतो आणि खोटे बोलतो. त्यांची जीभ खोटे बोलते. दुष्टाई करण्यासाठी ते आपणाला दमवतात.

6तू आपल्या कपटा मध्ये राहतो, त्यांच्या कपटामुळे ते मला ओळखायला नाकारतात. परमेश्वर असे म्हणतो.

7यास्तव सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो: पाहा! मी त्यांची परिक्षा घेईल आणि त्यांना तपासून पाहीन. कारण मी आपल्या लोकांच्या कन्येकरिता आणखी काय करू?

8त्यांच्या जिभा टोकदार बाणाप्रमाणे आहेत. त्या अविश्वासू गोष्टी बोलतात. प्रत्येकजण शेजाऱ्याशी वरवर चांगले बोलतो. पण गुप्तपणे तो शेजाऱ्यावर टपले आहेत.

9या गोष्टींमुळे मी त्यांना शिक्षा करणार नाही काय? “अशा गोष्टींविषयी या राष्ट्रावर मी सूड उगवू नये का? परमेश्वर असे म्हणतो.

10मी डोंगरासाठी आकांत व विलाप करीन आणि मी कुरणांसाठी शोकगीत गाईन. कारण ती जाळून टकली आहे, तेथून आता कोणीही प्रवास करीत नाही. त्यांना गुरांचा आवाजही ऐकू येत नाही. आकाशातील पक्षी आणि प्राणी दूर निघून गेले आहेत.

11म्हणून मी यरुशलेम नगरी कचऱ्याचा ढीग करीन. ते कोल्ह्यांचे वसतिस्थान होईल. मी यहूदातील नगरे नष्ट करीन. मग तेथे कोणीही राहणार नाही.”

12ह्या गोष्टी समजू शकण्याइतका सुज्ञ कोणी आहे का? परमेश्वराच्या मुखाने जे काही घोषीत केले, म्हणजे ते तो कळवू शकेल काय? ह्या भूमीचा नाश का झाला? जेथे कोणीही जात नाही अशा वाळवंटासारखी ती का केली गेली.

13परमेश्वर म्हणाला, “ हे असे झाले कारण, त्यांनी माझ्या शिकवणुकीला सोडून दिले, जे मी त्यांच्या समोर ठेवली होती, आणि त्यानी माझी वाणी ऐकाण्यास आणि त्यावर चलण्यास नकार दिला.

14हे असे झाले कारण ते आपल्या दुराग्रही हृदयाच्या मर्जी प्रमाणे वागले आणि त्यांच्या वडिलांनी त्यांना शिकवल्या प्रमाणे, बालदेवास अनुसरले.”

15यास्तव सेनाधीश परमेश्वर, इस्त्राएलाचा देव असे म्हणतो, “मी या लोकांना कडू कडू दवणा खायला लावीन आणइ विषारी पाणी प्यायला लावीन.

16नंतर मी त्यांना आशा राष्ट्रांमध्ये विखरु टाकीन त्यांनी किंवा त्यांच्या वडिलांनी पूर्वी कधीही ज्यांच्याबद्दल ऐकले नव्हते. आणि मी सर्व लोकांचा नाश होईपर्यंत त्यांच्या मागे तलवार पाठवीन.”

17सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “या गोष्टींचा विचार करा. प्रेतयात्रेच्या वेळी रडणाऱ्यांना बोलवा, त्यांना येऊ द्या. आक्रंदणात कुशल असलेल्या स्त्रियांना बोलवा, त्यांना येऊ द्या.

18त्यांनी घाईने आमच्यासाठी विलाप करवा. म्हणजे आमचे डोळे भरुन येतील आणि अश्रूंचा पूर येईल.

19“सियोनमधून विलापाचा आवाज ऐकायला येतो आहे. ‘ आम्ही कसे उद्ध्वस्त झालो आहोत, कारण आमची खरोखरच अप्रतिष्ठा झाली. आम्ही आपली भूमी सोडली आहे, कारण त्यांनी आमची घरे फाडून टाकली आहेत.”

20तर स्त्रियांनो, परमेश्वराचे वचन ऐका, त्याच्या मुखातील निघणाऱ्या संदेशाकडे चित्त लावा. नंतर तुमच्या मुलींना मोठ्याने विलाप करण्यास शिकव आणि शेजारील प्रत्येक बाईला शोकगीत शिकव.

21कारण बाहेर असलेले मुले आणि चौकात तरुणांना नाहिसे करणायस मृत्यू आमच्या खिडख्यातून चढून आला आहे. तो आमच्या राजवाड्यांमध्ये शिरला आहे.

22असे सांग: परमेश्वर असे म्हणतो, ‘ जसे उघड्यावर खत पडते आणि कापणाऱ्या मागे पेंढीतून गळण पडते, तशी मनुष्याची प्रेते पडतील, आणि ती कोणी गोळा करणार नाहीत.

23परमेश्वर म्हणतो, “शहाण्यांनी त्यांच्या शहाणपणाबद्दल, बलवानांनी त्यांच्या बळाबद्दल व श्रीमंतांनी त्यांच्या पैशाबद्दल अभिमान बाळगू नये.”

24पण जर कोणाला अभिमान बाळगायचा असेल ह्या गोष्टीत बाळगावा, की तो मला समजतो आणि मला ओळखोतो, कारण मी परमेश्वर आहे, जो प्रामाणिकपणा व न्याय आणि नितीमाता ह्या पृथ्वीवर चालवतो, कारण ह्या गोष्टींमध्ये मला हर्ष वाटतो, परमेश्वर असे म्हणतो.

25परमेश्वर असे म्हणतो, ज्यांची फक्त शारीरिक सुंता झाली आहे, अशांना शिक्षा करण्याची दिवस येत आहेत.

26मिसर, यहुदा, अदोम, अम्मोन, मवाब यातील व वाळवंटात राहणारे, ज्यांनी आपल्या डोक्यावरचे केस कापले त्यांना शासन करीन. कारण ही सर्व राष्ट्रे बेसुनत आहेत, आणि इस्राएलाचे स्रव घराणे बेसुनत हृदयाचे आहेत.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Jeremiah 9 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran