Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Jeremiah 13 >> 

1परमेश्वर मला असे म्हणाला: “ जा आणि तागाचा कमरबंद विकत घे आणि तो आपल्या कमरेस बांध, पण पहिल्याने तो पाण्यात घालू नको.”

2तेव्हा मी परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे नेसावयास विकत घेतले व ते माझ्या कमरेस बांधले.

3नंतर परमेश्वराकडून मला दुसऱ्यांदा वचन प्राप्त झाले ते असे,

4“ तू नेसावयास विकत घेतलेले, जे तुझ्या कमरेस बांधले आहे, उठ आणि फरात नदी कडे जा आणि तिथे ते खडकाला पडलेल्या खाचेत लपवून ठेव.”

5त्याप्रमाणे मी फरातला गेलो आणि अगदी परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे ते लपवून ठेवले.

6पुष्कळ दिवसांनी, परमेश्वर मला म्हणाला, “उठ आणि फरातला जा व लपवून ठेवायला सांगितलेला कमरबंध परत घे.”

7त्याप्रमाणे मी फरातला गेलो आणि जो कमरबंध मी लपवला होता तो उकरुन काढला. पण पाहा! आता तो कमरबंद नष्ट झाला होता, तो अगदी निरुपयोगी झाला.

8तेव्हा परमेश्वराचे वचन मजकडे पुन्हा आले व म्हणाले.

9परमेश्वर असे म्हणतो, “याचप्रकारे मी यहूदाचा आणि यरुशलेमचा अहंकारी नष्ट करीन.

10हे दुष्ट लोक जे माझे वचन ऐकण्यास नकार देतात, जे त्यांच्या हृदयाच्या कठोरपणात चालतात, जे दुसऱ्या देवाच्या मागे त्याची उपासना करण्यास आणि त्यांच्या समोर नमन करण्यास जातात, ते ह्या कमरबंधाप्रमाणे होतील, ज्याचा काहीच उपयोग नाही.

11कारण जसा कमरबंध माणसाच्या कमरेभोवती लपेटलेला असतो, त्याप्रमाणे मी यहूदाची आणि इस्राएलची कुटुंबे, ते लोक माझे व्हावे, मला कीर्ती, प्रशंसा आणि मान मिळवून द्यावा म्हणून मी त्यांना आपणास लपेटलेले आहे. पण ते माझे ऐकावयाचे नाही.” परमेश्वर असे म्हणतो.

12“यास्तव तू हे वचन त्याना बोललेच पाहिजे, परमेश्वर, इस्राएलचा देव असे म्हणतो, ‘प्रत्येक बुधला द्राक्षरसाने भरेल.’ तेव्हा ते तुला म्हणतील ‘प्रत्येक बुधला द्राक्षरसाने भरेल हे आम्हांला माहीत नाही काय?

13मग तू त्यांना सांग, ‘परमेश्वर असे म्हणतो, पाहा! या देशात राहणारे, दावीदच्या सिंहासनावर बसलेले राजे, याजक, संदेष्टे आणि यरुशलेममध्ये सर्व राहणारे यांना मी मद्याच्या धुंदीने भरीन.

14मग मी त्यांना एकमेकांवर आदळीन, पिता पुत्र एकमेकांवर आदळतील, मी त्यांचा नाश करू नये असा त्यांचा कळवळा मी करणार नाही, किंवा त्यांना सोडणार नाही, किंवा त्यांच्यावर दया करणार नाही.

15ऐका आणि लक्ष द्या, गर्विष्ठ बनू नका, कारण परमेश्वर तुमच्याशी बोलला आहे.

16त्याने अंधकार पसरवीण्याच्या आधी, आणि अंधकारमय पर्वतावर तो तुमचे पाय डळमळण्याचे कारण बनण्या आधी, आणि तुम्ही प्रकाशाची प्रतीक्षा करतांना तो त्याची मृत्यूछाया करील व त्याचा निबीड अंधार करुन ठेवील त्याच्या आधी, परमेश्वर, तुमचा देव याला मान द्या.

17म्हणून जर तुम्ही ऐकणार नसाल, तर मी तुमच्या अहंकारा मुळे रडणार. माझे डोळे खात्रीने अश्रु गाळतील आणि आसवे वाहवील. कारण परमेश्वराचा कळप बंदिस्त केला आहे.

18राजाला आणि राणीच्या आईला सांग, स्वत:ला नम्र करा आणि खाली बसा, कारण तुमचा मुकुट, म्हणजे तुमचे गौरव आणि गर्व, खाली पडले आहे.

19नेगेवमधील शहरे बंद केली गेली आहेत, ती उघडायला कोणी नाही. यहूदाला बंदिस्त केले आहे, तीच्यातील सर्व हद्दपार करण्यात आले आहेत.

20आपले डोळे वर लाव आणि जो उत्तरेहून येत आहे त्याला पाहा. त्याने दिलेला कळप, तुला अती सुंदर असलेला कळप कोठे आहे?

21ज्यांना तू आपले मीत्र होण्यास शिकवले, त्यांच्यावर देव जेव्हा तुला ठेवणार, तेव्हा तू काय करशील? जसे प्रसुतपावणाऱ्या स्रीला वेदना वेढतात, त्याचप्रमाने हा तुझ्या वेदनांचा प्रारंभ नाही काय?

22तेव्हा तू कदाचित् स्वत:च्या मनास विचारशील, “माझ्या सोबतच ह्या गोष्टी का घडतात? हे असे आहे कारण तुझ्या अनेक पापांमुळे तुझा घागरा उठला गेला आहे आणि तुझा बलात्कार झाला आहे.

23कुशी लोक त्यांच्या कातडीचा रंग बदलू शकतीलल काय? किंवा चित्ता त्याच्यावरील ठिपके बदलू शकेल काय? त्याचप्रमाणे तुम्हांला, जी नेहमीच वाईट करण्याची सवय आहे, ते तुम्ही चांगले करणार काय .

24“यास्तव वाळवंटातील उडून जाणाऱ्या भुसकटाप्रमाणे मी त्यांचा नाश करील.

25हेच तुला माझ्याकडून देण्यात आले आहे, तुझा घोषीत केलेला वाटा, कारण तु मला विसरली आहे आणि खोट्यावर विश्वास ठेवला आहे. परमेश्वर असे म्हणतो.

26यरुशलेम, मी तुझा घागरा डोक्याकडून खेचीन. प्रत्येकजण तुला पाहील आणि तुझी बेअब्रू होईल.

27तुझी जारकर्मे आणि खिदळणे, तुझ्या व्यभिचाराची दुष्टाई ही रानांतल्या डोेंगरावर मी पाहिली आहेत, हे यरुशलेमे, तुला हाय! तु स्वच्छ केली जात नाही आहे, असे किती काळ चालणार?


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Jeremiah 13 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran