Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Ezekiel 21 >> 

1मग यहोवा देवाचा शब्द माझ्याकडे आला आणि म्हणाला

2मानवाच्या मुला आपले तोंड यरुशलेमेकडे कर आणि पवित्र ठिकाणा विषयी इस्त्राएलाच्या भुमी विरुध्द भविष्य वाणी कर.

3इस्त्राएलाच्या भुमीला सांगा यहोवा देव म्हणतो बघ! मी तुझ्या विरुध्द आहे मी शेथापासून तरवार घेऊन तुझ्यापासुन धार्मीकाला आणि दुर्जनाला वेगळे केले!

4माझ्या क्रमाने नीतिमान आणि दुर्जन तुझ्यापासून वेगळे करेल, माझी तरवार शेथापासून सर्व जीवा विरुध्द उत्तर दक्षीण भागात बाहेर पडेल

5मग सर्व जीवांना कळेल मी यहोवा देव आहेमी शेथा जवळ तरवार ठेवली आहे ती वापस म्यान होणार नाही.

6आणि तू मानवाच्या मुला हात फुटल्या वर विव्हळ रहा! त्यांच्या नजरे देखत कटुतेत विव्हळत रहा.

7मग तू तुला विचारतील काय झाले का तू विव्हळतोस? मग तू त्यांना सांग कारण अशी बातमी येत आहे, प्रत्येक ह्दय क्षीण होईल, प्रत्येक हात अडखळेल आणि प्रत्येक गुडघा पाणी पाणी होईल बघ! असे घडून येत आहे आनी ते तसेच होईल “असे यहोवा देव जाहीर करीत आहे.”

8मग यहोवा देवाचा शब्द माझ्या कडे आला आणि म्हणाला,

9मानवाच्या मुला भाकित कर आणि म्हण असे यहोवा दे सांगत आहेः तरवारीला धार लावा आणि त्याला चकाकीत करा.

10मारुन टाकण्यासाठी हत्याराला धारधार करा! तीला चकाकीत करा! आमच्या पुत्राच्या राजदंडाचा आम्ही उत्सव करु? जी तरवार येईल ती सर्व दंडाला कमी लेखते!

11मग तरवारीला चकीकीत होण्यासाठी सोपवून दिली, आणि मग आपल्या हातांनी जप्ती केली. तरवारीला धार लावली आणि चकाकीत केली ठार मारणाऱ्या व्यक्तीच्या हाती दिली!

12मानवाच्या मुला! मदतीसाठी हाक मार आक्रोश कर कारण ती तरवार माझ्या लोकांवर आली आहे! ती इस्त्राएलाच्या वडिलांवर आली आहे ज्याकडे तरवार भिरकावली! ते माझे लोक आहे त्यामुळे अतीतीव्र दुःखाने आपली छातीपीट कर!

13तेथे खटला भरला पण ज्याकडे राजदंड आहे त्याने शेवट केला नाही? हे यहोवा देव सांगत आहे.

14आता तू मानवाच्या मुला भाकित कर आणि आपल्या दोन्ही हातांनी टाळी दे यास्तव तरवार तिसऱ्यांदा चालुन येईन. ती तरवार अनेकांना ठार मारण्यास, सगळे कडे भेदून पार करण्यासाठी आहे!

15त्याच्या हृदयाचे पाणी पाणी होण्यास आणि अनेकांना अडखळण होण्यासाठी त्यांच्या वेशीवर ठार मारण्यासाठी तरवारी सिध्द केल्या आहे! आहाहा! तीला विजेसासारखी चमकवली आहे, ती कसाई सारखी उपसली आहे.

16हे तरवारी! जशी तू आपले मुख फिरवशील तशी उजवीकडे डावीकडे तुझ्या मर्जी प्रमाणे वळवली जा.

17मी सुध्दा टाळी वाजवून आपल्या त्वेषाला शांत करेल असे यहोवा देव जाहिर करतो!

18यहोवा देवाचा शब्द पुन्हा माझ्याकडे आला आणि म्हणाला

19आता तू मानवाच्या मुला बाबेलच्या राजाची तरवार येण्यासाठी दोन मार्ग सिध्द कर, दोन्ही मार्गाची सुरुवात एकाच ठिकाणी होईल दिशादर्शक दगड शहराकडे निर्दॆश करेल.

20एका मार्गाला बाबेलच्या सेन्यासाठी खुण करून ठेवा अम्मोरीच्या मुलाकडे रब्बा जवळ येण्यासाठी मार्ग सिध्द करा, दुसरी खुण यरुशलेमेच्या शहरा जवळ यहुदाच्या सेन्याकडे तट बंदीकडे निर्दॆश करा.

21वाडीत बाबेलचा राजा रस्ता ओलांडण्यासाठी थांबेल, भविष्यकथन मिळवून घेण्यासाठी तो काही बाण हलवून मूर्ती पासून मार्गदर्शन मागेल, काळीजा वरुन तो तपासणी करेल.

22यरुशलेमेबद्दल पुढे घडून येणारी गोष्ट त्याच्या उजव्या हातात असेल, किल्ल्याचे दरवाजा फोडण्याचा हत्यार त्याविरुध्द असेल! त्यांच्या तोंडातून मारण्याचा, युध्दाची ओरड! त्यासाठी हत्यार वेशीसाठी तयार केले! त्यासाठी मातीचे टेकाड बुरुज बांधावे!

23पुढे घडुन येणारी ती उपयोग हीन बाब दिसून येईल, यरुशलेम पैकी एक, ज्याच्या कडे तरवार व तोंडात बाबेलांची शपथ आहे! पण त्याच्या वेढ्याच्या पुढे राजा उल्लंघन करणारा तहाचा आरोप केला जाईल.

24यास्तव यहोवा देव हे सांगत आहेः कारण तुझे अपराध माझ्या पुढे स्मरण केले जाईल तुझे अपराध प्रकट केले जातील! तू पाप सर्व क्रुतीत दर्शीवीले जातील यास्तव तू सर्वांच्या स्मरणात राहून तू आपल्या शत्रुच्या तावडीत सापडशील!

25तू पवित्रते बद्दल अनादर दाखवला आणि दुष्ट इस्त्राएलचे शास्ते त्यांच्यावर शासन करण्याचा दिवस येत आहे, त्याने केलेल्या अपराधांचा समय संपला आहे.

26प्रभु यहोवा देव हे सांगत आहेः आपल्या डोक्यावरील पगडी मुकुट बाजुला सारा! सर्व काही एक समान राहाणार नाही, जे उंचावलेले नमवले जातील आणि नम्र उंच केले जातील.

27मी सगळ्यांची नासाडी, नासाडी, नासाडी करेल, जमाव उरणार नाही, ज्याला हक्क आहे त्याला तो मिळेल.

28तर मग तू मानवाच्या मुला भाकित कर आणि बोल यहोवा देव हे सांगत आहेः अम्मोनच्या मुलांविषयी जो कलंक आहे तो त्यावर येत आहेः तरवार उचलली आहे ती अधाशीपणे ठार मारण्यासाठी तेजधार केली आहे ती विजेप्रमाणे चकाकत आहे!

29जोपर्यंत तुझ्यासाठी संदेष्टे पोकळ दर्शन बघत आहे. जोपर्यंत ते विधीवत बाबी त्यांच्यासाठी लबाड ठरत आहे जी ठार करण्यास सिध्द असलेली तरवार मानेवर लबाड ठरेल, जेव्हा शिक्षेचा दिवस येईल आणि अपराध करण्याच्या समयाचा शेवट होईल.

30तरवार म्यानात जाईल, तू ज्या ठिकाणी जन्मला तुझी जेथे सुरुवात झाली त्या भुमीवर मी तुझा न्याय करेल.

31मी तुझ्यावर माझा कोपाग्नीचा संताप ओतेल आणि तुला क्रुर कोशल्याने हानी करण्यास लोकांच्या ताब्यात देईन.

32तू अग्नीसाठी इंधन होशील! तुझे रक्त भुमीच्या मध्यभागी सांडले जाईल. तुझे स्मरण पुन्हा केले जाणार नाही. “मी यहोवा देव हे जाहीर करतो!”


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Ezekiel 21 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran