Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Daniel 5 >> 

1बेलशस्सर राजाने आपल्या एक हजार सरदारांस घेवून एक मोठी मेजवानी दिली आणि त्या हजारा समोर तो द्राक्षारस प्याला.

2बेलशस्सराने द्राक्षारस चाखल्यावर आज्ञा केली की, सोन्या चांदीची ती पात्रे घेवून या जी त्याचा बाप नबुखद्रेस्सराने यरुशलेमेच्या मंदीरातून आणली होती. हयासाठी की, राजा, त्याचे सरदार आणि त्याच्या पत्नी व रखेली हयांना त्यातून द्राक्षारस पिता येईल.

3तेव्हा सेवक सोन्याची ती पात्रे घेवून आले, जी यरुशलेमेतील देवाच्या मंदीरातून आनलेली होती. मग राजा त्याचे सरदार, त्याच्या पत्नी त्याच्या रखेली ही त्यातून द्राक्षारस प्याली.

4ते द्राक्षारस पिवून सोने, चांदी, पितळ, लोखंड, लाकूड आणि दगडाच्या घडलेल्या मूर्तीचे स्तवन करू लागले.

5त्या क्षणाला मानवी हाताची बोटे तिथे दिपस्तंभासमोर प्रगट झाली आणि तयांनी राजवाडयातील भिंतीच्या गिलाव्यावर अस काही लिहीले जे राज्यास वाचता येईल.

6तेव्हा राजाचा चेहरा पडला तो चिंतातूर झला, त्याचे पायाचे सांधे साथ देईना आणि त्याचे गुडघे लटपटू लागले.

7राजाने मोठयाने बोलून आज्ञा केली की, जे भूतविदया करणारे खास्दी लोक, ज्योतिषी यांना घेवून या. राजा बाबेलातील ज्ञानी लोकांस म्हणाला, “जो कोणी हे लिखान वाचून त्याचा अर्थ मला सांगेल त्यास जांभळा पोशाख आणि सोन्याचा गोफ देण्यात येईल. जो राज्यांतील तीन राज्यकर्त्यातील एक होईल.

8राजाचे सर्व ज्ञानी लोक आले पण त्यांना तो लेख वाचता येईना आणि त्याच्या अर्थ राजास सांगता येईना.”

9तेव्हा राजा बेलशस्सर चिंतातूर झाला आणि त्याचे तोंड पडले. त्याचे सरदार गोंधळून गेले.

10राजा आणि सरदार यांचे बोलणे एकूण राणीची आई त्या मेजवाणी गृहात आली. ती म्हणाली, “महाराज चिरायू असा चिंतातूर होऊ नका आपली मुद्रा पालटू देवू नका.

11आपल्या राज्यात एक असा पुरूष आहे ज्यात पवित्र देवाचा आत्मा वसतो. आपल्या बापाच्या राज्यात, प्रकार, विवेक, देवाच्या ज्ञानासारखे ज्ञान त्यात दिसून आले आपला बाप राजा नबुखद्रेस्सराने त्यास सर्व जादूगार भुतवीदया करणारे खास्दी आणि ज्योतीषी यावर प्रशासक म्हणून त्याला नेमले.

12उत्तम आत्मा, ज्ञान, विवेक, स्वप्नांचा उलगडा करणे, कोडी स्पष्ट करणे, आणि अडचणी सोडवणे, ह्या गुंणवत्ता त्यात दानीएलात आढळल्या ज्याला बेल्टशस्सर नाव दिले. आता त्या दानीएलाला बोलवा म्हणजे तो अर्थ सांगेल.”

13नंतर दानीएलास राजासमोर आणले. “राजा त्यास म्हणाला तू दानीएल आहेस, यहूदातून पकडून आणलेल्या बंदीवानातील एक ज्यास माझ्या बापाने पकडले होते.

14मी तुझ्याविषयी ऐकले आहे, की देवाचा आत्मा तुझ्यात राहतो आणि प्रकाश, विवेक व उत्तम ज्ञान हे तुझ्या ठायी दिसून आले आहे.

15मला हा लेख वाचून त्याचा अर्थ सांगण्यासाठी हे ज्ञानी लोक जे भुतविदया करणारे मजसमोर आहेत पण त्यांना हयाचा अर्थ सांगता येईना.

16मी तुझ्याबाबतीत ऐकले आहे की तू हयाचा अर्थ सांगून हे सोडवू शकतो आता जर तू मला हे लिखाण वाचून त्याचा अर्थ सांगशील तर मी तुला जांभळे वस्त्र व तुझ्या गळयात सोन्याचा गोफ देवून तुला राज्यातील ज्ञानी प्रशासकांपैकी एक प्रशासक करील.”

17नंतर दानीएलाने राजास उत्तर दिले, “तुझ्या भेटी तुलाच राहू दे आणि तुझी बक्षीसे दुसऱ्यांना दे तरीही मी लिखान वाचून तुला त्याचा अर्थ सांगतो.

18हे राजा सर्वोच्च देवाने तुझा बाप नबुखद्रेस्सराला राज्य महत्व, प्रतिष्ठा आणि वैभव दिले.

19त्याने त्यास मोठेपणा दिल्यामुळे सर्व राष्ट्रांचे लोक, दास, भाषा बोलणारे लोक त्याच्यापुढे थरथर कापत व त्याला भित होते. त्याला वाटले त्यास तो ठार करीत असे, किंवा जिवन देत असे.

20पण जेव्हा त्याचे हृदय ताठ झाले आणि त्याचा आत्मा कठोर झाला तो मुद्दामपणे वाचला तेव्हा त्याला राजपदावरून काढून त्याचे वैभव हिरावण्यात आले.

21त्याला मानवातून हाकलून देण्यात आले. त्याचे हृदय पशुसारखे झाले आणि तो राठागाढवात राहीला. तो बैलासारखे गवत खाई, व त्याचे शरीर देवाने भिडस असे मानवी राज्यावर सर्वोच्च देवाची सत्ता आहे व तो पाहीजे ते त्याने स्थापीत करतो हे ज्ञान त्यास प्राप्त होईपर्यंत तो असा राहिला.

22हे बेलशस्सरा तू त्याचा पुत्र असून हे सर्व तुला माहीत असूनही तू आपले मन नम्र केले नाहीस.

23तर स्वर्गीय प्रभुशी तू उद्दामपणा केलास त्याच्या मंदीरातील सुवर्णपात्र त्यांना आणून तू तुझे सरदार तुझ्या पत्नी आणि तुझ्या रखेली द्राक्षारस प्याल्या आहेत आणि सोने चांदी पितळ लोखंड लाकूड आणि दगड हयापासून बनलेल्या मूर्ती ज्या पाहता ऐकत किंवा समजत नाही त्यांचे तू स्तवन केलेस पण ज्याच्या हातात तुझा जीव आहे व जो तुझे सर्व मार्ग जानतो त्या देवास मान दिला नाहीस.

24म्हणून देवाने आपला हात त्याच्या उपस्थितीतून लिहीण्यास पाठविला आणि हे लिहीले.

25हा लिखीत लेख असा: ‘मने, मने, तकेल, ऊफारसीन.’

26हयाचा अर्थ असा आहे, मने म्हणजे देवाने तुझ्या राज्याचा काळ मोजून त्याचा अंत केला आहे.

27तकेल म्हणजे तुला तागडीने मोजले पण तू अणाभरला आहे.

28परेस म्हणजे तुझे राज्य विभागून मेदी आणि पारशी हयांना दिले.”

29तेव्हा बेलशस्सराने आज्ञा केली आणि त्यांना दानीएलास जांभळी वस्त्रे घालून तयाच्या गळयात सोन्याचा गोफ घातला आणि त्या विषयी राजाने जाहीर घोषणा केली की राज्यातील तिघा प्रशासकांपैकी हा एक आहे.

30त्याचरात्री खास्द्यांचा राजा बेलशस्सर हयाला ठार मारन्यात आले.

31आणि दारयावेश मेदी हा त्याच्या बासष्ट वर्षाचा असता राजा झाला.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Daniel 5 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran