Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Psalms 121 >> 

1मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो. मला मदत कोठून येईल?

2परमेश्वर जो आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करणारा त्याकडून माझी मदत येते.

3तो तुझा पाय घसरू देत नाही; जो तुझे संरक्षण करतो तो कधीहि स्वस्थ झोपत नाही.

4पाहा,इस्राएलाचा रक्षणकर्ता कधीच स्वस्थ झोपत नाही किंवा कधीही झोपत नाही.

5परमेश्वर तुझा रक्षणकर्ता आहे; परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला सावली आहे.

6दिवसा तुला सूर्य किंवा रात्री चंद्र तुला नुकसान करणार नाही.

7परमेश्वर सर्व वाईटापासून तुझे रक्षण करील; तो तुझ्या जिवाचे रक्षण करील.

8परमेश्वरा तुला जे सर्व काही तू करशील त्यात आता आणि सदासर्वकाळ रक्षण करील.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Psalms 121 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran