Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Judges 20 >> 

1नंतर दानापासून बैर शेबापर्यंत आणि गिलाद देशातील सर्व इस्त्राएल लोक यासह बाहेर येऊन आणि एक मन होऊन परमेश्वराजवळ मिस्पात एकत्र जमा झाली.

2लोकांचे सर्व पुढारी, इस्राएलाचे सर्व वंश, देवाच्या लोकांच्या मंडळीत जागा असणारे असे चार लाख पायदळ, जे तरवारीने लढण्यास तयार होते.

3आता बन्यामीनी लोकांनी ऐकले की, इस्राएल लोक मिस्पात गेले आहेत. तर इस्राएलाचे लोक म्हणाले, आम्हाला सांगा, ही वाइट गोष्ट कशी झाली?

4तो लेवी ज्याच्या बाईचा खून झाला होता तिच्या नवऱ्याने उत्तर दिले, मी आणि माझी उपपत्नी बन्यामीनाच्या प्रदेशातील गिबा येथे रात्र घालवण्यासाठी येऊन उतरलो.

5गीबाच्या नातेवाईकांनी रात्री माझ्यावर हल्ला करण्यासाठी घराच्या सभोवताली वेढा दिला आणि मला मारण्याचा त्यांचा हेतू होता. त्यांनी माझ्या उपपत्नीवर बलात्कार केला आणि ती मेली.

6मी आपल्या उपपत्नीला घेऊन तिच्या शरीराचे तुकडे तुकडे केले, आणि ते इस्राएलाच्या वतन भागातील सर्व प्रांतात पाठवले, कारण की त्यानी इस्राएलांत दुष्टपणा आणि बलात्कार केला आहे

7आता, तुम्ही सर्व इस्राएली लोकांनो, बोला आणि तुमचा सल्ला द्या आणि ह्याकडे लक्ष द्या.

8सर्व लोक एक मन होऊन एकत्र उठले आणि ते म्हणाले, आमच्यातला कोणी आपल्या तंबूकडे जाणार नाही आणि कोणी आपल्या घरी परत जाणार नाही.

9परंतु आता आम्ही गिब्याचे हे असे करणार आहे. आम्ही चिठ्या टाकून मार्गदर्शन घेतल्यावर हल्ला करायच ठरवू.

10आम्ही इस्राएलाच्या सर्व वंशांतून शंभरातले दहा माणसे व हजारातले शंभर, व दहा हजारातले एक हजार, इतकी माणसे ते लोकांसाठी अन्नसामग्री आणायला घेऊ आणि म्हणजे त्यानी जाऊन बन्यामीनाच्या गिब्याने इस्राएलांत जे दुष्टपण केले, त्या प्रमाणे त्यांनी त्यांना शिक्षा करावी.

11मग इस्राएलांतले सर्व सैन्य एका हेतूने एकत्र येऊन त्या नगराविरूध्द जमली.

12तेव्हा इस्राएल लोकांनी बन्यामिनाच्या सर्व वंशांत माणसे पाठवून विचारले, तुमच्यामध्ये जे दुष्टपण झाले, ते हे काय आहे?

13तर आता तुम्ही गिब्यांतली जे दुष्ट लोक आहेत ते आम्हाला काढून द्या, म्हणजे आम्ही त्यांस जीवे मारू आणि इस्राएलांतून पूर्ण दुष्टाई काढून टाकू परंतु बन्यामीनी लोकांनी आपले भाऊ इस्राएली लोक यांचे ऐकले नाही.

14आणि बन्यामीनी लोक इस्राएली लोकांविरूध्द लढण्यास आपल्या नगरांतून गिब्याजवळ लढण्यास तयार झाली.

15त्या दिवशी बन्यामीनी लोकांनी आपल्या नगरांतून सव्वीस हजार तरवारीने लढाई करण्याचे शिक्षण घेऊन तयार झालेले सैन्य बरोबर घेतले; त्यात गिब्यांत राहणारे ते सातशें निवडलेल्या पुरुषांची भर घातली.

16त्या सर्व लोकांतले सातशें निवडलेले पुरुष डावखुरे होते; त्यांच्या प्रत्येकाचा गोफणीच्या गोट्याचा नेम एक केसभर देखील चुकत नसे.

17बन्यामीनी सोडून, इस्राएली सैन्य चार लाख माणसे, तरवारीने लढण्याच शिक्षण घेऊन तयार झालेले होते. ते सर्व लढाऊ पुरुष होते.

18मग इस्राएल लोक उठून बेथेलापर्यत गेली, आणि त्यांनी देवापासून सल्ला विचारला. त्यांनी विचारले, बन्यामिनी लोकाशी लढायला आमच्यातून पहिल्याने कोणी जावे? परमेश्वर देवाने सांगितले, यहूदाने पहिल्याने जावे.

19इस्राएली लोक सकाळी उठले आणि गिब्या समोर लढाईची तयारी केली.

20मग इस्राएली सैन्य बन्यमिनीविरूध्द लढायाला बाहेर गेले, त्यांनी त्यांच्या विरूध्द गिबा याठिकाणी लढाईची रचना केली.

21तेव्हा बन्यामिनी सैन्यानी गिब्यांतून निघून आणि त्या दिवशी इस्राएली सैन्यांतील बावीस हजार माणसांस मारले.

22तथापि इस्राएली सैन्य शक्तीशाली होऊन जेथे आपण पहिल्या दिवशी लढाई लावली होती, त्या ठिकाणीच व्यूह रचना केली.

23आणि इस्राएली लोक वर गेली आणि परमेश्वरापुढे संध्याकाळपर्यंत रडली. आणि त्यांनी परमेश्वराला विचारले, आमचा भाऊ बन्यामीन याच्या लोकांशी लढण्यास मी पुन्हा जावे काय? आणि परमेश्वर मला म्हणाला त्यांवर हल्ला कर.

24यास्तव दुसऱ्या दिवशी इस्राएली सैन्य बन्यामिनी सैन्याविरूध्द गेली.

25दुसऱ्या दिवशी, बन्यामीन गिब्यांतून त्यांच्याविरूध्द निघाले, आणि त्यांनी इस्राएली सैन्यातील अठरा हजार माणसांस मारले, हे सर्व तरवारीने लढाईच शिक्षण घेतलेले होते.

26नंतर सर्व इस्राएली सैन्य आणि सर्व लोक चढून बेथेल येथे गेले आणि रडले, आणि त्यानी तेथे परमेश्वर देवासमोर बसले आणि त्या दिवशी संध्याकाळपर्यंत उपास केला, आणि परमेश्वरास होमार्पण व शांत्यर्पणे अर्पण केले.

27आणि इस्राएली लोकांनी परमेश्वर देवाला विचारले, कारण त्या दिवसांत देवाच्या कराराचा कोश तेथे होता.

28आणि अहरोनाचा पुत्र एलाजार याचा पुत्र फिनहास त्या दिवसांत त्याची सेवा करत होता; काय, आम्ही आपला भाऊ बन्यामीन याच्या लोकांविरूध्द लढण्यास परत जावे काय किंवा थांबावे? तेव्हा परमेश्वर देव म्हणाला, तुम्ही चढून जा; कारण उद्या मी तुम्हाला त्यांचा पराजय करण्यास मदत करीन.

29मग इस्राएल लोकानी गिब्याच्या भोवताली गुप्तजागी माणसे ठेवले.

30मग तिसऱ्या दिवशी इस्राएली लोक बन्यामिनाच्या लोकांविरूध्द लढली आणि पूर्वीप्रमाणे त्यानी गिब्याजवळ रचना केली.

31तेव्हां बन्यामिनी लोक गेली आणि लोकांविरूध्द लढली आणि त्यांना नगरापासून काढून घेऊन दूर गेली. त्यांनी कांही लोकांस मारण्यास सुरवात केली. त्यातला एक रस्ता बेथेलास आणि दुसरा गिब्याकडे जातो, त्यात इस्राएलापैकी सुमारे तीस पुरुष शेतात त्यांनी मारले;

32यास्तव बन्यामिनी लोकांनी म्हटले त्यांचा पराजय झाला आहे आणि पहिल्यासारखे ते आमच्यापुढून पळून जात आहे. परंतु इस्राएली सैन्य म्हणाले आम्ही मागे पळू आणि त्यांना नगरांतल्या रस्त्या पासून दूर काढून आणू.

33सर्व इस्राएली सैन्य त्यांच्या जागेवरून उठले आणि बालतामार येथे लढाईसाठी व्यूह रचना केली. नंतर इस्त्राएल सैन्य गुप्तजागी लपून बसले होते ते आपल्या जागेतून मारेगिबा येथून अचानक उठले.

34सर्व इस्राएलांतले निवडलेले दहा हजार पुरुष गिब्यापुढे आले आणि भयंकर लढाई झाली, तथापि बन्यामिन्यांना समजले नव्हते की, आपत्तीआपल्याजवळ आली आहे.

35तेव्हा परमेश्वर देवाने बन्यामिनाला इस्राएलापुढे पराजित केले. त्या दिवशी बन्यामिन्यांची पंचवीस हजार आणि शंभर पुरुष मारले गेले. त्या सर्वाना तरवारीने लढण्याचे शिक्षण देण्यात आले होते.

36बन्यामिनी लोकांनी पाहिले की आपण पराजित झालो आहोत. हे असे झाले की इस्राएली मनुष्यानी गिब्यावर जे दबा धरून ठेवले होते, त्यांचा भरवसा धरला म्हणून ती बन्यामिनी माणसांपुढून बाजूला झाली.

37नंतर दबा धरून बसणारे उठले आणि पटकन आणि त्यांनी गिब्यात जाऊन आणि त्यानी त्यांच्या तरवारीने नगरात राहणाऱ्या प्रत्येकाला मारले.

38आता दबा धरणारे आणि इस्राएली सैन्यात सांकेतिक खूण ठरली होती की त्यांनी नगरांतून उंच धूराचा लोळ चढवावा.

39आणि इस्राएली सैन्य लढाईत मागे फिरू लागले; आता बन्यामिन्याने हल्ल्यास सुरवात केली आणि इस्राएलातली सुमारे तीस माणसे मारले आणि त्यांनी म्हटले, खात्रीने पाहिल्या लढाईसारखे ते आमच्यापुढे पराजित झालेत.

40परंतु नगरांतून धुराचा लोळ उंच चढू लागला, तेव्हा बन्यामिनानी आपल्या पाठीमागे वळून पाहिले आणि संपूर्ण नगरातून धुराचा लोळ आकाशांत चढत आहे.

41नंतर इस्राएली सैन्य मागे फिरून त्यांच्याविरूध्द उलटले. बन्यामिनी माणसे फार घाबरले, कारण त्यानी पाहिले की, आपल्यावर अरिष्ट आले आहे.

42यास्तव ते इस्राएलाच्या सैन्यापुढून रानाच्या वाटेने निसटून पळाले; तथापि लढाईने त्यांना गाठले. इस्त्राएलाच्या सैन्यानी बाहेर येऊन आणि जिथे कोठे उभे होते त्यांस मारले.

43त्यांनी बन्यामिनांस चोहोकडून वेढले आणि त्यांच्या पाठीस लागले; त्यांनी मनूहागिब्यासमोर पूर्वेकडे त्यांस पायदळी तुडवून मारले

44बन्यामिनातले अठरा हजार सैन्य मारले गेले; ते सर्व माणसे लढाईत प्रसिध्द होते.

45ते मागे फिरले आणि रीम्मोन खडकाच्या रानात पळून गेले. तथापि त्यांनी त्यांतले पांच हजार पुरुष रस्त्यावर वेचून मारले, आणि गिदोमापर्यंत त्यांचा पाठलाग करून त्यांतले दोन हजार अधीक पुरुष मारले.

46त्या दिवशी बन्यामिनांतले जे सर्व पडले ते तरवारीने लढाईचे शिक्षण घेतलेले आणि अनुभवी पंचवीस हजार पुरुष होते; ती सर्व लढाईत प्रसिध्द शूर माणसे होती.

47परंतु सहाशें पुरुष फिरून रानांत रिम्मोन खडकावर पळून गेले. आणि ते रिम्मोन खडकावर चार महीने राहिले.

48नंतर इस्त्राएली सैन्यांनी मागे फिरून बन्यामीन लोकांच्याविरूध्द जाऊन हल्ला केला आणि नगरातली सर्व माणसे व गुरेढोरे आणि जे काही त्यांना सापडले ती प्रत्येक गोष्ट त्यांनी मारली, आणि त्यांच्या मार्गातील प्रत्येक नगर त्यांनी आग लावून आग लावून जाळून टाकले.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Judges 20 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran