Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Jeremiah 14 >> 

1परमेश्वराचे वचन जे अवर्षणाबद्दल यिर्मयाकडे आले:

2“यहूदा शोक करो, तीचे दारे पडून जावोत, ते देशासाठी विलाप करत आहेत, त्यांचे यरुशलेेमसाठी रडणे उंचावर गेले आहे.

3त्यांचे थोरजन त्यांच्या चाकरांना पाण्यासाठी पाठवतात, ते सर्व अयशस्वी परत येतात, म्हणून ते लज्जित व खजील होऊन आपले चेहरे झाकून घेतात.

4ह्यामुळे जमीनीत भेगापडल्या आहेत, कारण भुमीवर कोठेही पाणी नाही. म्हणून शेतकरी लज्जीत होऊन आपली डोकी झाकत आहे.

5कोठेही गवत नसल्यामुळे हरिणी आपल्या नवजात पाडसाला एकटेच सोडून देते.

6उघड्या डोंगरावर उभी राहून, जंगली गाढवे कोल्ह्यांप्रमाणे धापा टाकतात, त्यांचे डोळे खोल गेले आहेत, कारण खाण्यालायक एकही झुडूप शिल्लक नाही.

7जरी आमची दुष्टाई आमच्याविरुद्ध साक्ष देते, पण तरी, परमेश्वरा, तुझ्या नामास्तव कार्य कर. कारण आमची अविश्वासू कृत्ये वाढली आहेत. आम्ही तुझ्याविरुद्ध पाप केले आहे.

8इस्राएलाची आशा, तोच एक ज्याने संकटकाळी त्याला तारले. तू देशात उपऱ्यासारखा किंवा जो वाटसरु रात्री उतरायला वळतो त्याच्यासारखा तू का असावा?

9जो वाचवू शकत नाही अशा वीर योद्ध्याप्रमाणे तू का गोंधळात आहेस? कारण परमेश्वरा, तू आमच्याबरोबर आहेस. आम्ही तुझ्या नावाने ओळखले जातो, आम्हाला सोडून जाऊ नकोस.

10परमेश्वर या लोकांना असे म्हणतो: “त्यांना भटकने प्रीय झाले आहे, त्यांनी आपले पाय असे करण्या पासून आवरून धरले नाही. यास्तव परमेश्वर त्यांच्यापासून आनंदी नाही, आता तो त्यांची दुष्कृत्ये लक्षात ठेवून त्यांच्या पापांबद्दल त्यांना शिक्षा करील.

11परमेश्वर मला म्हणाला, “या लोकांच्या भल्यासाठी तू प्रार्थना करु नकोस.

12कारण जरी ते उपवास करतील, तरी मी त्यांचे रडने ऐकणार नाही, आणि जरी ते होमार्पण व धान्यार्पण करतील, त्यात मी आनंद पावणार नाही. कारण तरवार व दुष्काळ आणि रोगराई यांनी मी त्यांचा नाश करीन.”

13तेव्हा मी म्हणालो, “हे, प्रभू परमेश्वरा, पाहा! संदेष्टे त्यांना सांगत आहेत की, तुम्ही तरवार पाहणार नाही, आणि दुष्काळ तुमच्यासाठी असणार नाही, कारण मी तुम्हांला या ठिकाणी खरी सुरक्षीतता देत आहे.”

14परमेश्वर मला म्हणाला, “ माझ्या नावावर हे संदेष्टे असत्य कथन करतात. मी त्यांना पाठविलेले नाही आणि त्यांना अशी कोणतीही आज्ञा केली नाही किंवा त्याच्याशी बोललोही नाही. पण त्यांच्या हृदयातून निघणारे कपट, खोटे दर्शन, व दैवप्रश्न व व्यर्थता हे भविष्य ते तुम्हांला सांगतात.

15यास्तव परमेश्वर असे म्हणतो, मी ज्यांना पाठविले नाही, अशे जे भविष्यवादी माझ्या नावात भविष्य सांगतात आणि असे म्हणतात ‘या देशावर तरवार व उपासमार येणार नाही.’ ते संदेष्टे तरवारीने आणि उपासमारीने मरतील.

16आणि ज्या लोकांना त्यांनी भवीष्य सांगितले, ते उपासमार व तरवार यामुळे यरुशलेमेच्या रस्त्यावर फेकले जातील. त्यांना व त्यांच्या बायका व मुलांना आणि मुलींना कोणी पुरणारा पण असणार नाही, कारण त्यांची दुष्टाई मी त्यांच्यावर ओतीन.

17“हे वचन त्यांना सांग: ‘माझ्या डोळ्यांत अश्रू रात्रंदिवस वाहोत, ते थांबू नयेत. कारण माझ्या लोकांच्या कन्येचे पडणे खूप माठे आहे, तीची जखम मोठी आणि ठिक न होनारी आहे.

18जर मी रानात बाहेर गेलो तर पाहा, तीथे तरवारीने मारले गेलेले आहेत. आणि जर मी शहराजवळ आलो तर तर पाहा! दुष्काळाने ग्रासलेले आहेत. कारण दोघेही, याजक आणि संदेष्टे ज्ञान नसल्याने भटकत आहे.”

19“काय तू यहूदाला पूर्णपणे नाकारलेस आहे का? तू सियोनचा राग करतोस काय? बरे न होण्या ईतके तू आम्हांला का पीडलेस? आम्हांस शांती असेल ही आशा बाळगली, पण आमच्या वाट्याला काहीच चांगले आले नाही. आणि बरे होण्याची वाट पाहीली, पण पाहा, तेथे फक्त भयच आहे.

20परमेश्वरा, आम्ही पापी आहोत, ह्याची आम्हाला जाणीव आहे. आमच्या पूर्वजांनी दुष्कृत्ये केली. आम्ही तुझ्याविरुद्ध अपराध केले.

21परमेश्वरा, तुझ्या नामास्तव, आम्हांला नाकारू नकोस, तुझ्या वैभवशाली सिंहासनाची अप्रतिष्ठा होऊ देऊ नकोस.

22राष्ट्राच्या मूर्तींत पाऊस पाडण्याचे सामर्थ्य आहे काय? किंवा आकाशे स्वत: पावसाच्या सरी पाडण्यास सशक्त आहेत काय? जो हे सर्व करतो, तो तूच आमचा एकमेव परमेश्वर देव नाही काय? आमची आशा तुझ्यामध्ये आहे. कारण तुच ह्या सर्व गोष्टी केल्या आहेत.”


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Jeremiah 14 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran