Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Daniel 3 >> 

1नबुखद्रेस्सर राजाने सोन्याचा एक पुतळा केला त्याची उंची साठ हात आणि रुंदी साठ हात होती त्याची स्थापना त्याने बाबेल प्रांताच्या दुरा मैदानात केली.

2नंतर नबुखद्रेस्सर राजाने स्थापलेल्या त्या पुतळयाचे प्रतिष्ठापना करण्यासाठी एकत्र होण्यास आपले प्रांताचे प्रशासक, प्रादेशिक, प्रशासक, स्थानिक प्रशासक, सोबतचे सल्लागार, खजिनदार, न्यायाधीश, दंडाधिकारी आणि प्रांतातले सर्व उच्च मुख्याधिकारी हयांस निरोप पाठवला.

3नंतर प्रांताचे प्रतिष्ठापन, प्रादेशिक, प्रशासक, स्थानिक प्रशासक, सोबतचे सल्लागार, खजिनदार, न्यायाधीश, दंडाधिकारी आणि प्रांतातले सर्व उच्च मुख्याधिकारी यासाठी एकत्र आले की, नबुखद्रेस्सर राजाने स्थापित केलेल्या मुर्तीचे समर्पण व्हावे.

4तेव्हा दवंडी देणारा ओरडला, “अहो विविध देशाच्या विविध भाषेच्या लोकांनो,

5ज्यावेळी तुम्ही शिंग, बासरी, सतार, विणा, पुंजी आणि सर्व प्रकारची वाद्ये यांचे संगित एकाच त्यावेळी त्या सुवर्ण पुतळयास दंडवत करा ज्याची स्थापना नबुखद्रेस्सर राजाने केली आहे.

6जो कोणी पालथा पडून त्यास नमन करणार नाही त्याला लगेच त्या क्षणाला भट्टीत टाकले जाईल.”

7मग जेव्हा लोकांनी शिंग, बासरी, सतार, सारंगी, विणा, पुंगी इतर वाद्यांचा आवाज होताच विविध देशाच्या विविध भाषेच्या लोकांनी त्या सुवर्ण पुतळयास पालथे पडून दंडवत केले जी नबुखद्रेस्सर राजाने स्थापली होती.

8आता यावेळी काही खास्द्यांनी यहूदी दोषसिप घेऊन आले.

9ते नबुखद्रेस्सर राजास म्हणाले, “महाराज चिरायु होवो.

10महाराज तुम्ही असा फर्मान काढला की, जो कोणी शिंग, बासरी, सतार, विणा, पुंगी आणि इतर वाद्याचा आवाज ऐकतो त्याने सुवर्ण् पुतळयास दंडवत करावे.

11जो कोणी त्यास पायापडून नमन करणार नाही त्याला लगेच त्या क्षणाला तप्त भट्टीत टाकण्यात येईल.

12आता येथे काही यहूदी आहेत ज्यांची नेमणूक तुम्ही बाबेलाच्या प्रांतात केली, त्यांची नावे शद्रख, यंशख अबेदनगो ही आहेत. ही लोक राजा, आपली पर्वा करत नाही ते तुमचा देव यास नमन करत नाही, त्याची सेवा करत नाही, किंवा तुझ्या पुतळयास दंडवत करत नाही, ज्याची तुम्ही स्थापन्न केली.”

13तेव्हा नबुखद्रेस्सर राजाने रागात संतप् होऊन शद्रख मेशख व अबेदनगो हयास घेऊन या अशी आज्ञा केली तेव्हा लोकांनी त्यांना राजापुढे सादर केले.

14नबुखद्रेस्सर त्यांना म्हणाला, “काय तुम्ही शद्रख, मेशख अबेदनगो आपल्या मनाची तयारी केली? की तुम्ही माझ्या स्थपलेल्या सुवर्ण पुतळयास नमन करून त्यास दंडवत करणार नाही.

15आज्ञा जर तुम्ही तयार आहात तर जेव्हा तुम्ही शिंग बासरी, सतार, सारंगी, विणा, पुंगी आणि इतर वाद्ययांचा आवाज ऐकता तेव्हा तुम्ही ह्या पुतळयापुढे उपडे पडून दंडवत कराल तर बरे पण जर तुम्ही नमन करणार नाही तर त्वरीत तप्त भट्टीत टाकण्यात येईल. तुम्हाला माझ्या हातातून सोडविणारा असा कोण देव आहे?”

16शद्रख, मेशख, अबेदनगो यांनी राजाला उत्तर दिले की, “नबुखद्रेस्सर ह्या बाबतीत उत्तर देण्याचे आम्हाला प्रयोजन नाही.

17जर काही उत्तर आहे, तर ते हे की, ज्या देवाची आम्ही सेवा करतो तो आम्हास तप्त भट्टीतून काढण्यास समर्थ आहे, आणि महाराज तो आम्हाला आपल्या हातून सोडवीन.

18पण जर नाही तर महाराज हे आपणास माहित असावे की, आम्ही तुमच्या देवाची उपासना करणार नाही, आणि यापुढे आम्ही पालथे पडुन त्यास दंडवत करणार नाही.”

19नबुखद्रेस्सर रागाने संतप्त झाला, त्याची शद्रख, मेशख, अबेदनगो विषयी पालटली त्याने आज्ञा केली भट्टी नेहमीपेक्षा सातपटीने तप्त करण्यात यावी.

20नंतर त्याने आपल्या सैनिकातील काही बलवान पुरुषास आज्ञा केली की, शद्रख, मेशख, अबेदनगो यांना बांधा आणि तप्त भट्टीत टाका.

21ते बांधलेले असताना त्यांनी आपले पायमोजे, सदरे झगे आणि इतर वस्त्र घातले होते आणि त्यांना तप्त भट्टीत टाकण्यात आले.

22कारण राज्याची आज्ञा सक्त असल्याने ती भट्टी फारच तप्त होती, त्याच्या ज्वालेने ते सैनिक मरण पावले जे शद्रख, मेशख, अबेदनगो ज्यांना भट्टीत टाकले.

23ते तिथे पुरुष शद्रख, मेशख, अबेदनगो हातपाय बांधलेले असे त्या भट्टीत पडले.

24नंतर नबुखद्रेस्सर चकीत होऊन त्वरीत उभा राहिला त्याने आपल्या सल्लागारास विचारले, “आपण त्या तिघांना बांधून भट्टीत टाकले ना?” त्यांनी उत्तर दिले, निश्चित राजे.

25तो म्हणाला, मला असे दिसते की, चार माणसे अग्नीत मोकळे फिरत आहेत, त्यांना काही एक दुखापत नाही, चौथ्याचे तेज हे जनु देवपुत्रासारखे आहे.

26तेव्हा नबुखद्रेस्सराने धगधगत्या भट्टीच्या दाराजवळ येऊन त्यांना हाक मारली “शद्रख, मेशख, अबेदनगो, सर्वोच्च देवाच्या दासांनो बाहेर या,” येथे या, नंतर शद्रख, मेशख, अबेदनगो अग्नीतून बाहेर आले.

27तेथे जमलेले प्रांताधिकारी, प्रशासक, प्रादेशिक प्रशासक, स्थानिक पशासक, इतर प्रशासक आणि राजाचे सल्लागार हयांनी त्यांस पाहिले. त्यांच्या शरीरावर अग्नीच्या जखमा नव्हत्या त्याचा एकही केस होरपळला नाही. त्यांना अग्नीचा वासही लागला नाही.

28नबुखद्रेस्सर म्हणाला या आपण शद्रख, मेशख, अबेदनगोच्या देवाचे स्तवन करूया, कारण त्याने आपला दिव्यदूत पाठवून आपल्या सेवकास संदेश दिला त्यांना माहनी आता साय्न त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांना आपल्या देवाशिवाय इतर देवांसमोर दंडवत न घालता आपले देह अर्पिला.

29त्यामुळे मी कमीवतो की, कुणीही लोक, कुठल्याही देशाचा, कोणतीही भाषा बोलणारा जर शद्रख, मेशख, अबेदनगो, जे यांच्या देवाच्या विरोधात बोलला तर त्यांचे तुकडे करण्यात येतील, आणि त्यांच्या घराचे उकिरडे करण्यात येतील. कारण अशा प्रकारे सोडविणारा दुसरा कोणता देव नाही.

30नंतर राजाने शद्रख, मेशख, अबेदनगो जे यांना बाबेलच्या परगण्यात बढती दिली.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Daniel 3 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran