Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Ezekiel 19 >> 

1मग तू इस्त्राएलाच्या पुढाऱ्यांच्या आक्रोशा विरुध्द दिगंत हो

2आणि म्हण तुझी आई कोण? सिंहीण, आपल्या छाव्यासोबत राहाते तरुण सिंहाच्या मध्ये ती आपल्या छाव्याचे पालनपोषण करते.

3आणि ती आपल्या छाव्याचे पोषण करून त्याला तरुण सिंह बनवते जो आपल्या शिकारीला फाडून टाकतो. तो माणसाला खाऊन टाकते.

4मग राष्ट्रांना त्याची वार्ता ऐकु येते, तो त्याच्याच पाशात अडकला जातो, आणि त्याला आकडीने धरुन मिसरात घेऊन गेले.

5मग जरी तीने हे पाहीले तरी त्याची परतण्याची ती वाट बघते, तिची आशा आता निघुन गेली, मग तीने आपल्या दुसऱ्या छाव्याला घेतले आणि त्याची वाढ तरुण सिंह होण्यास केली.

6हा तरुण सिंह इतर सिंहांच्या मध्ये हिंडू फिरु लागतो, तो तरुण सिंह असता त्याने आपल्या शिकारीला फाडुन टाकणे शिकलाः त्याने माणसांना खाऊन टाकले.

7मग त्याने विधवांवर बलात्कार केले आणि शहराला देशोधडीला लावले, त्याची भुमी पुर्णपणे बेबंदशाहीने भरली कारण त्याच्या गर्जनेचा आवाज दुमदुत होता!

8सर्व प्रांतातुन एकवटून सर्व देशचे लोक त्याच्या विरोधात जमलेः त्यांनी त्याच्या भवती जाळे टाकले. त्याला पाशात पकडले.

9त्याला पिंजऱ्यात कोंडून ताळेंबंद केले आणि बाबेलच्या राज्या पुढे आणले, त्यांना त्याला तटबंदी असलेल्या डोंगरावर नेले यास्तव त्याचा स्वर इस्त्राएलाच्या घराण्याला आता ऐकु जाणार नाही.

10तुझी आई पाण्या जवळ लावलेली द्राक्षाचे झाड्सारखी होती ती फलद्रुप व फांद्यांनी बहरलेली अशी होती कारण तेथे भरपूर पाणी होते.

11तीच्या कडे न्यायाचा बळकट राजदंड आहे आणि तीची उंची दाट रानाच्या फांद्यांच्या वर गेलेली होती.

12पण द्राक्षाच्या झाडाला मुळासकट त्वेषाने उपटून टाकले आणि भुमीवर फेकून दिले, पुर्वे कडील वाऱ्याने तीच्या फळांना सुकून टाकले.

13मग तीला ओसाड प्रदेशात लावले जेथे पाऊस नाही आणि तहाण आहे.

14तीच्या दाट फांद्यांना अग्नीने होरपळले आणि फळे खाऊन टाकले, तेथे आता बळकट फांदी उरली नाही, न्यायाचा राजदंड नाही, तेथे आक्रोश आणि रडगाणे आहे.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Ezekiel 19 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran