Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Ruth 1 >> 

1मग असे झाले की शास्ते राज्य करत असता त्या देशात दुष्काळ पडला. आणि यहूदातील बेथलेहेम येथील कोणी एक माणूस आपली पत्नी व दोन मुलांसह मवाब देशी गेला.

2आणि त्या माणसाचे नाव अलिमलेख आणि त्याच्या पत्नीचे नाव नामी होते व त्याच्या दोन मुलांची नावे महलोन व खिल्लोन अमून ती एफ्राथा यहूदातील बेथलेहेम येथील होती. ती मवाब देशी राहण्यास गेली.

3आणि नामीचा पती अलीमलेख मरण पावला आणि तिच्या दोन मुलांबरोबर ती मागे राहिली.

4आणि त्या दोघांनी दोन मवाबी स्त्रिया बायका केल्या. एकीचे नाव अर्पा आणि दुसरीचे नाव रूथ होते, आणि ते तेथे जवळपास दहा वर्षे राहिली.

5मग महलोन व खिल्लोन मरण पावले. याप्रमाणे नामी आपला पती व दोन मुले यांच्यामागे एकटी राहिली.

6देवाने आपल्या लोकांस अन्न पुरविले आहे आणि मदत केली आहे हे तिने ऐकले तेव्हा आपल्या दोन्ही सुनांसह ती मवाब देशातून परत यहूदा देशात जाण्यास निघाली.

7आणि ती आपल्या दोन्ही सुनांसह राहत होती त्याठिकाणाहून परत यहूदा देशास जाण्यास निघाली.

8आणि नामी आपल्या दोन्ही सुनांस म्हणाली, तुम्ही दोघी आपआपल्या आईच्या घरी जा. तुम्ही जशी मेलेल्यांवर आणि माझ्यावर दया केली तशी देव तुमच्यावर करो. "

9देव करो आणि तुम्हाला दुसऱ्या पतीच्या घरी विसावा मिळो आणि तिने त्यांचे चुबन घेतले व त्या मोठ्याने रडू लागल्या.

10आणि त्या तिला म्हणाल्या आम्ही तुझ्याबरोबर तुझ्या लोकांकडे येणार.

11नामी म्हणाली, माझ्या मुलींनो, परत जा, तुम्ही मजबरोबर कां येता? माझ्या पोटी का आणखी पुत्र आहेत की ते तुमचे पती होतील?

12माझ्या मुलींनो माघारी जा. मी आता म्हातारी झाले आहे. पती करण्याचे माझे वय नाही. जर मला पती मिळण्याची आशा आहे असे मी म्हटले तरी व आज रात्रीच तो मिळाला आणि मला पुत्रही झाले,

13तरी ते मोठे होऊपर्यत तुम्ही त्यांची वाट पाहाल का? तुम्ही आता लग्न न करता पतीशिवाय राहाल का आणि त्याची वाट पहाल का? माझ्या मुलींनो, तुम्हाला होणाऱ्या दुःखासाठी मी फार दुःखी होत आहे, कारण देवाचा हात माझ्याविरूध्द फिरला आहे.

14आणि तिच्या सुना मोठा आवाज काढून आणि पुन्हा रडू लागल्या. अर्पाने आपल्या सासूचे चुंबन घेतले. परंतु रूथ तिला धरून राहिली.

15मग ती तिला म्हणाली, ऐक तुझी जाऊ आपल्या लोकांकडे व देवाकडे परत गेली आहे. तर तूही आपल्या जावेच्या मागून जा.

16आणि रूथ म्हणाली मला सोडून जा आणि माझ्यापासून दूर जा अस मला सांगू नका तुम्ही जिथे जाल तिथे मी येईल, तुम्ही जिथे राहाल तिथे मी राहील तुमचे लोक ते माझे लोक, तुमचा देव तो माझा देव.

17तुम्ही मराल तिथे मी मरेल व तिथेच मला पुरले जाईल. मरणाशिवाय कश्यानेही तुमचा माझा वियोग झाला तर यहोवा मला शिक्षा करो किंवा त्यापेक्षा अधिक करो.

18आणि रूथने आपल्याबरोबर जाण्याचा दृढनिश्चय केला आहे हे नामीने पाहिले तेव्हा तिने तिच्याबरोबर वादविवाद करण्याचे थांबवले.

19मग त्या दोघी बेथलेहेमात चालत पोहचल्या. आणि बेथलेहेमात आल्यावर सर्व नगर त्याच्यासाठी खूप गलबलून गेले आणि स्त्रिया म्हणू लागल्या, हीच का ती नामी?

20आणि ती त्यांना म्हणाली, मला नामी म्हणू नका, तर मला दु:खदायक म्हणा कारण सर्वसमर्थाने मला फारच दुःखीपणाने वागवले आहे.

21मी भरलेली गेले आणि यहोवाने मला रिकामी परत आणले, यहोवाने माझ्याविरूध्द साक्ष दिली आहे आणि त्या सर्वसमर्थाने मला दु:खीत केले आहे म्हणून तुम्ही मला नामी का म्हणता?

22याप्रमाणे नामी आणि तिची मवाबी सून रूथ हिला घेऊन मवाब देशातून परत आली आणि त्या बेथलेहेमात आल्या तेव्हा सातूचा हंगामास आरंभ झाला होता.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Ruth 1 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran