Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Psalms 35 >> 

1हे परमेश्वरा जे माझ्याशी विरोध करतात त्यांच्याशी तू विरोध कर. जे माझ्याविरुद्ध लढतात त्यांच्याविरुद्ध तू लढ.

2परमेश्वरा ढाल आणि साऱ्या शरीराचे रक्षण करणारी मोठी ढाल उचल. ऊठ आणि मला मदत कर.

3भाला आणि भाल्यासारखे दिसणारे शस्त्र यांनी माझा पाठलाग करणान्या लोकांशी लढ परमेश्वरा, माझ्या जीवाला सांग, “मी तुझे रक्षण करीन.”

4काही लोक मला मारायचा प्रयत्न करीत आहेत त्यांची निराशा करून त्यांना शरम वाटेल असे कर. त्यांना पाठ फिरवून पळून जायला लावते लोक मला दु:ख द्यायच्या योजना आखत आहेत. त्यांना गोंधळात अडचणीत टाक.

5त्या लोकांना वाऱ्यावर उडूनजाणारा कोंडा बनव. परमेश्वराच्या दूतांकरवी त्यांचा पाठलाग होऊ दे.

6परमेश्वरा, त्यांचा मार्ग अंधारमय आणि निसरडा होऊ दे. परमेश्वराचा दूत त्यांचा पाठलाग करु दे.

7मी काहीही चूक केली नाही तरी त्या लोकांनी मला जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला.

8म्हणून परमेश्वरा, त्यांना त्यांच्याच सापळ्यात अडकू दे. त्यांना त्यांच्याच जाळ्यात अडकून पडू दे. एखादे अनामिक संकट त्यांच्यावर कोसळू दे.

9नंतर मी परमेश्वराचा आनंद लुटीन. त्याने माझे रक्षण केले की मी आनंदी होईन.

10माझी सर्व हाडे म्हणतील, “परमेश्वरा, तुझ्यासारखा कोणीही नाही परमेश्वरा, तू सामर्थ्यवान लोकांपासून गरीबांना वाचवतोस. तू सामर्थ्यवानांपासून वस्तू घेऊन त्या गरीबांना आणि असहाय्य लोकांना देतोस.”

11साक्षिदारांचा समूह मला दु:ख द्यायचे कारस्थान करीत आहे. ते लोक मला प्रश्न विचारतील आणि ते काय बोलतात ते मला कळत नाही.

12मी फक्त चांगल्याच गोष्टी केल्या आहेत परंतु लोक माझ्या विरुध्द वाईट गोष्टी करतील. परमेश्वरा, मी ज्या चांगल्या गोष्टींसाठी पात्र आहे त्या मला दे.

13जेव्हा ते लोक आजारी पडले तेव्हा मला वाईट वाटले, अन्न न खाऊन मी माझे दु:ख प्रकट केले. त्यांच्यासाठी प्रार्थना करून मी हेच मिळवले का?

14मी त्या लोकांसाठी सुतकी कपडे घातले. मी त्या लोकांना माझ्या मित्रांसारखे किंवा भावासारखेवागवले. आई मेल्यावर रडणाऱ्या माणसाप्रमाणे मी दु:खी आहे. त्या लोकांसाठी दु:ख व्यक्त करायचे म्हणून मी काळे कपडे घातले. दुखात नतमस्तक होऊन मी वावरलो.

15परंतु मी जेव्हा चूक केली तेव्हा ते लोक मला हसले ते लोक सच्चे मित्र नव्हते. मी त्यांना नीट ओळखत देखील नव्हतो परंतु ते माझ्या भोवती गोळा झाले आणि ते त्यांनी माझ्यावर हल्ला केला.

16त्यांनी वाईट भाषा वापरली आणि माझी चेष्टा केली. त्यांनी माइयावरचा त्यांचा राग कराकरा दातखाऊन व्यक्त केला.

17परमेश्वरा, या वाईट गोष्टी घडत असताना तू किती वेळ नुसता बघत राहाणार आहेस? ते लोक माझा नाश करण्याचा प्रयत्न करीत आहेत परमेश्वरा, माझे प्राण वाचव, माझे प्रियप्राण त्या वाईट लोकांपासून वाचव. ते सिंहासारखे आहेत.

18परमेश्वरा, मोठ्या सभेत मी तुझी स्तुती करेन. मी सामर्थ्यवान लोकांबरोबर असेन तेव्हा तुझी स्तुती करेन.

19माझे खोटे बोलणारे शत्रू हसत राहाणार नाहीत. त्यांच्या गुप्त योजनांमुळे माझ्या शत्रूंना खरोखरच शिक्षा होईल.

20माझे शत्रू शांतीच्या योजना आखत नाहीत. या देशातील शांततापूर्ण लोकांना त्रास देण्यासाठीच माझे शत्रू गुप्तपणे योजना आखत आहेत.

21माझे शत्रू माझ्याविषयी वाईट बोलत आहेत. ते खोट बोलतात आणि म्हणतात, “हा तू काय करतोस ते आम्हाला माहीत आहे.”

22परमेश्वरा, काय घडत आहे ते तुला तरी दिसतं आहे ना? मग गप्प बसू नकोस मला सोडून जाऊ नकोस.

23परमेश्वरा, जागा हो! ऊठ माझ्या देवा, माझ्या परमेश्वरा माझ्यासाठी लढ आणि मला न्याय दे.

24परमेश्वरा, देवा तुझ्या न्यायी बुध्दीने मला न्याय दे त्या लोकांना मला हसू देऊ नकोस.

25“आम्हाला हवे होते ते मिळाले,” असे त्या लोकांना म्हणू देऊ नकोस. परमेश्वरा, “आम्ही त्याचा नाश केला” असे त्यांना म्हणू देऊ नकोस.

26माझ्या सगळ्या शत्रूंना शरम वाटावी, ते गोंधळून जावेत अशी माझी इच्छा आहे. माझ्याबाबतीत वाईट गोष्टी घडल्या तेव्हा ते लोक आनंदी होते ते माझ्यापेक्षा चांगले आहेत असे त्यांना वाटत होते. म्हणून ते लोक अपमानाने आणि लाजेने झाकोळून जावोत.

27काही लोकांना माझे चांगले व्हावे असे वाटते. ते सर्व लोक सुखी होवोत ते लोक नेहमी म्हणतात, “परमेश्वर महान आहे त्याच्या सेवकाचे भले व्हावे अशी त्याची इच्छा आहे.”

28म्हणून परमेश्वरा तू किती चांगला आहेस ते मी लोकांना सांगेन. मी रोज तुझी स्तुती करेन.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Psalms 35 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran