Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Jeremiah 11 >> 

1यिर्मयाला परमेश्वराकडू मिळालेला संदेश, तो हा:

2“यिर्मया, या कराराची वचने ऐक, आणि यहूदाच्या प्रत्येक मनुष्याला आणि यरुशलेममध्ये राहणाऱ्यां हे घोषीत कर.

3त्यांना असे सांग की, परमेश्वर, इस्राएलचा देव असे म्हणतो ‘जे कोणी या कराराची वचने ऐकत नाही, तो शापित असे.’

4तुमच्या पूर्वजांना मिसर देशातून, लोखंडाच्या भट्टीतून बाहेर काढून आणले, त्यावेळी मी त्यांना हा करार आज्ञापीला आणि ही वचने आचरनात आणा, तर तुम्ही माझे व्हाल व मी तुमचा देव होईन.

5“तुमच्या पूर्वजांना दिलेल्या वचनाकरिता मी हे करीन, दूध व मध यांची रेलचेल असलेली सुपीक भूमी द्यायचे मी त्यांना कबूल केले होते. त्याच भूमीवर तुम्ही आता राहत आहात.” तेव्हा मी म्हणालो ‘होय, परमेश्वरा!’

6परमेश्वर मला म्हणाला, “ यहूदाच्या शहरांतून व यरुशलेमच्या रस्त्यांतून हा संदेश घोषीत कर. कराराची वचने ऐका आणि त्यांचे पालन करा.

7कारण मी त्यांना मिसरच्या बाहेर काढले त्या दिवसापासून या दिवसापर्यंत मी तुमच्या पूर्वजांना इशारा देत आलो आहे की माझा शब्द ऐका.

8पण त्यांनी माझे ऐकले नाही आणि लक्ष दिले नाही. ते दुराग्रही हृदयाचे बनले आणि आवडेल तेच त्यांनी केले. म्हणून मी त्यांना माझ्या आज्ञा पाळण्यास सांगितले, पण त्यांनी ते ऐकले नाही, म्हणून करारात उल्लेखलेल्या सर्व शापित गोष्टी मला त्यांच्याबाबत कराव्या लागल्या.”

9नंतर परमेश्वर मला म्हणाला, “ यहुदातील आणि यरुशलेममधील लोकांमध्ये कट सापडला आहे.

10ते त्यांच्या पूर्वजांनी केलेल्या पापांच्या वळले आहेत. त्यांच्या पूर्वजांनी माझे संदेश ऐकण्याचे नाकारले. त्यांनी दुसऱ्या देवांचे अनुसरण केले. त्यांची पूजा केली. इस्राएल व यहूदाच्या वंशजांनी, त्यांच्या पूर्वजांनी माझ्याशी केलेल्या, कराराचा भंग केला आहे.”

11म्हणून परमेश्वर म्हणतो, “मी त्यांना भयंकर संकटात टाकीन, ज्यातून त्यांना सुटका करून घेता येणार नाही. तेव्हा ते मदतीसाठी माझा धावा करतील, पण मी त्यांचे ऐकणार नाही.

12यहूदातील शहरे व यरुशलेममधील रहिवासी ज्यांना ते अर्पणे देत असत, आणि धूप जाळीत असत, असे ते त्यांच्या देवांकडे आरोळी करतील, पण त्या भयंकर संकटकाळी लोकांना मदत करणे त्या मूर्तीना शक्य होणार नाही.

13“कारण यहूदा तुझ्या नगरा ईतकेच तुझे देव झाले आहेत, आणि तू लज्जास्पद बआल देवाच्या वेद्या, बआल देवाच्या धूप वेद्या, यरुशलेममधल्या रस्त्यांच्या संख्येइतक्याच केल्या आहेत.

14“यिर्मया, तू या लोकांसाठी प्रार्थना करु नकोस अाणि त्यांच्यासाठी आळवणी करु नकोस. कारण जेव्हा ते दु:खात माझा धावा करातील, तेव्हा मी त्यांचे ऐकणार नाही.

15“माझ्या प्रिय लोकांनी, ज्यांनी बरीच पापे केली आहेत, ते माझ्या घरात का आहेत? कारण तुझ्या अर्पणाचे मास तुझा बचाव नाही करु शकणार, कारण तू वाईट केले आणि नंतर आनंद केला.”

16“दिसावयास देखणे असणाऱ्या हिरव्यागार फळाचे जैतुनाचे झाड असे नाव परमेश्वराने तुला दिले होते. पण आता मोठ्या गर्जनेच्या आवाजासहित त्याने त्यावर अग्नी पेटवला आहे. आणि त्याच्या फांद्या तोडल्या आहेत.

17कारण सेनाधीश परमेश्वर, ज्याने तुला लावले आहे, तो तुझ्या विरुद्ध अरिष्ट बोलला आहे. कारण इस्राएल आणि यहूदाच्या लोकांनी कुकर्मे केली. त्यांनी ‘बआल’ देवाला यज्ञ अर्पण केले म्हणून मला राग आला.”

18परमेश्वराने मला या गोष्टींचे ज्ञान दिले. म्हणून मला त्या समजल्या. परमेश्वरा, तू मला त्यांची कृत्ये दाखवली.

19ते माझ्याविरुद्ध येजना आखत आहेत हे मला माहीत नव्हते. मी कत्तल होण्याची वाट पाहणाऱ्या गरीब कोकरासारखा होतो. “आपण या झाडाचा आणि त्याच्या फळांचा नाश करु. आपण त्याला जीवंताच्या देशातू तोडून टाकू म्हणजे त्याचे नाव आठवणीत राहणार नाही.

20पण सेनाधीश परमेश्वर, जो तू नितीमानाने न्यायी करतो, जो तू हृदय व मन पारखतोस. तू त्यांच्यावर केलेला प्रतिकार मी साक्ष देईन, कारण मी आपला वाद तुझ्याजवळ उघड केला आहे.

21अनाथोथच्या लोकांबद्दल परमेश्वर या गोष्टी म्हणतो, जे तुझ्या जीव घेण्यास पाहत अाहेत. ते म्हणातात, “परमेश्वराच्या नावावर भविष्यकथन करु नकोस, नाहीतर आम्ही तुला आमच्या हाताने ठार करु.”

22यास्तव सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, पाहा! “ त्यांना मी शिक्षा करीन. त्यांचे तरुण तलवारीने मरण पावतील. त्यांची मुलेमुली दुष्काळाने मरतील.

23त्यांच्यातील एकही माणूस शिल्लक राहणार नाही. कारण मी अनाथोथच्या लोकांवर वाईट, म्हणजे त्यांच्या शासनाचे वर्ष आणतो.”


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Jeremiah 11 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran