Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Daniel 4 >> 

1नबुखद्रेस्सर राजाने सर्व लोक राष्ट्र आणि पृथ्वीवरील सर्व भाषा बोलाणाऱ्या लोकांत फर्मान पाठवले की, तुमचे कल्यान होवो.

2सर्वोच्च देवाने जी चिन्हे आणि जे चमत्कार माझ्यासाठी केलेले तुम्हास सांगावे हे मला बरे वाटले आहे

3त्याचे चिन्हे किती थोर, त्याचे चमत्कार किती अद्भूत त्यांच राज्य हे सार्वकालीक राज्य आहे. त्याचे स्वातित्व पिढयानपिढया राहते.

4मी, नबुखद्रेस्सर, माझ्या घरात सुखाने राहत हातो आणि माझ्या महलात समृद्धीचा उपभोग घेत होतो.

5मी स्वप्न पाहिले आणि घाबरलो मी त्यावेळी आपल्या पलंगावर पडलो होतो. त्या दृष्टांतामुळे माझे मन अधिर झाले.

6म्हणून मी आज्ञा केली की, बाबेलातील सर्व ज्ञानी लोकांना मजकडे आणावे म्हणजे ते माझ्या स्वप्नाचा उलघडा करतील.

7तेव्हा जादूगार, भुतविदया करणारे, खास्दी आणि ज्योतिषी हे मजकडे आले. मी त्यांना स्वप्न सांगितले पण त्याचा उलघडा त्यांना होईना.

8शेवटी दानीएल आत आला, त्यास मी माझ्या देवाचे नाव बेल्टशस्सर दिले आहे. त्यास मी स्वप्न सांगितले.

9बेल्टशस्सर सर्व ज्ञान्यांच्या, मला ठाऊक आहे पवित्र देवाचा आत्मा निवास करतो आणि तुला कोणतेही गुढ उलगडण अवघड नाही. मला पडलेल्या स्वप्नाचा अर्थ मला सांग.

10मी माझ्या पलंगावर पडलो असता मला दिसले ते असे मी पाहीले, पृथ्वीच्या मधोमध एक मोठे वृक्ष होते आणि त्याची उंची खुप मोठी होती.

11तो वृक्ष वाढून मजबूत झाला त्याचे शेंडा आकाशात पोहचला आणि सगळया पृथ्वीवरून पाहू शकतो.

12त्याची पाने सुंदर होती त्यास भरपूर फळ असून ती सर्वांना खायला पुरेशी होती. वनपशु त्याची सावली आणि आकाशातील पक्षी त्याच्या फांदयामध्ये राहत. तो वृक्ष सर्व जिवितांचे पोषण करीत असे.

13मी माझ्या बिछान्यात पडलो असता माझ्या मनात पाहिले आणि एक पवित्र देवदूत आकाशातून खाली उतरला.

14तो मोठ्याने ओरडून म्हणाला हा वृक्ष तोडून टाका आणि त्यांच्या फांदया छाटून टाका, त्याची पाने काढून टाका आणि फळे विखरा, त्याच्या खालचे राहणारे प्राणी पळून जावो आणि फांदयांतील पाखरे उडून जावोत.

15पण त्याचे बुधा जमिनीत राहू दया. त्याला लोखंड आणि पितळेच्या पट्टया बांधुन, करणाच्या कवळया गवतात रपू दया.

16त्याचे मानवी हृदय जावून त्यास प्राण्याचे हृदय प्राप्त होवो तो पर्यंत सात वर्षे होऊन जातील.

17हा निर्णय त्या देवदुताच्या घ्योषणेद्वारे आणि पाळीव जीवांच्या द्वारे करण्यात आला ते असा नाही की जो जिवंत आहे. त्याने समजून घ्यावे की सर्वोच्च देवाची सत्ता सर्व राज्याच्या लोकांवर आहे. तो ते पाहिजे त्यास देतो. इतकेच नाही तर सर्वांत नम्र मानवास देतो.

18हे स्वप्न मी नबुखद्रेस्सर राजाने पाहिले आता तू हे बेल्टशस्सर हयाचा अर्थ मला सांग कारण माझ्या राज्यातले ज्ञानी जनांपैकी कोणीही हयाचा अर्थ सांगु शकत नाही पण तू हे सांगु शकतो कारण देवाचा पवित्र आत्मा तुझ्याठायी राहतो.

19मग दानीएल ज्यास बेल्टशस्सर नाव देण्यात आले होते काही क्षणासाठी गोंधळून गेला आणि त्याचे मन अस्वस्थ झाले राजा म्हणाला, “बेल्टशस्सर हे स्वप्न किंवा त्याच्या अर्थाने तू घाबरू नकोस” तेव्हा बोलटशस्सर म्हणाला, “माझ्या स्वामी हे स्वप्न तुझ्या द्वेष करणाऱ्यास आणि ज्याचा अर्थ तुझ्या शत्रुस लागू पडो.

20जो वृक्ष तू पाहीला जो वाढून मजबुत झाचा आणि ज्याचा शेंडा आकाशात गेला ज्यास सर्व पृथ्वीवर पाहता येत होते.

21ज्यांची पाने सुंदर आणि फळे भरपूर असून ती सर्वांसाठी पुरेशी होती. त्याच्या सावलीत वनपशू राहत आणि फांदयामध्ये आकाशातील पक्षी राहत होती.

22हे राजा तो वृक्ष तू आहेस, तू वाढून बलवान झला तुझी थोरवी आकाशापर्यंत पोचली आहे, तुझे अधिकार पृथ्वीच्या शेवटापर्यंत पोहचतात.

23हे राजा, तू एक स्वर्गदूत पाहिला जो स्वर्गातून खाली येवून म्हणाला, ‘हा वृक्ष तोडून हयाचा नाश करा, पण त्यांचे बुंधे जमिनीत राहू दया, हयात लोखंड आणि पितळेच्या पट्टयांनी बांधून कुरणातल्या कोवळया गवतात राहू दया त्याने आकाशाचे दव भिजवो, तो सात वर्ष वनपशुसोबत राहो.’

24हे राजा हयाचा अर्थ असा सर्वोच्च देवाचा हा आदेश आहे. जो माझ्या राज्यापर्यंत पोचला आहे.

25तुला मनुष्यातून काढून टाकण्यात येईल, तुझी वस्ती वनपशुमध्ये होईल. तुला बैलासारखे गवत खावे लागेल. आकाशातील दवाने तू भिजशील, सात वर्षे जाईपर्यंत तू हे जानशील की, मानवावर देवाची सत्ता आहे.

26जसे सांगण्यात आले आहे की, त्या वृक्षाची बुंधे तशीच राहू दया, हयाच प्रकारे तुझे राज्य तुला पुन्हा प्राप्त होईल जेव्हा तू स्वर्गाचे नियम शिकशील.

27म्हणून हे राजा माझी मसलत तुला मान्य असो, पाप सोडून योग्य ते कर, आपली दुष्टता सोडून जाचलेल्यावर दया कर. असे केल्यास तुझी समृध्दी जास्त दिवस राहील.”

28,29 हे सर्व राजा नबुखद्रेस्सर सोबत बारा महिन्यात घडून आले तो बाबेलातील राजवाडयात फिरत होता.

30“काय ही महान बाबेल नगरी नाही, जी मी माझ्या राज निवासासाठी आणि माझ गौरवासाठी बांधली.”

31जेव्हा राजा हे बोलत होता. पहा स्वर्गातून वाणी झाली, “राजा नबुखद्रेस्सर, हे फर्मान तुझ्याहातची राजसत्ता गेली आहे.

32तुला लोकातून काढून टाकण्यात येईल तुझी बस्ती वनपशुत होईल तुला बैलांसारखे गवत खावे लागेल आणि मानवी राज्यावर देवाची सत्ता आहे, तो ते पाहीजे त्याना देतो हे तुला ज्ञान होईपर्यंत सात वर्ष जातील.”

33हे फर्मान त्याच घरकेस नबुखद्रेस्सराचा विरोधात अमलात आले. त्याला मानसातून काढण्यात आल त्याने बैलांसारखे गवत खाल्ले. त्याचे शरीर आकाशातल्या देवांनी भिजले त्याचे केस गरूडाच्या पिसाप्रमाणे वाढले आणि त्याची नखे पक्षाच्या नखासारखी झाली.

34ह्या दिवसाच्या शेवटी मी नबुखद्रेस्सराने माझे जाळे आकाशाकडे लावले, माझी बुद्धीमत्ता मला परत मिळाले, मी सर्वोच्च देवाचे आभार मानले, जो सदाजिवीत देव त्याचा मी सन्मान केला आणि त्याची थोरवी गाईली, कारण त्याचे प्रभुत्व कायमचे आणि त्याचे राज्य पिढयानपिढया राहणारे आहे.

35भुतलावरील सर्व सहीवाजी त्यास शुन्यवत आहे. तो स्वर्गातील आपल्या सैन्याचे भुतलावरील रहीवाश्यांचे पाहिजे ते करतो, किनीदा त्यास थांबक शकत नाही वा विचारू शकत नाही की “तू हे का केले?”

36त्याच समयी माझी बुध्दीमत्ता परत मिळाली माझे राजवैभव आणि प्रताप मला परत प्राप्त झाले मी माझ्या सिंहासनावर पुन्हा बसलो आणि मला मोठी थोरवी प्राप्त झाली.

37आता मी, नबुखद्रेस्सर, स्वर्गीय राजास गौरव देवून त्याची खुप स्तुती करतो, कारण त्याची सर्व कामे सभ्यतेची आणि त्याचे मार्ग व्यापाचे आहेत. जे गर्वाने चालतात त्यास तो नम्र करतो.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Daniel 4 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran