Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Jeremiah 10 >> 

1इस्राएलाच्या वंशजांनो, परमेश्वर जे वचन तुम्हांला घोषीत करीत आहे ते ऐका.

2परमेश्वर असे म्हणतो,“दुसऱ्या देशांचे अनुकरण करु नका. आणि आकाशातील चिंन्हाना घाबरुन जाऊ नका, कारण त्यामुळे राष्ट्रे भयभीत असतात.

3त्या लोकांच्या चालीरीती अर्थशून्य आहेत. कारण कोणी जंगलातून झाड तोडतो, असे ते कुऱ्हाडीने केलेले कारागीराच्या हाताचे काम आहे.

4नंतर ते त्यांना चांदीसोन्याने त्यांना सजवतात. ते खाली पडू नयेत म्हणून हातोड्याने व खिळ्याने ते घट्ट बसवितात.

5अशा मूर्ती काकडीच्या मळ्यातील बुजगावण्यासारख्या आहेत. त्या बोलू शकत नाहीत वा चालू शकत नाहीत. लोकांनाच त्या वाहून न्याव्या लागतात. तेव्हा त्यांना घाबरु नका. त्या मूर्ती तुमचे वाईटही करु शकत नाहीत व चांगलेही करु शकत नाहीत.”

6परमेश्वर तुझ्यासारखा दुसरा कोणीही नाही. तू महान आहेस आणि तुझ्या नावातच सामर्थ्य आहे.

7तुला कोण भिणार नाही, हे राष्ट्राच्या राजा? कारण तू त्या योग्यतेचा आहेस, कारण राष्ट्रांच्या सर्व ज्ञान्यांमध्ये आणि त्यांच्या सर्व राज्यांमध्ये तुझ्यासारखा कोणी नाही.

8ते सर्व पशूसारखे आणि मूर्ख आहेत, दीड दमडीच्या लाकडाच्या मूर्तींचे अनुयायी आहेत.

9ते लोक तार्शिशहून ठोकून आणलेली चांदी आणि उफाजहून आणलेले सोने, कारागिराच्या व सोनाराच्या हातचे अशे ते काम आहे. ते निळ्या आणि जांभळ्या रंगाचे कपडे चढवितात ‘शहाणे लोक’ असे ‘देव’ तयार करतात.

10पण परमेश्वरच फक्त खरा देव आहे. तोच जीवंत आणि सार्वकालीक देव आहे. पृथ्वी त्याच्या क्रोधाने कंपन पावते आणि त्याचा कोप राष्ट्रे सहन करु शकत नाहीत.

11परमेश्वर म्हणतो, “त्या लोकांना पुढील संदेश द्या. ‘त्या खोट्या देवांनी पृथ्वीची आणि स्वर्गाची निर्मिती केली नाही. ते स्वर्गांतून आणि पृथ्वीवरुन नाहीसे होतील.“

12ज्याने आपल्या सामर्थ्याने पृथ्वी निर्माण केली आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग करून त्याने जग निर्माण केले आपल्या समंजसपणाच्या आधारे आकाश पांघरले.

13त्याची वाणी आकाशात जलांच्या गर्जन असते, आणि तो पृथ्वीच्या शेवटापासून धुके वर चढवतो. तो पावसासाठी विजा निर्मान करतो, आणि आपल्या भांडारातून वारा भाहेर काढतो.

14ज्ञानाशिवाय, प्रत्येक माणूस अज्ञानी झाला आहे. आपण निर्माण केलेल्या मूर्तीमुळेच सोनार लाजवले जातात. कारण त्या मूर्ती म्हणजे फक्त असत्य आहे. त्यांमध्ये काही सजीवपणा नाही.

15त्या निरुपयोगी आहेत, खोट्यांचे काम अशा आहेत, त्यांच्या शिक्षेसमयी त्यांचा नाश होईल.

16पण देव, याकोबचा वाटा, त्यांसारखा नाही, कारण तो सर्व गोष्टी घडवणारा आहे. इस्राएल त्याच्या वतनाचा वंश आहे. सेनाधीश परमेश्वर हे त्याचे नाव आहे.

17अहो वेढ्यामध्ये जगत असलेल्या लोकांनो. आपल्या वस्तू गोळा करा आणि देश सोडा.

18परमेश्वर असे म्हणतो, पाहा, यावेळी, मी देशात रीहणाऱ्यांना बाहेर फेकून देईन. आणि त्यांना धडा शिकावा म्हणून त्यांना दु:ख देईल.”

19माझ्या मोडलेल्या हड्ड्या आणि संक्रमीत झालेल्या जखमांमुळे मला हाय हाय! तेव्हा मी म्हणालो, “ खचित हे माझे दु:ख आहे, आणि मला ते पूर्णपणे भोगलेच पाहिजे.”

20माझ्या तंबूचा नाश झाला आणि माझ्या तंबूचे सर्व दोर तुटले आहेत. माझी मुले मला सोडून निघून गेली आहेत. माझा तंबू उभारायला एकही माणूस उरला नाही. माझा निवारा बांधायला एकही माणूस शिल्लक नाही.

21कारण मेंढपाळ मूर्ख झाले आहेत. ते परमेश्वराचा शोध घेत नाहीत. म्हणून त्यांना यश नाही, त्यांचे सर्व कळप विखरले आहेत.

22बातमीचा अहवाल आला आहे, पाहा! यहुदातील शहरांचा नाश करायला आणि कोल्ह्यांची वस्ती करायला . उत्तरेतून माठा भूमीकंप येेत आहे.

23परमेश्वरा, मला माहीत आहे, माणसाची वाट ही त्याच्याकडून नाही येत. चालत्या मनुष्याला आपली पावले नीट नाही करता येत.

24परमेश्वरा, आम्हाला सुधार!पण न्याय्य रीतीने सुधार! रागाच्या भरात आम्हांला शिक्षा करु नकोस. नाहीतर तू कदाचित् आमचा नाश करशील.

25तुला राग आला असेल, तर दुसऱ्या राष्ट्रांना शिक्षा कर. ते तुला जाणत नाहीत वा मान देत नाहीत. ते तुझी उपासना करीत नाहीत. कारण त्या राष्ट्रांनी याकोबाचा विनाश केला आहे आणि त्याला खाऊन टाकले आहे, त्यांनी त्याला क्षिण केले आहे. त्याची वस्ती ओसाड केली आहे.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Jeremiah 10 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran