Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Daniel 9 >> 

1दारयावेश राजा जो अहश्वेरोशाचा पुत्र मेदी वंशातून आलेला तो अहश्वेरोश ज्यास खास्द्यांचा राजा करण्यात आले होते.

2दरयावेशाच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी मी दानीएल, परमेश्वराचे वचन असलेल्या पुस्तकाचा अभ्यास करत होतो, ते वचन जे यिर्मया संदेष्टयाच्याद्वारे प्राप्त झाले. माझ्या लक्षात असे आले की, यरुशलेमेच्या ओसाड दशेचा वेळ पुरा होण्यास सत्तर वर्षे लागतील.

3मी हे जाणून माझे मुख देवाकडे वळवले. यासाठी त्यास प्रार्थना आणि विनंती, उपास करून, गोणताट नेसून आणि राखेत बसून त्याचे मुख शोधावे.

4मी माझा देव, “परमेश्वराची प्रार्थना करून पापांची कबूली दिली. मी म्हणालो, हे थोर आणि भयावह देवा, तू महान आहे, जे तुझ्यावर प्रेम करतात व तूझ्या आज्ञा पालन करतात त्यांच्याशी तू आपला करार पाळतो.

5आम्ही पाप केले आणि आम्ही कुटीलतेने वागलो आणि बंड झालो तुझे नियम आणि तुझ्या निधीपासून वळलो.

6तुझे दास ने संदेष्टे तुझ्या नामाने आमचे राजे, सरदार वडिल आणि देशाचे सर्व लोक हयांच्याशी बोलले तेव्हा आम्ही ऐकले नाही.

7आमच्या देवा, हे परमेश्वरा धार्मिकता, न्यायत्व तुझे आहे तथापी आज आमची तोंड लज्जीत झाली आहे. यहूदाचे यरुशलेमेत राहणारे सर्व इस्त्राएलाचे सर्व निवासी त्यात आहेत, त्यांनी तुझ्या विरुद्ध केलेल्या अपराधामुळे, त्यांना तू सर्व देशात विखुरले होते कारण आम्ही तुझ्या विरोधात पाप केले.

8हे परमेश्वर आमच्या तोंडाला काळे लागले आहे कारण आमचे राजे, आमचे सरदार आणि पूर्वज आम्ही सर्वांनी तुझ्या विरोधात पाप केले आहे.

9आमचा देव परमेश्वर दयेचा व क्षमेचा सागर आहे; आम्ही त्याच्याबरोबर फितुरी केली.

10आम्ही आपला देव यहोवा याची वाणी ऐकली नाही तसेच जी त्याने आपल्या नियमशास्त्राद्वारे त्याच्या संदेष्टयाकडून दिली होती.

11सर्व इस्त्राएलाने तुझी वाणी नाकारुन ते तुझ्या नियमाशास्त्राविरोध पाप केले आहे देवाचा सेवक मोशे यांच्याद्वारे लिहिलेल्या शापाचा आणि शपथेचा वर्षात आमच्यांवर झाला आहे कारण त्याच्या विरोधात पाप केले.

12यहोवाने आमच्या आणि आमच्या शासकाच्या विरोधात बोललेल्या वचनाची खात्री आमच्यावर अरिष्ट पाठवून केली आहे. यरुशलेमेवर जे संकट आले तसे आकाशाखाली कोठेही झाले नाही.

13मोशेच्या नियमशास्त्रात लिहील्याप्रमाणे हे सर्व विपत्ती आमच्यावर आली ती आम्ही पश्चाताप करून देवाच्या दयेची आणभाक केली नाही.

14आता हे प्रभू, आमच्या देवा, आपली जी सगळी काम करतो त्यात तो न्यायी आहे; आणि आम्ही त्याचा शब्द मानला नाही.

15प्रभू आमचा देव, तू आपले लोक मिसर देशातून प्रतापी हाताने बाहेर आणले, आणि आज हे त्याप्रमाणे आपणाला किर्ती प्राप्त करून घेतली आहे; आम्ही पाप केले आहे, आम्ही दुष्टाईने वोगलो आहे.

16हे प्रभू, आपल्या सर्व न्यायकृत्याप्रमाणे यरूशलेम नगरीवरील, तुझ्या पवित्र पर्वतावरील, आपला क्रोध व संताप दूर कर; आमच्या पातकांमुळे व आमच्या पूर्वजांच्या दुष्कर्मांमुळे यरुशलेम व तुझे लोक आसपासच्या सर्वांना निंदेचे विषय झाले आहेत.

17हे देवा, तुझे कान देऊन ऐक, तुझे डोळे उघडून पहा आमची नासचूस झाली आहे. तुझा नाव दिलेल्या शहराकडे पाहा आम्ही आमच्याकडे धार्मिकतेस्वत मागत नाही तर तुझ्या महान कारणास्तव विनवणी करतो.

18देवा ऐक, देवा क्षमा कर, देवा लक्ष दे आणि कार्य कर तुझ्या नावासाठी उशीर करु नको, माझ्या देवा, कारण तुझ्या शहरास आणि तुझ्या लोकास तुझे नाव दिले आहे. कारण आम्ही आपल्या न्यायीपणामुळे आपल्या विनंत्या तुझ्यापुढे ठेवतो असे नाही, तर तुझ्या फार दयांमुळे त्या तुझ्यापुढे ठेवतो.

19हे प्रभू, ऐक, हे प्रभू, क्षमा कर, हे प्रभू, कान दे, आणि कार्य कर, उशीर करू नको; हे माझ्या देवा, तू आपणाकरिता असे कर, कारण तुझ्या नगराला व तुझ्या लोकांना तुझे नाव आहे.

20आणि मी बोलत व प्रार्थना करीत असता आणि आपले पाप व आपले लोक इस्त्राएल यांचे पाप कबूल करीत असता, आणि आपल्या देवाच्या पवित्र पर्वताकरिता यहोवा माझा देव याच्यापुढे माझी विनंती सादर करीत होतो.

21मी प्रार्थना करत असता पहिल्याने ज्याला मी माझ्या दृष्टांतात पाहिले तो गब्रीएल तो संध्याकाळच्या यज्ञसमयी माझ्यासमीप आला.

22आणि तो मला समज देत असतांना माझ्याशी बोलत म्हणाला, दानीएला, तुला ज्ञान व समज देण्यासाठी मी आता निघून आलो आहे.

23जेव्हा तू दयेसाठी विनवणी करु लागला तेव्हा आशा देण्यात आली की ती सांगण्यास मी आलो आहे, कारण ते परमप्रिय आहेत तर ह्या वचनांचा विचार कर आणि हे प्रकाशन समजून घे.

24सत्याहत्तर वर्षाचा तुझ्या लोकांसाठी आणि तुझ्या शहरासाठी घोषीत करण्यात काळ आला होता ज्यात पापाचा अंत व्हावा अचमतेसाठी प्रायश्चित करावे सनातन धार्मिकता उदयास यावी. दृष्टांत आणि स्वप्न पूर्ण व्हावे आणि पवित्रस्थानाचा अभिषेक व्हावा.

25जाण आणि समजून घे की यरुशलेमेची पुनर्बांधणी करण्याची आज्ञा झाल्यापासून तर अभिषिक्त (जो पुढारी असेल) येईपर्यंतचा अवकाश सत्याहत्ततर आणि पासष्ट आठवडे आहे. त्यानंतर यरुशमेलेची पुनर्बांधणी होईल कीती रस्ते खंदळ हे संकटाच्या काळात बांधले जातील.

26वर्षाच्या बासष्ट आठवडयानंतर अभिषिक्तीचा वध करण्यात येईल व त्याकडे काही उरणार नाही जो येणारा अधिपती त्याचे सैन्य शहर आणि वेदी चा नाश करतील त्याचा नाश पुराने होईल युध्द शेवटपर्यंत होईल सर्व काही उजाड होण्याची घोषणा झाली आहे.

27एक आठवडयाचा करार तो पुष्कळासोबर पक्का करेल, आठवडयामध्ये तो या आणि अर्पणे बंद करील. नाश करणारा अमंगळाच्या पंखावर स्वार होऊन येईल. संपूर्ण नाश आणि अंत ठरलेला आहे. नाश करणाऱ्यावर त्याचा वर्षाव करण्यात येईल.”


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Daniel 9 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran