Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Daniel 8 >> 

1त्यानंतर बेलशस्सर राजाच्या कारकिर्दीच्या तिसऱ्या वर्षी मी जो दानीएल त्या मला प्रथम दृष्टांत झाला.

2मला दृष्टांतास दिसले असे मी पाहत होतो. मी एलाम परगण्यातील शूशन, तटबंदीच्या शहरात होतो. मी दृष्टांतात पाहिले तो मी उलई नदीच्या काठी होतो.

3मी डोळे वर करून पाहिले तो मला माझ्यासमोर दोन शिंग असलेला एडका, नदीकाठी उभा असलेला दिसला. एक शिंग दुसऱ्यापेक्षा लांब होते. पण लांब शिंगाची वाढ लहानपेक्षा हळूहळू झाली होती. आणि ते हळू वाढत आहे.

4मी पाहिले तो एडका पश्चिमेस नंतर उत्तरेस आणि नंतर दक्षिणेस धडक मारत होता, कोणी पशू त्यासमोर उभा राहू शकला नाही त्यांच्या तावडीतून कोणी सांडवण्यास सबळ नव्हता त्याला जे पाहिजे तो ते करी आणि तो महान झाला.

5जसा मी त्याविषयी विचार करत होतो मला एक बकरा पश्चिमेकडून येताना दिसला तो सर्व पृथ्वी आक्रमून आला. धावताना त्याचे पाय जमिनीला लागत नव्हते त्या बकऱ्याच्या डोळयांच्या मद्यात मोठे शिंग होते.

6मी नदीकाठी जो एडका पाहिला होतो त्याकडे तो बकरा आला आणि तो बकरा पूर्ण शक्तीने त्या एडक्यावर चाल करून आला.

7मी पाहिले तो बकरा त्या एडक्याजवळ आला तो एडक्यावर राग भरुन होता आणि एडक्यास धडक दिली आणि त्याची दोन शिंग तोडून टाकली. एडका त्याच्यासमोर उभा राहण्यास शक्तीहिन होता. बकऱ्याने त्याला जमिनीवर पाडून तुडवून टाकले त्याच्या हातून त्या एडक्यास सोडविण्याचे कोणालाही सामर्थ्य नव्हते.

8मग तो बकरा मोठा झाला पण तो जेव्हा प्रबल झाला त्याचे मोठे शिंग मोडले आणि त्याच्या जागेवर चार नविन शिंग फुटली ती बाजुस ठळक होती.

9त्यातल्या एकातून एक लहान शिंग निघाले मग ते दक्षिणेस पुर्वेस आणि इस्त्राएलास गौरवी प्रदेशात वाढत गेले.

10त्याची वाढ इतकी झाली की ते आकाशातील सैन्याबरोबर लढू शकेल काही सैन्य आणि काही तारे त्याने जमिनीवर पाडुन तुडवले.

11तो एवढा झाला की आकाशातील अधिपती जेवढे मोठे असत त्याला होणारे नियमित यज्ञयांग बंद केले आणि त्याच्या वेदी भ्रष्ट केली.

12बंडामुळे सैन्य त्या बकऱ्याच्या शिंगाला देण्यात येईल, आणि यज्ञभाग थांबवले जातील तो शिंग सत्याला मातीत मिळवीण आणि त्याच्या सर्व कामात त्यास यश मिळेल.

13नंतर मी एक पवित्र पुरुषास, दुसऱ्या पवित्र पुरुषासोबत बोलताना ऐकले, “हा रोजचा यज्ञयांग नाशदायी पाप, वेदी आणि सैन्य तुडवणे, ह्या दृष्टांतातील गोष्टी किती दिवस चालत राहणार?”

14तो मला म्हणाला, “हे सर्व दोन हजार तिनशे संध्याकाळ व सकाळ चालत राहणार नंतर वेदीची योग्य स्थापना होईल.”

15मग मी दानीएलाने हा दुष्टांत पाहुन त्याचा अर्थ समजण्याचा प्रयत्न करत असता पाहा एक मानवासारखा कोणी तरी माझ्यासमोर उभा होता.

16मी एक मानवी वाणी ऐकली मी उलई नदीच्या काठामधून आली तो म्हणाला, “गब्रीएला ह्या पुरुषास हा दृष्टांत समजावून सांग.”

17मग तो तेथे आला जेथे मी उभा होतो तो आला तेव्हा मी घाबरुन पालथा पडलो, तो मला म्हणाला, “मानवपुत्रा हा दृष्टांत समजून घे, हा शेवटच्या काळाविषयीचा आहे.”

18जेव्हा तो माझ्याशी बोलला तेव्हा मी पालथा पडलो मला गाढ झोप लागली. मग त्याने मला स्पर्श करून उभे केले.

19तो म्हणाला, “बघ मी तुला दाखवतो की, कोपाच्या काळात काय होईल कारण तो दृष्टांत शेवटच्या नेमलेल्या दिवसाचा आहे.

20जो मेंढा तू पाहिला त्याला दोन शिंगे होती, ती माद्या व पारस यांचे राजे आहेत.

21तो बकरा म्हणजे ग्रिसचा राजा त्याच्या डोळयाच्या मधोमध असलेले शिंग म्हणजे पहिला राजा आहे.

22जसे त्याचे तुटलेले शिंग ज्याच्या जागी चार शिंग आली त्या देशातून चार राज्याचा उदय होईल, पण त्याचासारखा बलवान एकही नसणार.

23त्या राज्याच्या शेवटच्या काळात लोकांच्या पातकाचा घडा भरला त्यावेळी उग्ररुपी बुध्दीमान राजा उदयास येईल.

24त्याची सत्ता महान होईल पण ती त्याच्या स्वबळाने नाही तो दुरपर्यंत पोहचणारा विनाश करील तो जे काही करील त्यात त्याचा विकास होईल तो पवित्र व बलवानांचा नाश करील.

25तो कपटाने आपली कारस्थाने सिध्दीस नेईल तसेच तो अधिपतीच्या अधिपतीविरूद्धच्या विरोधात उठेल आणि त्याचा चुराडा होईल पण मनुष्याचा बलाने नाही.

26हा सांजसकाळाचा दृष्टांत सांगितला तो खरा आहे पण हयास गुप्त ठेव कारण तो भविष्यात अनेक दिवसानंतर पूर्ण होईल.”

27तेव्हा मी दानीएल बरेच दिवस अशक्त होऊन आजारी पडलो मग मी बरा होऊन राजकामासाठी गेलो तो दृष्टांत मी सगळयांना सांगितला पण त्याला समजणारा कोणीच नव्हता.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Daniel 8 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran