Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Psalms 34 >> 

1मी सर्व समयी परमेश्वराला स्तुती देईन. माझ्या मुखात नेहमी त्याची स्तुती असेल.

2मी परमेश्वराची स्तुती करणार, विनम्र ऐकतील आणि आनंद करतील.

3तुम्ही माझ्याबरोबर परमेश्वराला स्तुती द्या. आपण एकत्र त्याच्या नावाल उंचावू.

4मी देवाकडे मदतीसाठी गेलो आणि त्याने मला उत्तर दिले. आणि त्याने मला माझ्या सर्व भयांवर विजय दिला.

5जे त्याच्याकडे पाहतील ते चकाकतील, आणि त्यांची मुखे कधीच लज्जीत होणार नाही.

6ह्या पीडलेल्याने आरोळी केली, आणि परमेश्वराने त्याचे ऐकले आणि त्याला त्याच्या सर्व संकटातून तारले.

7परमेश्वराचे भय धरणाऱ्यां भोवतो तो छावणी करतो. आणि त्याला वाचवतो.

8परमेश्वर किती चांगला आहे, ह्याचा अनुभव घेऊन पाहा. धन्य तो पुरुष जो त्याच्याठायी आश्रय घेतो.

9जे तुम्ही त्याचे निवडलेले आहा, ते तुम्ही परमेश्वराचे भय धरा. त्याचे भय धरणाऱ्यांस कशाचीच कमतरता भासत नाही.

10तरुण सिंहाना देखील उणे पडते आणि ते भुकेले होतात, परंतू जे परमेश्वराला शोधतात त्यांना कोणत्याही चांगल्या गोष्टींची उणीव पडणार नाही.

11मुलांनो माझे ऐका आणि मी तुम्हाला परमेश्वराचे भय कसे धरावे हे शिकवीन.

12सुख पाहण्यासाठी आयुष्याची इच्छा धरतो आणि दिवसांची आवड धरतो तो मनुष्य कोण आहे?

13तर वाईट बोलाण्यापासून आवर, आणि तुझे ओठ खोटे बोलण्यापासून आवर.

14वाईट कृत्ये करणे सोडून द्या आणि चांगली कृत्ये कर. शांतीशोध आणि तिच्यामागे लाग.

15परमेश्वराची दृष्टी न्यायीवर आहे, त्याचे कान त्याच्या आरोळीकडे असतात.

16परंतु परमेश्वर वाईट कृत्ये करणाऱ्यां विरुध्द आहे. तो त्यांची अाठवन पृथ्वीतून नाश करण्यावर आहे.

17न्यायी आरोळी करतो आणि परमेश्वर ते ऐकतो, आणि तो तुम्हांला तुमच्या सर्व संकटातून वाचवेल.

18जे हृदयाने तुटलेले आहेत, त्यांच्याजवळ परमेश्वर आहे. आणि तो खिन्न झालेल्या आत्म्यास तारतो.

19न्यांयीचे कष्ट पुष्कळ आहेत, परंतू परमेश्वर त्या सर्वांवर त्यांना विजय मिळवून देणार.

20परमेश्वर त्याच्या सर्व हाडाचे रक्षण करेल. त्यांतले एकही हाड तो मोडू देणार नाही.

21परंतु वाईट दुष्टाला मारुन टाकणार, जो नितीमानास द्वेषतो दोषी ठरवल्या जाईल.

22परमेश्वर त्याच्या सेवकाच्या आत्म्यांना तारेल. त्याच्यात आश्रय घेणारा कोणीही दोषी ठरवला जाणार नाही.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Psalms 34 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran