Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Daniel 7 >> 

1बाबेलाचा राजा बेलशस्सर याच्या राज्याच्या पहिल्या वर्षी दानीएल आपल्या पलंगावर पडलेला असता तयास स्वप्न पडले आणि दृष्टांत त्याच्या मनात फिरू लागले मग त्याने ते स्वप्न आणि त्यातील महत्वाच्या घटना लिहून काढत्या.

2दानीएलाने म्हटले, “रात्रीच्या माझ्यादृष्टांतात मी पाहीले स्वर्गातील चार वारे महासागरावर घोळत होते.

3चार मोठी श्वापदे जी एकमेकांपासून वेगळी होती. समुद्रातून बाहेर आली.

4पहिले सिंहासारखे असून तयास गरूडाचे पंख होते. असा मी पाहत असता तयाचे पंख उपटून त्याला जमिनीवर मानवाप्रमाणे दोन पायावर उभे केले. त्यास मानवाचे मन देण्यात आली होती.

5नंतर दुसरे श्वापद अस्वलासारखे होते त्याच्या दातामध्ये तिन फासोळया धरल्या होत्या. त्याला सांगण्यात आले ‘उठ, पुढे पुष्कळ मांस खा.’

6त्यानंतर मी पुन्हा पाहीले तो आणखी एक श्वापद चित्याप्रमाणे होते त्याच्या पाठीवर पक्षासारखे चार पंख होते. आणि त्यास चार शिरे होती. त्याला राज्य करण्यासाठी आधिकार दिला होता.

7त्यानंतर मी रात्री माझ्या स्वप्नात चौथा क्ष्वादपद पाहीला विक्राळ, भयानक आणि अतिशय मजबूत तो होता. त्याला मोठे लोखंडी दात होते, तो चावून त्याचा चुरा करी. आणि उरलेले पायाखाली तुडवी तो इतरांपेक्षा वेगळा होता. आणि त्यास दहा शिंगे होती.

8मी ती शिंगे पाहत असतांना, मला त्याच्यातून आणखी लहान शिंगे निघाले. आधिच्या शिंगातून तीन मुळासह उपटली गेली मी पाहिले त्या शिंगास मानवासारखे डोळे होत आणि मोठया फुशारक्या मारणारे तोंड होते.

9मी पाहत होतो तेव्हा, आसने मांडण्यात आली आणि एक पुराणपुरूष आसनावर बसला. त्याची वस्त्रे हिमाप्रमाणे शुभ्र होती आणि त्याचे केस लोकरीसारखे स्वच्छ होते. त्याचे आसन आग्नीज्वाला होते. आणि त्याची चाक जळणारा अग्नी होते.

10त्याच्या समोर अग्नीची नदी वहात होती, हजारो लोक सेवा करीत होते, लाखो लोक समोर उभे होते, न्यायसभा चालू होती आणि पुस्तके उघडी होती.

11मी सतत त्याकडे पाहत होतो कारण ते लहान शिंग फुशारकी मारत होते. मी पाहत असता त्या श्वापदाचा वध करण्यात आला त्याच्या शरीराचे तूकडे करून ते जाळण्यास देण्यात आले.

12इतर चार श्वापदाचे प्राण हरण करून त्यांना काही काळ जिवंत ठेवण्यात आले.

13त्या रात्रीच्या माझ्या दृष्टांतात मी पाहिले, आकाशातील मेघावर स्वार होऊन कोणी मानवपूत्रासारखा येताना मी पाहिला तो पुराण पुरूषाकडे आला व त्यास त्याने जवळ केले.

14त्यास अधिकार एकत्र करण्यास, गौरव आणि प्रभुत्व दिली. यासाठी की सर्व लोक, सर्व देश आणि सर्व भाषा त्याची सेवा करतील. त्याचे राज्य सदा राहील व त्याचा नाश कधी होणार नाही. त्याचा राज्याचा अंत कधी होणार नाही.

15मग मज दानीएलचा जिव घाबरा झाला. मला झालेल्या दृष्टांतामुळे माझे मन विचलीत झाले.

16जवळ उभे असणाऱ्यांपैकी एकाकडे मी गेलो व ह्या सर्व बाबींचा अर्थ त्यास विचारला. तेव्हा त्याने मला सर्व गोष्टीचा अर्थ मला समजावून सांगितला.

17ती मोठी चार श्वापदे म्हणजे पृथ्वीवर उदयास येणारे चार राजे आहेत.

18पण सर्वोच्च देवांच्या संतांना राज्य, प्राप्त होईल ते युगानयुग त्याचा ताब्यात राहील.

19नंतर मला त्या चौथ्या श्वापद विषयी बोलण्याचे मन केले. जो इतरांपेक्षा वेगळा होता. त्याचे दात लोखंडाचे भयंकर होते आणि त्याची नखे पितळेची होती, तो चावून चुरा करी. आणि उरलेले जे होते त्याचे तूकडे पायाखाली करी.

20मला त्याची दहा शिंग आणि त्याचं गुढ जाणायचे होते जे त्याच्या डोक्यावर होती. एक शिंग त्यात आणखी निघाले त्यामुळे तीन शिंगे तूटून पडली त्या शिंगाला डोळे असून तोंड होते त्यातून ते मोठमोठया गोष्टी बोलत होते. त्या शिंगाची जाडी इतरांपेक्षा जास्त होती. या सगळ्ंयाचा अर्थ काय म्हणून मी इच्छा दर्शीविली.

21मी पाहिले त्या शिंगाने पवित्र जनांविरोधात युध्द करून त्यांच्यावर विजय मिळवला.

22मग पुराणपूरूष येईपर्यंत, सर्वोच्च देवाच्या पवित्र जनास न्याय देईपर्यंत नंतर ती वेळ आली आणि पवित्र जनांस राज्य मिळाले.

23त्याने सांगितले चौथे श्वापद हे पृथ्वीवर चौथे राज्य होईल हे इतर राज्यांपेक्षा वेगळे राहील ते सर्व पृथ्वीला ग्रासून टाकी आणि तिचे पायाखाली तूकडे करीन.

24आता दहा शिंगा विषयी ह्या राज्यातून दहा राज्यांचा उदय होईल, आणि त्यातून आणखी एक राजा निघेल. तो राज्या वेगळा राहील आणि तो तिन राजावर पादाक्रांत करील.

25तो सर्वोच्च देवाच्या विरोधात बोलेल आणि देवाच्या पवित्र जनांचा छळ करील नेमलेले सण आणि नियम बदलण्याचा तो प्रयत्न करील. ह्या सर्व गोष्टी त्याच्या हातात तिन वर्षे आणि सहा महिण्यासाठी दिल्या जातील.

26पण तिथे न्यायसभा होईल आणि त्याचे राजकीय सामर्थ्य परत घेण्यात येतील. त्याचा नाश होउन कायमचा नष्ट करण्यात येईल.

27राज्य, प्रभूत्व आणि अखिल पृथ्वीवरचे वैभव सर्वोच्च देवाच्या संताना देण्यात येईल. त्याचे राज्य अनंतकालचे आहे. आणि इतर त्याची करून त्याच आज्ञापालन करतील.”

28ह्या गोष्टींचा उलगडा इथे संपतो. मी दानीएल ह्या विचारांनी व्याकूळ झालो. माझे तोंड उतरले पण ह्या सर्व गोष्टी मनात ठेवल्या आहेत.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Daniel 7 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran