Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Ezekiel 12 >> 

1यहोवा देवाचा शब्द माझ्या कडे आला आणि मला म्हणाला,

2“मानवाच्या मुला, तू या बंडखोर घराण्याच्या लोकांत राहतो, जेथे त्यांच्याकडे बघण्याचे डोळे आहेत पण ते बघू शकत नाहीः आणि त्यांच्याकडे कान आहेत पण ते ऐकू शकत नाही, कारण ते बंडखोर घराणे आहेत!

3तथापी मानवाच्या मुला तुझ्यासाठी सर्व काही हद्दपार करण्याची तयारी कर, आणि त्यांच्या डोळ्या देखत बाहेर निघून जा, मी तुला तुझ्या ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणावर हद्दपार करील. कदाचित त्यांना कळून येईल ते फितुर घराण्यातले आहेत.

4आणि तू बाहेर हद्दपार जातांना आपल्या वस्तु दिवसा ढवळ्या त्यांच्या डोळ्या देखत घेऊन जाशीलः बाहेर हद्दपार होतांना सायंकाळी त्यांच्या नजरे देखत निघून जा.

5त्यांच्या नजरे देखत भिंतीला (वेशीला) एक भगदड पाड, आणि त्यातून बाहेर निघ.

6त्यांच्या डोळ्यादेखत आपले सामान वस्तु आपल्या खांद्यावर घे, आणि त्यांना अंधारात घेऊन जा, आणि तोंड झाकून घे म्हणजे तुला जमीन दिसणार नाही, मी तुला इस्त्राएलाच्या घराण्यासाठी हे चिन्ह ठेवले आहे.”

7म्हणून मी हे केले, जसे तू मला बजावले, दिवसा ढवळ्या मी सर्व सामान बाहेर हद्दपार आणले, आणि सायंकाळी आपल्या हातांनी वेशीला भगदड पाडले. मी माझे सर्व सामान अंधारात बाहेर काढले आणि त्यांच्या डोळ्यादेखत सर्व आपल्या खांद्यावर घेउन आलो.

8मग यहोवा देवाचे शब्द मला प्रभात समयी आले आहे,

9“मानवाच्या मुला, हे इस्त्राएलाच्या घराण्या तू काय करतोस बंडखोर पणा तू केला नाहीस काय?”

10त्यांना म्हणाला यहोवा प्रभु देव हे सांगतोय ही भवीष्यात्मक क्रुती यरुशलेमच्या राजपुत्रांना, आणि सर्व येथे जमलेल्या इस्त्राएलाच्या घराण्यासाठी आहे.

11असे सांगा मी तुम्हासाठी खुण देतो की, जे मी केले ते सर्वांसाठी होईलः ते सर्वजण सरहद्दपार गुलामगिरीत जातील.

12त्यांच्यातला राजा अंधारात सामान आपल्या खांद्यावर घेऊन जाईल आणि तो वेशीच्या बाहेर निघुन जाईल. तो वेशीला भगदड पाडुन आपले सामान घेऊन जाईल, तो आपले तोंड झाकील, त्यामुळे आपल्या डोळ्यांनी जमीन बघणार नाही.

13मी आपली जाळी त्यांच्यावर टाकील आणि तो माझ्या फंद्यात पकडला जाईलः मग मी त्यांना बाबेलात खास्द्यांच्या देशात घेऊन जाईल, पण ती भुमी ते बघणार नाही त्यात त्यांचा अंत होईल.

14मी त्यांना सगळ्या अवती भवती असलेल्या त्यांच्या मदत करणाऱ्याना आणि त्यांच्या सेनेची पांगापांग करेल, आणि त्यांचा पाठलाग तरवारीने करेल.

15मग त्यांना कळेल मी यहोवा देव आहे, जेव्हा मी त्यांना देशातून संपुर्ण भुमीतून पांगवेल.

16पण त्यांच्यातील काही लोकांना तरवारीने, दुष्काळाने, आणि साथीच्या रोगाने पांगवेल, ज्या भुमीत मी त्यांना घेऊन गेलो तेथे त्यांना त्यांच्या घ्रुणास्पद गोष्टीची नोंद केलेली असेल, म्हणून त्यांना कळेल मी यहोवा देव आहे!

17यहोवा शब्द माझ्याकडे आला आणि म्हणाला,

18मानवाच्या मुला आपली भाकर थरथरत खाऊन टाक आणि आपले पाणी थरकापत आणि चिंतातुर होउन पिवून घे.

19मग त्या भुमीतील लोकांना सांग, यहोवा प्रभु देव हे यरुशलेम रहीवाशासंबंधी सांगतोयः इस्त्राएल निवासी तुम्ही आपली भाकर थरथर कापत खाल व पाणी प्याल आजपावोत तुमची भुमी लुटली जाईल कारण जे त्या ठिकाणी राहतात त्यांच्या हिंसेमुळे हे घडेल.

20म्हणून त्यांच्या राहात्या नगराला उध्वस्त केले जाईल आणि भुमी ओसाड नापीक होईलः मग तुम्हाला कळेल मी यहोवा देव आहे!

21पुन्हा यहोवा देवाचा शब्द माझ्या कडे आला आणि म्हणाला,

22मानवाच्या मुला इस्त्राएलाच्या भुमीत जी तुझी प्रसीध्द म्हण आहे, प्रदीर्घ दिवसात सर्व द्रुष्टांत वायफळ ठरतील?

23यास्तव त्यांना सांग यहोवा प्रभु देव हे म्हणतो मी या म्हणीला संपुष्टात आणिल यासाठी की इस्त्राएलात याचा पुन्हा कोणी वापर करणार नाही. “मग त्यांना जाहीर कर, दिवस जवळ येत आहे सर्व बोलके होतील”

24आता येथून पुढे कोणतेही पाखंडी द्रुष्टांत नसणार किंवा अनूकुल भविष्य कथन इस्त्राएलात होणार नाही.

25मी यहोवा देव आहे आणि मी बोलत आहे! मी बोललेले शब्द पूर्ण करेल. आता येथे उशिर होणार नाही. हे यहोवा देव बंडखोर घराण्याला जाहीर करतो की, मी बोललेले शब्द पूर्ण करतो.

26पुन्हा यहोवा देवाचा शब्द माझ्या कडे आला आणि म्हणाला,

27मानवाच्या मुला पहा! इस्त्राएलाचे घराणे म्हणेल जो दुष्ट्रांत अनेक दिवसा पासून पाहीला आणि पुढच्या काळासाठी भाकीत पूर्ण येत आहे.

28यास्तव त्यांना सांगा यहोवा देव असे म्हणतोः माझ्या शब्दाला उशीर होणार नाही, जो शब्द मी बोललो तो पूर्ण करणार आहे, हे यहोवा देव जाहीर करत आहे!


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Ezekiel 12 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran