Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Psalms 33 >> 

1न्यायी जनहो! परमेश्वरामध्ये आंनद करा, न्यायी लोकांनो त्याची स्तुती करा.

2वीणा वाजवून परमेश्वराला धन्यवाद; दहा तारांच्या वाद्यावर त्याचे गुणगान गा.

3त्याच्यासाठी नवे गीत गा; मोठा आवाज करून कौशल्याने वाद्ये वाजवा.

4कारण परमेश्वरचे वचन सरळ आहे, आणि तो जे करतो प्रामिकपणाने करतो.

5देवाला चांगलुपणा आणि न्यायीपण प्रीय आहे, परमेश्वराच्या प्रेमदयेने पृथ्वी भरलेली आहे.

6परमेश्वराच्या शद्बाकडून आकाशे निर्माण झाली आणि त्याच्या मुखातील श्वासाने सर्व तारे निर्माण झाले आहेत.

7तो समुद्रातील पाणी ढीगा सारखे एकत्र करतो, तो समुद्र कोठारमध्ये ठेवतो.

8सर्व पृथ्वी परमेश्वरचे भया बाळगो, जगात राहणाऱ्या प्रत्येक त्याच्या भीतीत उभा राहो.

9कारण तो बोलला आणि ते झाले, त्याने आज्ञा केली आणि ते आपल्या ठिकाणी स्थिर झाले.

10राष्ट्रांचा उपदेश पमेश्वर मोडतो, तो लोकांच्या योजनांवर अधिकार करतो.

11परंतु परमेश्वराच्या योजना सर्वकाल राहतात, त्याच्या हृदयातील योजना पिढ्यानपिढ्या स्थिर राहतात.

12परमेश्वर ज्या राष्ट्राचा देव ते आशिर्वातीत आहे. ज्यांना त्याने आपल्या वतनाचे होण्यास निवडले आहे ते सुखी आहेत.

13परमेश्वराने स्वर्गातून खाली पाहतो, तो सर्व लोकांस पाहातो.

14तो आपल्या राहण्याच्या ठिकाणाहून पृथ्वीवर राहणाऱ्या सर्व लोकांकडे पाहतो.

15ज्याने सर्वांची हृदये घडवली तो त्या सर्वांचे कृत्ये पारखतो. तोच तो आहे.

16पुष्कळ सैन्य असल्याने राजा तारला जात नाही. वीर योद्धा त्याच्या सामर्थ्याने वाचतो असे नाही.

17घोडा विजयासाठी व्यर्थ आहे. त्याच्या पुष्कळ बळाने तो कोणाला वाचवू शकत नाही.

18पाहा! परमेश्वराची दृष्टी त्याच्या भय बाळगणाऱ्यांवर आहे. जे त्याच्या प्रेमदयेची आशा धरतात,

19त्यांना मरणापासून वाचवायला, आणि दुष्काळापासून वाचवायला त्याची दृष्टी त्यांच्यावर आहे.

20आम्ही परमेश्वराची वाट पाहू, तो आमचे साहाय्य आणि आमची ढाल आहे.

21त्याच्यामध्ये आमचे हृदय हर्ष पावते, कारम आम्ही त्याच्या पवित्रतेत विश्वास ठेवतो.

22परमेश्वरा, आम्ही तुझी आशा धरली आहे त्याप्रमाणे तुझी प्रेमदया अाम्हाबरोबर असू दे.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Psalms 33 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran