Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Daniel 6 >> 

1दारयावेश राजाने त्याच्या मर्जिने आपल्या सर्व साम्राज्यात एकशे वीस प्रांताधिकारी नेमले.

2त्यांच्यावर तिन मुख्यप्रशासक होते. त्यापैकी एक दानीएल होता. ह्या प्रशासकांची नेमणूक यासाठी होती की राजाच काही नुकसान होऊ नये म्हणून सर्व प्रांताधिकाऱ्यांनी हिशोब द्यावा व त्याच मार्गदर्शन घ्यावे.

3दानीएल त्या प्रशासक व प्रांताधिकाऱ्यांत श्रेष्ठ ठरला कारण त्यात उत्तम आत्मा वसत होता. राजा त्यास सर्व राज्यावर नेमण्यासाठी योजणा करता होता.

4अस असताना इतर मुख्य प्रशासक आणि प्रांतिधिकारी हे दानीएलात चूक शोधन्याचा प्रयत्न करता होते. पण तो विश्वासू असल्याने त्यांना त्याच्यात काहीच चुक सापडली नाही.

5नंतर ही लोक म्हणाली, “आम्हाला दानीएलाच्या विरूध्द काही कारण काढता येत नाही पण त्याच्या देवाच्या नियमा संबंधानेच निमित्त काढता येईल.

6नंतरही प्रशासक व प्रांताधिकारी योजना घेवून आले ते त्यात म्हणाले राजा दारयावेश चिरायू असा.

7राज्यातले सर्व मुख्य प्रशासक, प्रांताधिकारी सल्लागार आणि प्रशासक हयांनी असा विचार केला की राजा आपण असा फर्मान काढा की पुढील तिन दिवस आपल्याशिवाय कोणीही देवाची अथवा मानवाची आराधना करील त्यास सिंहाच्या गुहेत टाकावे.

8तर महाराज हा फर्मान मंजूर करून हयावर सही करा म्हणजे मेदी आणि पारशी यांच्या कायदयाप्रमाणे ठराव पालटणार नाही.”

9तेव्हा दारयावेश राजाने त्या आदेशावर सही केली या नाही की त्याचा कायदा व्हावा.

10ह्या फर्मानावर सही झाली हे दानीएलास जेव्हा माहित झाले तो आपल्या घरी गेला त्याच्या वरच्या खोलीतील खिडक्या यरुशलेमेच्या दिशेने उघडत होत्या तो गुडघ्यावर आला आणि त्याने प्रार्थना करून देवास धन्यवाद दिला. हे तो दररोज दिवसातून तिनवेळा करत असे.

11नंतर ही मानसे ज्यांनी हा कट रचला होता त्यांनी दानीएलास प्रार्थना करीत असताना पाहिले.

12नंतर ते राजाकडे जावून त्याच फर्मानाविषयी त्यास म्हणाले, “महाराज काय आपण हा फर्मान नाही काढला ज्यात लिहीले आहे पुढील तिन दिवस तुमच्या शिवाय कोणी देवाची किंवा मनुष्याची आराधना करील त्यास सिंहाच्या गुहेत टाकण्यात येईल” राजा म्हणाला “मेही व पारसी हयांच्या न बदलणाऱ्या कायदयाप्रमाणे हे निश्चित ठरले आहे.”

13तेव्हा ते राजास म्हणाले, “तो मनुष्य दानीएल जो यहूदांपैकी एक आहे तो आपणास व आपल्या फर्मानास न जुमानता दिवसातून तिन वेळा आपल्या देवाजवळ प्रार्थना करतो.”

14हे शब्द ऐकूण राजा अती खिन्न झाला आणि दानीएलाचा बचाव कसा करावा याचा विचार करू लागला त्यासाठी सुर्यास्तापर्यंत तो खटपट करत राहीला.

15तेव्हा हकट करणारे लोक राजासमोर जमले “व त्याने म्हणाले राजा हे लक्षात घे मेदी व पारसी याच्या कायदयाप्रमाणे राजाचा फर्मान किंवा कायदा बदलता येत नाही.”

16नंतर राजदेशानुसार दानीएलास आनवून सिंहाच्या गुहेत टाकले राजा दानीएलास म्हणाला, “ज्या देवाची सेवा तू सतत करतोस तो तुला सोडवो.”

17त्यांनी एक मोठा दगड आणून गुहेच्या दारावर ठेवला राजाने मग आपली आणि सरदाराची मुद्रा घेवून त्यावर शिक्का मारला तो यासाठी की दानीएलाच्या बाबतीत काही फेरबदल करता येणार नाही.

18नंतर राजा त्यांच्या महलात गेला ती रात्र तो न जेवता असाच राहिला तयाच्यासमोर वादये आणली नाही त्याची झोप उडून गेली.

19मग मोठया पहाटे राजा उठला आणि त्वरीत सिंहाच्या गुहेजवळ गेला.

20गुहेजवळ येताच तो दु:खीस्वराने दानीएलास हाक मारू लागला तो म्हणाला दानीएल जिवंत देवाच्या हासो तुझा देव ज्याची तू नित्य सेवा करतोस तयाला सिंहापासून तूला सोडवता आले काय.

21दानीएल राजास म्हणाला, “महाराज चिरायू असा

22माझ्या देवाने त्याचा दिव्यदूत पाठवून सिंहाची तोंडे बंद केली त्यांनी मला इजा केली नाही मी त्याच्यासमोर आणि आपल्यासमोर मी निर्दोष ठरलो व महाराज आपलाही मी काही अपराध केला नाही.”

23नंतर राजाने आनंदी होऊन आज्ञा केली की, “दानीएलनास गुहेतून बाहेर काढा” मग दानीएलास बाहेर काढले त्याच्या शरीरावर इजा नव्हत्या कारण त्याने आपल्या देवावर विश्वास ठेवला.

24तेव्हा राज्याच्या आज्ञेवरून, त्या लोकांना पकडण्यात आले ज्यांनी दानीएलावर आरोप केले तेव्हा सर्वांना त्यांची मुले पत्नीसही सिंहाच्या गुहेत टाकले ते गुहेत तळ गाठण्याच्या आधीच सिंहानी त्याच्या हाडाचा चुराडा केला.

25मग दारयावेश राजाने सर्व भूतलावरील सर्व् लोकांस सर्व राष्ट्रांस व सर्व भाषा बोलणाऱ्या लोकांस असे लिहीले “तुमची शांती तुमच्यासाठी वाढत जावा.”

26मी असे जाहिर करता की, माझ्या साम्राज्यातील सर्व लोकांनी कंपीत होऊन दानीएलाच्या देवाचे भय धरावे कारण तो सर्वकाळ जिवंत देव आहे. त्याचे राज्य अविनाशी आणि त्याचे प्रभुत्व अनंत आहे.

27तो आम्हास सुरक्षीत करतो आणि आम्हास सोडवतो. तो स्वर्ग आणि पृथ्वीवर चिन्ह; आणि चमत्कार करतो त्याने दानीएलास सिंहाचा पंजातून सोडवले.

28मग हा दानीएल दारयावेशाच्या राज्यात आणि कोरेश पारसीच कार्यकाळात समृध्द झाले.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Daniel 6 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran