Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Judges 21 >> 

1आता इस्त्राएली माणसानी मिस्पात असी शपथ वाहिली होती की, आमच्यांतला कोणीहि आपल्या मुली बन्यामिनाला लग्नासाठी देणार नाही.

2नंतर लोक बेथेलास गेले आणि संध्याकाळपर्यंत देवापुढे बसून राहिले, आणि मोठ्याने आवाज करून फार दु:खाने रडले.

3ते मोठ्याने म्हणाले, हे इस्त्राएलाच्या देवा परमेश्वरा, इस्त्राएलांत असे का झाले की आज इस्त्राएलांतून एक वंश नाहीसा झाला आहे.

4नंतर दुसऱ्या दिवशी लोकांनी पहाटेस लवकर उठून तेथे वेदी बांधली, आणि होमार्पण व शांत्यर्पण यज्ञ केले.

5इस्त्राएली लोक म्हणाले, इस्त्राएली सर्व वंशांतला जो कोणी मंडळीत परमेश्वरजवळ चढून आला नाही, असा कोण आहे? कारण जो कोणी परमेश्वरजवळ मिस्पात चढून आला नाही. त्याविषयी अशी महत्वाची शपथ केली होती. ते म्हणाले, त्याला अवश्य जिवे मारावे.

6इस्त्राएलाच्या लोकांनी आपला भाऊ बन्यामीन याविषयी कळवळा करून म्हणाले, आज इस्त्राएलातून एक वंश कापला गेला आहे;

7जे उरलेले आहेत त्यांच्यासाठी कोण बायकांची तरतूद करील? कारण आम्ही परमेश्वरजवळ शपथ वाहिली की, आम्ही आपल्या मुलीतल्या कोणीहि त्यांस लग्न करून देणार नाहीत.

8त्यांनी म्हटले, इस्त्राएलाच्या वंशांतला जो कोणी मिस्पात परमेश्वर देवा जवळ चढून आला नाही; असा कोण आहे? तेव्हा याबेश गिलादांत कोणी मंडळीत आला नव्हता ते त्यांना कळाले.

9कारण लोकाची मोजणी घेतली गेली, तेव्हां पाहा, याबेश गिलादाच्या तेथल्या राहणाऱ्यापैकी कोणी तेथे आला नव्हता.

10मंडळीने अतिशूर असे बारा हजार पुरुष सूचना देऊन याबेश गिलादाकडे पाठवले, आणि तुम्ही जाऊन त्यांच्यावर हल्ला करा आणि बायकाना व मुलांनासुद्धा तरवारीने मारा.

11हे करा, तुम्हाला जे करायचे ते हेच की सर्व पुरुष आणि त्या प्रत्येक स्त्रीचा जिचा पुरुषाशी लैंगीक संबंध आला आहे, त्यांचाही नाश करावा.

12तेव्हा याबेश गिलादाच्या राहणाऱ्यांमध्ये ज्यांचा पुरुषाशी संबंध आला नव्हता, अशा चारशें कुमारी त्यांस मिळाल्या आणि त्यानी त्यांस कनान देशांत शिलो छावणीत आणले.

13तेव्हां सर्व मंडळीने रिम्मोन खडकावर जे बन्यामीनी लोक रहात होते त्यांच्याकडे निरोप पाठवून आणि त्यांच्याशी शांतीचे बोलणे केले.

14यास्तव त्या वेळेस बन्यामिनी माघारे आले, आणि त्यांनी यावेश गीलादांतल्या स्त्रिया त्यांस बायका करून दिल्या; परंतु त्या सर्वास त्या पुरल्या नाहीत.

15लोकांना बन्यामिनाविषयी दु:ख वाटले कारण की, परमेश्वराने इस्त्राएलाच्या वंशांत फाटाफूट केली होती.

16यास्तव मंडळीच्या वडिलांनी म्हटले, जे उरलेले त्यांस बायका मिळण्याविषयी आम्ही काय करावे? कारण बन्यामिनी स्त्रियांना मारून टाकले होते?

17आणखी त्यांनी म्हटले, इस्त्राएलापासून एक वंश नाश होऊ नये, म्हणून बन्यामिनाच्या ठरलेल्यांस वतन मिळावे.

18आम्ही आपल्या कन्यांतून त्यांस स्त्रिया करून देऊ शकत नाही. कारण इस्त्राएलाच्या लोकांनी अशी शपथ वाहिली होती की, जो बन्यामीनाला बायको करून देतो, तो शापित होईल.

19नंतर ते म्हणाले, शिलोमध्ये परमेश्वर देवासाठी दरवर्षी मेजवाणीअसते, ते बेथेलच्या उत्तरेस, जो रस्ता बेथेलापासून शखेमास चढून जातो, त्याच्या पूर्वेकडे आणि लबानोच्या दक्षिणेस आहे.

20त्यांनी बन्यामिनी लोकांस अशी आज्ञा दिली की तुम्ही द्राक्षमळ्यामध्ये जा आणि गुप्तजागी लपून रहा.

21मग तुम्ही जेव्हा शिलोतल्या मुली नाचावयाला निघतील, तेव्हा तुम्ही द्राक्षमळ्यांतून बाहेर निघून प्रत्येकाने आपल्यासाठी शिलोतल्या मुलीतून बायको करून घ्यावी, मग बन्यामीनाच्या देशास परत मागे जावे.

22जेव्हा त्यांचे बाप किवा त्यांचे भाऊबंद होऊन आमच्याजवळ निषेध करण्यास येतील, तेव्हां आम्ही त्यांस सांगू, तुम्ही त्यांना राहू द्या आम्हावर कृपा करा! कारण लढाईत आम्हाला त्यांतील एकएकासांठी बायको मिळाली नाही. आणि तुम्ही शपथेविषयी दोषी नाहीत, कारण तुम्ही त्यांस तुमच्या मुली दिल्या नाहीत नाही.

23यास्तव बन्यामिनाच्या लोकांनी तसे केले की आपल्या संख्येप्रमाणे मुली पकडून बायका करून घेतल्या. नंतर ते माघारे आपल्या वतनावर गेले, आणि तेथली नगरे बांधून त्यांत राहिले.

24नंतर त्या वेळेस इस्त्राएली लोक तेथून आपापल्या वंशाकडे व आपापल्या वतनावर गेले.

25त्या दिवसांत इस्त्राएलावर कोणी राजा नव्हता. प्रत्येकजण आपल्या दिसण्यास जे बरे ते करीत होता.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Judges 21 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran