Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Jeremiah 8 >> 

1परमेश्वर असे म्हणतो: “त्यावेळी, ते राजांची प्रमुख नेत्यांची, याजकांची, संदेष्ट्यांची आणि यरुशलेममधील सर्व लोकांची हाडे कबरीतून बाहेर काढतील.

2आणि चंद्र, सूर्य, आकाशातले तारे, ज्यांना ते अनुसरले आणि सेवा केली, ज्यांच्या ते मागे ते चालले आणि पूजन केले, त्यांच्यापुढे पसरतील, ती गोळा केल्या जाणार नाही किंवा पुरल्या जाणार नाही, ती पृथ्वीवर पसरलेल्या शेणखतासारखी असतील.

3“आणि या दुष्ट राष्ट्रातील जे उरलेले आहेत, ज्या प्रत्येक ठिकाणी मी त्यांना घालवले आहे, ते जिवनाच्या ऐवजी मृत्यू निवडतील, परमेश्वर असे म्हणतो.

4तर त्यांना सांग: परमेश्वर असे म्हणतो: “कोणी पडल्यास पुन्हा उठणार नाहीत काय? कोणी चुकीच्या मार्गाने गेला तर फिरुन मागे येण्याचा प्रयत्न करणार नाही काय?

5तर मग यरुशलेममधील लोक कायमचे अप्रामाणिकपणात का वळले आहेत? ते विश्वासघात करीत राहतात आणि पश्चाताप करण्यास नकार देतात.

6मी त्यांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकले आहे. ते योग्य ते बोलत नाहीत. कोणीही आपल्या केलेल्या वाईट कर्मांबद्दल ते क्षमा मागत नाहीत. जो असे म्हणतो, "मी काय केले?" असा कोणीएक नाही. तसा युद्धात घोडा धावतो तसे ते सर्व आपल्या मनात येईल तीथे जातात.

7आकाशातील कारकोच्यांसुद्धा वेळेची योग्य जाणीव असते. पारवे, निळवी व सारस ह्यांना आपल्या येण्याचा समय माहीत आहे पण माझ्या लोकांना, परमेश्वराचे वचन माहीत नाही.

8“आमच्याजवळ परमेश्वरा ची शिकवण आहे म्हणून आम्ही शहाणे आहोत!’ असे तुम्ही म्हणता? कारण लेखकाच्या कपटी लेखणीने ते खोटे केले आहे.

9शहाणे लाजवले गेले आहेत, ते निराशेत आहेत आणि पकडले गेले आहेत. पाहा, त्यांच्या शहाणपणाचा काय फायदा, जर त्यांनी परमेश्वराचे वचन नाकारले?

10म्हणून मी त्यांच्या बायका दुसऱ्यांना देईन. त्यांची शेते जे त्यांना तब्यात घेतील त्यांना देईन. कारण लहाण्यापासून तर माठ्यापर्यंत, सर्वजण अति लोभी आहेत. संदेष्ट्या पासून याजका पर्यंत, सर्वांनी फसवणूक केली आहे.

11काही शांती नसता ही, शांती, शांती, असे बोलून त्यांनी माझ्या लोकांच्या कन्येचे मोडणे वरवर बरे केले आहे.

12त्यांनी केलेल्या दुष्कृत्यांबद्दल लाज वाटली का? नाही त्यांना लाज वाटली नाही. म्हणून पडणाऱ्यांना शिक्षा होत असता ते पण त्यांच्याबरोबर पडतील. परमेश्वर असे म्हणतो.

13परमेश्वर असे म्हणतो, मी त्यांना पुर्णपणे काढून टाकणार, “द्राक्षवेलीवंर एकही द्राक्ष नसेल, आणि अंजिराच्या झाडांवर एकही अंजिर नसेल, पानेह सुकतील आणि जे काही त्यांना दिले आहे, ते त्यांच्यापासून निघून जाईल.

14“आपण येथे नुसतेच का बसलो आहोत? या भक्कम शहराकडे पळून जाऊ या आणि आम्ही मृत्यूमध्ये तिथे गप्प बसू परमेश्वर आमचा देव याने आम्हाला गप्प केले आहे, कारण आम्ही त्याच्याविरुद्ध पाप केले आहे, म्हणून त्याने आम्हांला विषारी पाणी प्यायला दिले आहे.

15आम्ही शांतीची आशा केली पण आम्हांला काहीच चांगले मिळाले नाही. तो आम्हाला क्षमा करील असे आम्हाला वाटले, पण पाहा! अरिष्टच आले.

16त्यांच्या घोड्यांच्या फुरफुरण्याचा आवाज दानापासून ऐकण्यात आला आहे. त्याच्या शक्तीशाली घोड्यांच्या खिंकाळण्याच्या आवाजाने पुर्ण पृथ्वी थरथरली आहे. कारण ते भूमी व त्यावरील प्रत्येक गोष्टीचा नाश करण्यासाठी आले आहेत. ते नगराचा व त्यात राहणाऱ्या सर्व लोकांना नाश करण्यासाठी आले आहेत.

17कारण पाहा! मी नाग आणि फुरशे तुमच्यामध्ये पाठवीन. त्यांना आवरणे अशक्य आहे, ते तुम्हाला दंश करतील. परमेश्वर असे म्हणतो

18माझ्या दु:खण्याला काही अंत नाही आणि माझे अंत: करण अस्वस्थ आहे.

19पाहा! माझ्या लोकांच्या कन्येचा रडण्याचा आवाज फार दुर असलेल्या देशातून येतो. “परमेश्वर सियोनात नाही काय? किंवा तिचा राजा तिच्यामध्ये नाही काय?” मग त्यांनी आपल्या कोरलेल्या प्रतिमांनी आणि निरुपयोगी मूर्तींनी मला का क्रोध आणला आहे.

20“सुगीचा हंगाम संपला, उन्हाळा सरला, पण आमचे तारण झाले नाही.”

21माझ्या लोकांच्या कन्येच्या जखमेमुळे मी जखमी झालो आहे. तिच्या सोबत घडलेल्या भयानक गोष्टींमुळे मी शोकात आणि निराशेत आहे.

22गिलादमध्ये काही औषध नाही काय? तेथे वैद्य नाही काय? मग माझ्या लोकांच्या कन्येला आरोग्य का लाभले नाही.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Jeremiah 8 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran