Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Psalms 120 >> 

1माझ्या संकटात मी परमेश्वराकडे मोठ्याने ओरडलो आणि त्याने मला उत्तर दिले.

2हे परमेश्वरा, जे कोणी आपल्या ओठाने खोट बोलतात आणि आपल्या जिभेने फसवतात त्यापासून माझा जीव सोडीव.

3हे कपटी जिभे,तुला काय दिले जाईल आणि आणखी तुला काय मिळणार. ?

4तो योद्ध्याच्या धारदार बाणांनी, रतम लाकडाच्या जळत्या निखाऱ्यावर बाणाचे टोक तापवून तुला मारील.

5मला हायहाय कारण मी तात्पुरता मेशेखात राहतो, मी पूर्वी केदारच्या तंबूमध्ये राहत होतो.

6शांतीचा तिरस्कार करणाऱ्यांबरोबर मी खूप काळ राहिलो आहे.

7मी शांतीचा माणूस आहे असे जेव्हा मी बोलतो पण तेव्हा ते युध्दासाठी तयार होतात.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Psalms 120 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran