Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Ezekiel 20 >> 

1हे सातव्या वर्षी घडले, दहावा दिवस पाचवा महीना, इस्त्राएलाचे वडील यहोवा देवाला विचारणा करण्यास आले, आणि मज पुढे येऊन बसले.

2यहोवा देवाचा शब्द माझ्या कडे आला, आणि म्हणाला

3मनुष्याच्या मुला इस्त्राएलाच्या वडिलांना जाहिर करून सांग की प्रभु यहोवा देव असे म्हणतो तुम्ही मला प्रश्न विचारायला आला काय? प्रभु यहोवा देव म्हणतो माझ्या जीवीताची शपथ मी तुला प्रश्न विचारु देणार नाही, असे यहोवा देव जाहीर करतोय.

4तू त्यांचा न्याय करु नये काय? मानवाच्या मुला तू त्यांचा न्याय करु नये काय? त्यांच्या वाडवडिलांनी केलेली घ्रुणास्पद क्रत्ये त्यांना सांग

5प्रभु परमेश्वर म्हणतो मी ज्या दिवशी इस्त्राएलास निवडून घेतले आणि माझे हात वर याकोबाच्या वंशजांना शपथ वाहिली आणि मिसर देशात त्यांना प्रकट झाले, मी माझे हात उंचावुन शपथ वाहिली मी तुमचा यहोवा देव असे म्हणतो.

6त्या दिवशी मी आपले हात उंचावुन त्यांच्याशी शपथ वाहीली की मी त्यांना मिसर देशातुन बाहेर आणिन आणि मी त्यांना खात्रीपुर्ण त्यांच्यासाठी निवडलेल्या देशात आणिन ज्यात दुधामधाचे प्रवाह वाहत आहे, तो देश संदर असून सर्व देशांचा मुकुट मणी आहे.

7तेव्हा मी त्यास म्हटले की प्रत्येकाने मिसर देशातील मूर्ती देवत अशा तिरस्करणीय वस्तु आपल्या द्रुष्टी समोरुन फेकुन द्या, तुम्ही त्यामुळे विटाळु नये, असे तुमचा देव परमेश्वर म्हणतो.

8तरीही त्यांनी माझा तिव्र विरोध केला आणि ते माझे ऐकेनात त्यातीत प्रत्येकाने मिसर देशातील मूर्ती देवत अशा तिरस्कार आणणाऱ्या वस्तु फेकुन दिल्या नाही आणि म्हणून मी त्यांना त्वेषाने माझा क्रोध मिसरावर मी ओतीन तरच मी समाधान पावेन हा माझा केलेला ठराव आहे.

9माझ्या पवित्र नामास्तव ज्या राष्ट्रात ते राहात आहेत त्यांच्या द्रुष्टीपुढे माझ्या नामाचा अनादर होऊ नये म्हणून मी हे कार्य केले आहे, मी त्यांना मिसर देशातून काढून त्याच्या द्रुष्टीसमोर मी त्यास प्रकट झालो.

10मी त्यास मिसर देशातुन बाहेर पाठवले आणि त्यांना रानात आणिले.

11मी त्यांना माझे नियम व निर्णय लावून दिले त्यास दाखवून दिलेत ह्यासाठी की जो कोणी हे पाळेल त्यांचा बचाव होईल.

12माझ्या मध्ये आणि त्यांच्या मध्ये चिन्ह म्हणून त्यास शाब्बाथ दिले, ह्यासाठी की त्यांना समजावे की त्यास पवित्र करणारा मी यहोवा देव आहे.

13रानामध्ये इस्त्राएल घराण्याने माझा तिव्र विरोध केला. ते माझ्या नियमांनी चालले नाहीत, ज्यांच्या मुळे त्यांचा बचाव होईल, त्याऐवजी त्यांनी माझ्या नियमांचा नकार केला त्यांनी माझ्या पवित्र शाब्बाथाचा अनादर केला; म्हणून मी म्हणालो त्यांचा रानामध्येच नाश करण्यासाठी मी आपला क्रोध त्यांच्यावर ओतीन असे मी म्हटले.

14तथापी माझ्या पवित्र नामाचा अनादर होऊ नये म्हणून त्या राष्ट्रा देखत त्यांना मिसरा बाहेर आणून क्रुती केली.

15म्हणून मी माझा हात उंचावुन रानात प्रतिज्ञा वाहिली जो देश त्यांना देण्यासाठी ज्यामध्ये दुधा मधाचे प्रवाह वाहत आहे जो सर्वात सुंदर असून सर्व देशाचा मुकुटमणी आहे, अशा देशात मी त्यांना देऊन जाणार नाही.

16मी शपथ वाहिली कारण त्यांनी माझा करार मोडला माझ्या नियमांनी ते चालले नाहीत आणि माझ्या शाब्बाथाचा अनादर केला, कारण त्यांचे अंतःकरण मुर्तीशी जडल्यामुळे त्यांनी माझे निर्णय टाकून दिले.

17तरी मी त्यांच्यावर क्रुपाद्रुष्टी केली कारण त्यांची होणारी हानी पाहुन त्यांचा रानात सर्वनाश करणार नाही.

18रानात मी त्यांच्या पुत्रपोत्रास म्हणालो तुम्ही आपल्या वाडवडिलांच्या नियमांनी चालु नका, तुम्ही त्यांचा करार पाळु नका किंवा मुर्तीपुजा करून स्वताःस अशुध्द करु नका.

19मी तुमचा यहोवा देव आहे. माझ्या नियमांनी चाला माझे निर्णय पाळून माझ्या आज्ञेत रहा रहा.

20माझे शब्बथ पवित्र पणे पाळ ह्यासाठी की, त्या तुमच्या व माझ्यामध्ये चिन्हा दाखल होतील. ह्यासाठी की मी तुमचा यहोवा देव आहे हे तुम्हास कळून येईल.

21परंतू त्यांच्या मुलामुलींनी देखील माझ्या विरोधात तिव्र विरोध केला. ते नियमांनी चालले नाहीत किंवा करार पाळला नाही, ज्या आज्ञा पाळल्याने मनुष्य वाचतो. त्यांनी माझ्या शाब्बाथाचा अनादर केला, तेव्हा मी ठरवले की मी रानात त्यांच्यावर क्रोधाची व्रुष्टी करावी ह्यासाठी माझा क्रोध पूर्ण करावा.

22परंतू मी आपल्या नामास्तव आपला हात आवरला ह्यासाठी की ज्या राष्ट्रातुन इस्राएलांना मी बाहेर त्यांच्या द्रुष्टीसमोर माझा अनादर होऊ नये, म्हणून मी क्रुती केली आहे.

23रानात मी हात उंचावुन अशी शपथ वाहिली की, मी त्यांची राष्ट्रामध्ये पांगापांग करीन व त्यास देशोधडीला लावीन.

24हे करण्यासाठी मी ठराव केला ह्यासाठी की जेव्हापासुन त्यांनी माझ्या आज्ञा करार पाळल्या नाही, माझ्या शाब्बाथ व नियमांचा अनादर केला. कारण त्यांची द्रुष्टी त्यांच्या वाडवडिलांच्या मुर्तीकडे लागली होती.

25जे चांगले नाहित असे नियम मी त्यांना दिलेत, ज्यांनी ते जगावयास असे निर्णय मी त्यास दिलेत.

26त्यांच्या मिळालेल्या देणगी व्दारे मी त्यांना अशुध्द केले. हे सर्व झाल्यामुळे त्यांना गर्भाशयातून प्रथम जन्मलेल्या बालकांचा अग्नीत होम केला, हे केल्याने त्यांनी भीती बाळगावी आणि समजावे की मी यहोवा देव आहे.

27यास्तव हे मनुष्याच्या पुत्रा इस्त्राएल घराण्याला जाहिरपणे सांग की, प्रभु यहोवा देव असे म्हणतो त्यांना सांग, तुम्ही तुमच्या वाडवडिलांनी माझा विश्वासघात केला असून देवनिंदक शब्द बोललेत ते अशा प्रकारे

28मी आपले उंचावुन शपथ घेऊन दिलेल्या देशात मी त्यांना आणिले, तेव्हा त्यांनी प्रत्येक उंच टेकडी आणि दाट छायेचे व्रुक्ष पाहुन मला संतापावण्यासाठी तेथे त्यांनी यज्ञबली अर्पीली. तेथे त्यांनी सुवासीक धुप जाळीला व पेयार्पण अर्पीली.

29तेव्हा मी त्यास म्हणालो तुम्ही ज्या उंचवटयांवर जाऊन जेथे तुम्ही अर्पण अर्पीता? त्या ठिकाणास आजवर उंचवटा म्ह्टले आहे.

30ह्यासाठी इस्त्राएलाच्या घराण्यास सांग, यहोवा देव असे म्हणतो काय? तुम्ही आपल्या वाडवडिलांना मार्गास लागून स्वताःला विटाळवीता काय? आणि वेश्ये प्रमाणे क्रुती करून किळस आणणाऱ्या गोष्टीचा शोध घेता?

31आपली अर्पणे वाहून आपल्या पुत्रांना अग्नीत होम करून आज पर्यंत मुर्तीपुजेमुळे तुम्ही स्वताःला अशुध्द केलेत हे इस्त्राएलाच्या घराण्यांनो मी तुम्हाला प्रश्न विचारु देणार नाही, माझ्या जीवीताची शपथ ही माझी घोषणा आहे, मी तुम्हाला प्रश्न विचारु देणार नाही.

32तुमच्या मनात येणारे विचार तरंग बाहेर येतील, तुम्ही म्हणता, चला इतर राष्ट्राप्रमाणे तेथील जमाती काष्ट पाषाणाची पुजा करतात तशी आपण करु.

33ही प्रभू यहोवा देव घोषणा करतो, मी खात्रीने आपले बाहु उभारुन पराक्रमाने तुमच्यावर राज्य करीन.

34मी राष्ट्रातून तुम्हाला बाहेर आणिल, आणि जेथे जेथे तुमची पांगापांग झाली तेथून आणून तुम्हाला एकत्र करीन मी हे आपल्या प्रबळ बाहुने उगारलेल्या हाताने कोपव्रुष्टी करीन.

35नंतर मी लोकांना रानात आणले आणि तोंडो तोंड त्यांचा न्याय करेल.

36ज्या प्रमाणे मिसराच्या रानात तुमच्या वाडवडिलांचा न्याय केला, तसा मी तुमच्या बरोबर करेल. हा यहोवा देव घोषणा करून सांगतोय.

37तुम्हाला माझ्या खाली घालवून बेड्या टाकून करारबध्द करीन.

38तुम्हातील बंडखोर व माझ्याशी फितुर कोण यांची मी साफ सफाई करणार अल्पकाळ जे इतर राष्ट्रात राहत होते, त्यांना मी बाहेर घालवून देणार पुनःरुपी ते पुन्हा इस्त्राएलात प्रवेश करणार नाही. मग तुम्हाला कळेल मी यहोवा देव आहे.

39मग त इस्त्राएलाच्या घराण्या यहोवा देव असे म्हणत आहेः प्रत्येक जण त्यांच्या मूर्ती मागे गेले आहेत, त्यांची उपासना करून त्यांनी माझे ऐकण्याचे नाकारले आहे, पण तू आता माझ्या पवित्र वस्तु बद्दल मुर्तीला भेट देऊन अनादर आता पुढे करणार नाही.

40माझ्या पवित्र पर्वतावर, इस्त्राएलाच्या पर्वत शिखरावर हे यहोवा देव जाहिर करतोय, सर्व इस्त्राएलाचे घराणे त्यांच्या भुमीत माझी आराधना करतील. तुझ्या अर्पणांनी मी तेथे आनंदी होईल आणि पवित्र ठिकाणी आणलेल्या खंड्णीचा प्रथम फळ ते अर्पीतील.

41मी त्यांचे सुवासीक अर्पण स्विकारीन जेव्हा सर्व लोक देशांतून एकत्र जमतील जेथुन ते विखुरले गेले होते. मी स्वताःला त्यांना पवित्र असे प्रकट करेल, सर्व राष्ट्रे ते बघतील.

42जेव्हा मी तुम्हाला इस्त्राएलच्या भुमीत घेऊन येईल, ज्या भुमीला हात उंचावुन तुमच्या वाडवडिलांना दिली होती, मग तुम्हाला कळेल कि मी यहोवा देव आहे.

43मग तुम्हाला तुमच्या वाईट क्रुत्यांचे स्मरण होईल, आणि तुमच्या केलेल्या वाईट क्रुत्या बद्दल तुम्ही तुमचा स्वताःची घ्रुणा कराल.

44मग तुम्हाला कळेल मी यहोवा देव आहे जेव्हा मी हे माझ्या नामास्तव हे केले, तुमच्या वाईट भ्रष्ट मार्गासाठी केले नाही. इस्त्राएलाच्या घराण्या हे यहोवा देव जाहीर करतोय.

45मग यहोवा देवाचा शब्द माझ्या कडे आला आणि म्हणाला

46मानवाच्या मुला आपले तोंड दक्षीणेच्या भुमीकडे लाव आणि बोल; नेगेबच्या राना विरुध्द भाकित करा.

47नेगेबच्या रानाला बोल ऐक यहोवा देव काय जाहिर करतोय! यहोवा देव हे म्हणतोयःबघ मी तुझ्यावर अग्नी पाठवील. ती सर्व झाडाच्या ताज्या फळांना जाळेल व झाडे सुकवून टाकेल. जळीत आग विझणार नाही; सर्व उत्तर, दक्षीण भाग जळुन भस्म होईल.

48जेव्हा मी अग्नी पेटवेल तेव्हा सर्व जीव मला यहोवाला बघतील, आणि मी आग विझवणार नाही.

49मग मी त्यांना म्हणालो आहा हा यहोवा देवा ते मला म्हणाले, हा केवळ दाखला सांगणारा आहे का?


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Ezekiel 20 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran