Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Ezekiel 13 >> 

1पुन्हा यहोवा देवाचा शब्द माझ्या कडे आला आणि तो म्हणाला

2मानवाच्या मुला इस्त्राएलाच्या भाकीत करणाऱ्या विरुध्द भाकीत आणि जे आपल्या बुध्दीने भाकीत करतात त्यांना सांग, यहोवा देवाचा शब्द ऐका!

3प्रभु देव यहोवा हे म्हणतोः मूर्ख संदेष्ट्यां बद्दल दिलगीरी आहे जे आपल्या स्वताःच्या आत्म्याचे अनुसरण करतात, पण आपले दर्शन बघत नाही.

4हे इस्त्राएला तुझे भाकित उजाड नापीक भुमीत कोल्ह्या सारखे आहेत.

5तुम्ही इस्त्राएलाच्या घराण्यात वेशी पाडण्यास गेला नाहीत तर वेशी बांधुन काढल्या नाही, यहोवा देवाच्या दिवशी युध्दात तुम्ही प्रतिकार केला नाही.

6लोकांना खोटा द्रुष्टांत आणि आणि खोटे भाकीत कळले आहे, जे कोणी म्हणते यहोवा देव अमुक तमुक जाहीर करीत आहे. यहोवा देवाने त्यांना पाठवले नसतांनाही त्यांनी लोकांना आशा दिली आहे, आणि त्यांनी दिलेला संदेश खरा ठरेल.

7तुम्ही खोटा द्रुष्टांत पाहीला नाही का आणि खोटे भाकीत केले नाही का, “तुम्ही म्हणता की अमुक तमुक यहोवा देव जाहीर करीत आहे” जेव्हा मी तसले काही बोललो नाही?

8यास्तव यहोवा देव असे सांगत आहेः कारण तुम्ही खोटा द्रुष्टांत पाहीला आणि खोटी बतावणी केली यास्तव ही यहोवा देवाचा हा खोटा जाहीरनामा तुझ्या विरुध्द आहेः

9माझा हात जे खोटे भाकीत करणाऱ्यां विरुध्द आहे, आणि खोटे दर्शन बघणाऱ्यां विरुध्द आहे, ते लोक माझ्या लोकांच्या सभेत येणार नाहीत, त्यांच्या नावाची नोंदणी इस्त्राएलाच्या घराण्यात होणार नाहीः ते इस्त्राएलाच्या भुमीत निश्चीत जाणार नाहीत. मग तुम्हाला कळेल मी यहोवा देव आहे!

10यास्तव माझ्या लोकांना भलतीकडेच जाण्यासाठी मार्गदर्शन केले आणि त्यांना शांती दिली जेथे शांती नव्हती, त्यांनी वेशी उभ्या केल्या आहे आणि त्यांना पांढरा रंग दिला आहे.

11आणि म्हणतात की जो कोणी पांढरा रंग देईल त्यांना म्हणा वेशी पडतीलःत्यांच्या वर मुसळ धार पाऊस पडून गारा पडून ते कोसळून जाईल व वादळाने उध्वस्त होईल.

12पहा वेशी पडतील, इतर तुम्हाला हे सांगणार नाही, “तुम्ही लावलेला पांढरा रंग कोठे आहे?”

13यास्तव यहोवा देव हे सांगत आहेः माझ्या संतापामुळे मी वादळ घेऊन येईल, आणि माझ्या क्रोधामुळे पुर येईल! गारा पडल्यामुळे समुळ नाश होईल!

14तुम्ही पांढऱ्या रंगाने आच्छादलेली वेशी मी पाडुन टाकेल त्यांना समुळ उध्वस्त त्यांच्या मध्य भागी मी करेल, मग तुम्हाला कळेल मी यहोवा देव आहे!

15मी आपल्या रागाची परीसीमा पांढऱ्या रंगाच्या वेशीवर करेल, मी तुम्हास सांगेल वेशी तेथे उभ्या नसणार व लोक त्यांना पांढरा रंगही लावणार नाही

16इस्त्राएलाचे भाकित करणारे ज्यांनी यरुशलेमची भविष्यवाणी केली ज्यांनी तीच्या शांतीचा द्र्ष्टांत पाहीला, पण तेथे शांती नाही! हे यहोवा देव जाहीर करीत आहे.

17म्हणून मानवाच्या मुला आपले तोड लोकांच्या मुलींपासुन फिरव जे आपल्या मनाचे भाकीत करतात, त्यांच्या विरुध्द भाकीत कर.

18सांग, यहोवा देव हे म्हणतोः लोकांच्या जीवाची पारध करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी पाश मांडून ठेवले आहे, निरनिरळ्या माणसांच्या उंचीच्या जाळ्या बनवतील तेव्हा तुम्ही हळहळ व्यक्त करून माझ्या लोकांच्या जीवाची शिकार करता, पण स्वताःला वाचवता.

19खोट्या गोष्टी ऐकून, जे मरु नये त्यांना ठार करून जे जगु नये त्यांना जगवून त्यांच्या अन्नांसाठी माझ्या लोकांचा उपमर्द केला आहे.

20यास्तव यहोवा देव म्हणतो, पहा ज्या पक्षाच्या पारधासाठी पाश मांडला आहे त्याला तोडून मी मार्ग करीन,

21ज्या आत्म्यांची तुम्ही पक्षासारखे पारध केली त्यांना स्वतंत्र केले. तेव्हा तुम्हाला समजेल मी यहोवा देव आहे.

22किंबहुन ज्या देवभीरुला मी खेदीत केले नाही त्याचे हृदय असत्य बोलून दुःख देता व वाईट मार्गापासुन पराव्रुत होऊ नये आणि आपल्या जीवाचा बचाव करु नये असे त्यांच्या बाहुंना ताकद देता.

23यानंतर विनाकारण दर्शन बघणे व देवी तिथी पहाणे हे संपुष्टात येईल; मी आपले लोक तुमच्या हातून सोडवेल, तेव्हा तुम्हाला समजेल मी यहोवा देव आहे.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Ezekiel 13 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran