Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Daniel 2 >> 

1नबुखदनेस्सर राज्याच्या कारर्कीदीच्या दुसऱ्या वर्षी त्याला स्वप्न पडले तो बेचैन झाला आणि झोपू शकला नाही.

2तेव्हा राजाने फरमान काढला की, जादूगार आणि ज्योतिषी करणारे तसेच मांत्रिक आणि ज्ञानी लोक हयांनी यावे आणि राजाला ते स्वप्न सांगावे, म्हणून ते राजासमोर हजर झाले.

3राजा त्यांना म्हणाला, “मला एक स्वप्न पडले आहे आणि त्याचा अर्थ जाणण्यास माझे मन व्याकुळ झाले आहे.”

4तेव्हा ज्ञानी लोक राजाशी आरामी भाषेत बोलले “महाराजा चिरायु हो! तुमच्या सेवकांना तुमचे स्वप्न सांगा आणि आम्ही त्याचा अर्थ तुम्हाला प्रगट करु!”

5राजाने खास्दी लोकांना उत्तर दिले, “हा ठराव होऊन चुकला आहे जर तुम्ही मला स्वप्न आणि त्याचा अर्थ सांगणार नाही तर तुमच्या शरीराचे तुकडे केले जातील आणि तुमच्या घरांचे उकिरडे केले जातील.

6पण जर तुम्ही मला स्वप्न आणि त्याचा अर्थ सांगाल तर तुम्हाला माझ्याकडून भेट, पारितोषिक आणि मोठा मान मिळेल. यास्तव तुम्ही मला स्वप्न व त्याचा अर्थ सांगा.”

7ते पुन्हा त्यास म्हणाले, “महाराजांनी आपल्या सेवकांस स्वप्न सांगावे म्हणजे आम्ही त्याचा अर्थ सांगू.”

8राजाने उत्तर दिले, “मला ठाऊक आहे तुम्हाला अधिक वेळ पाहिजे कारण तुम्हाला ठाऊक आहे की, माझा ठराव झालेला आहे.

9पण जर तुम्ही मला स्वप्न सांगितले नाही तर तुमच्यासाठी एकच शिक्षा आहे. म्हणून माझे मन बदलत नाही तोपर्यंत तुम्ही खोटया आणि फसव्या गोष्टी सहमत करून मला सांगाव्या असे तुमचे ठरले आहे. म्हणून मला स्वप्न सांगा म्हणजे मला समजेल तुम्ही त्याचा उलगडा करु शकतो.”

10खास्दी लोकांनी राजास उत्तर केले, “या जगात असा कोणताच मनुष्य नाही जो राजाची ही मागणी पूर्ण करेल असा कोणताच महान आणि प्रतापी राजा नाही ज्याने असे मागणे ज्योतिषी, भुतविद्या करणारे आणि ज्ञानी लोकांना केली असेल.

11महाराज जी गोष्ट मागतात ती कठीण आहे आणि देवाशिवाय कोणीही नाही की जो हे सांगेल कारण देव मानवात राहत नाही.”

12हे ऐकुन राजा रागाने संतापला आणि त्याने आज्ञा केली की, बाबेलमध्ये जे ज्ञानाविषयी ओळखले जातात त्यांचा नाश करण्यात यावा.

13हा फर्मान निघाला म्हणून आणि जे त्यांच्या ज्ञानासाठी ओळखले जात होते त्यास मरणास सामोरे जावे लागणार होते, आणि लोक दानीएल आणि त्यांचा मित्रांना शोधू लागले यासाठी की, त्यांचा घात करावा.

14तेव्हा दानीएलाने अंगरक्षकांचा प्रधान अर्योक जो, बाबेलातील ज्ञानांच्या घात करायला निघाला होता, त्याला दुरदर्शिपनाने आणि विचारपूर्वक म्हणाला.

15दानीएल राज्याच्या सेनापतीला म्हणाला, “राजाकडून हा असा तातडीचा फर्मान का निघाला?” तेव्हा अर्योकने दानीएलास काय घडले ते सांगितले.

16मग दानीएलाने आत जाऊन राजास विनंती केली की, “त्याला नेमलेला समय द्यावा म्हणजे महाराजाला त्याचा स्वप्नाचा उलगडा सांगता येईल.”

17तेव्हा दानीएललाने आपल्या घरात जाऊन आपले सोबती हनन्या, मीशाएल व अजऱ्या यांना ती गोष्ट कळवली,

18त्याने त्यांना विनंती केली की, ह्या रहस्याविषयी स्वर्गीय देवाने दया करावी असे त्यांनी देवाजवळ मागावे म्हणजे बाबेलाच्या इतर ज्ञान्यासोबत त्याचा आणि त्याच्या सहकाऱ्याचा घात होऊ नये.

19त्या रात्री दानीएलास दृष्टांताद्वारे, ह्या रहस्याचा उलगडा झाला. त्यानंतर त्याने स्वर्गीय देवाचे स्तवन केले.

20आणि तो म्हणाला, “देवाच्या नामाचे सदासर्वदा स्तवन होवो, कारण ज्ञान आणि सामर्थ्य त्याचे आहे.

21तो समय आणि ऋतु बदलतो, तो राजास काढतो आणि दुसऱ्यास सिंहासनावर बसवून राजे करतो तो ज्ञान्यास आणि समंज्यस्यास शहाणपण देतो.

22तो गुढ आणि गहन प्रगट करतो कारण अंधारात काय आहे हे तो जाणतो, आणि प्रकाश त्यात वसतो.

23माझ्या पूर्वजाच्या देवा, मी तुझे आभार मानतोच आणि तुझे स्तव करतो कारण तू मला ज्ञान आणि सामर्थ्य दिले आता तू मला ते कळविले त्यासाठी आम्ही तुला प्रार्थना केली, तू आम्हाला ते कळविले जे राजाशी निगडीत आहे.”

24हे सगळे झाल्यानंतर दानीएल ज्याची नेमणूक राजाने बाबेलाच्या सर्व ज्ञानी लोकांचा वध करण्यास केली होती त्या अर्योकाकडे जाऊन म्हणाला, “बाबेलाच्या ज्ञानी लोकांना ठार करु नको, तर मला राजासमोर घेऊन जा म्हणजे मी त्याला स्वप्न आणि त्याचा अर्थ सांगेन.”

25नंतर अर्योकाने दानीएलास लवकर राजासमोर नेऊन म्हटले, “यहूदाच्या बंदीवानात मला एक मनुष्य सापडला आहे जो राज्याच्या स्वप्नाचा अर्थ सांगेल.”

26राजाने बेल्टशस्सर नाव दिलेल्या दानीएलास म्हटले, “माझे स्वप्न आणि त्याचा अर्थ सांगण्यास तू कुशल आहेस काय?”

27दानीएलाने राजास उत्तर दिले, “राजाचे गुढ प्रकट करण्याची कुशलता, ज्ञानी, व भुतविद्या करणारे, जादूगार किंवा ज्योतिषी कडे नाही.

28तथापी, एक देव आहे जो स्वर्गात राहतो तो रहस्य प्रगट करतो आणि त्याने भविष्यात होणारी घटना राजा नबुखद्रेस्सर आपणास कळविली आहे. तुम्ही आपल्या बिछान्यात पडले असता तुमचे स्वप्न आणि दृष्टांत तो असा;

29आपण जसे बिछान्यात पडून विचार करत होता तेव्हा आपल्या मनात हे रहस्य प्रगट करणाऱ्याने आपणास होणारी घटना कळविली.

30आता माझी गोष्ट, ती अशी की, हे रहस्य मला उलगडते ते यासाठी नाही की मी इतर माणसांपेक्षा अधिक ज्ञानी आहे तर हे रहस्य यासाठी उलगडले की, राजा आपण याचा अर्थ समजावा जो आपल्याला गहन विचारात आहे.

31राजा आपण, आपल्या डोळयापुढे एक मोठा पुतळा पाहिला हा पुतळा शक्तीशाली आणि तेजोमय, तुमच्यासमोर उभा राहिला, त्याचे तेज भयावह होते.

32त्या पुतळयाचे डोके उत्तम सोन्याचे होते त्याची छाती व हात चांदीचे होते, त्यांचा मधला भाग आणि मांडया पितळेच्या.

33आणि त्याचे पाय लोखंडाचे होते त्याची पावले काही भाग लोखंड आणि काही भाग मातीची होती.

34तुम्ही वर पाहिले आणि एक दगड तुटून पडला, तरी मानसाच्या हातून नाही, आणि तो त्या पुतळयाच्या पायावर जे लोखंडाचे व मातीचे त्याचे आदळून त्याचे फुटून तुकडे केले.

35त्यानंतर लोखंड, माती, पितळ, चांदी आणि सोने यांचे एकाच वेळी तुकडे झाले आणि ते उन्हयाळयातील खळयातल्या भुश्याप्रमाणे झाले. वार त्यांना घेऊन गेला आणि त्यांचा मागमूस राहिला नाही. पण तो दगड जो पुतळयावर आदळला होता त्यांचा मोठा पर्वत होऊन त्याने सर्व पृथ्वी व्यापली.

36हे आपले स्वप्न आहे राजा, आता आम्ही त्याचा उलगडा सांगतो.

37राजा आपण, राजाधिराज आहात ज्यास स्वर्गाच्या देवाने राज्य, सामर्थ्य, बल आणि सन्मान दिला आहे.

38त्याने तुम्हास त्या जागा दिल्या जिथे मानसे राहतात त्याने तुमच्या आधीन वनपशु आणि आकाशातील पक्षी केली आहेत आणि तुम्हाला त्याचा शासक बनविले आहे, तुम्ही त्या मुर्तीचे सुवर्ण मस्तक आहात.

39आपल्यानंतर आपणापेक्षा कनिष्ठ असे राज्य उदयास येईल, आणि पितळेचे असे तिसरे राज्य सर्व पृथ्वीवर सत्ता करतील.

40तेथे चौथे राज्य असेल जे लोखंडासारखे मजबूत लोखंड तुकडे करतो हे त्यांचे तुकडे करून त्यांचा भुगा करील.

41जसे आपण पाहिले की, पावले आणि बोटे काही भाग भाजलेल्या मातीचा आणि काही भाग लोखंडाचा होता, म्हणून हे राज्य विभागलेले राहील, काही भागात लोखंडाची मजबुती राहील तसेच जसे आपण लोखंड मातीत मिसळलेला पाहिजे.

42जसे पायांची बोटे अंशत: लोखंडाची आणि अंशत: मातीची बनली होती तसे ते राज्य असेल अंशत: बळकट आणि अंशत: ठिसूळ असे होईल.

43जसे आपण पाहिले लोखंड मऊ माती सोबत मिसळले होते, तसे लोक मिसळलेले राहतील, जसे लोखंड माती एक होत नाही तसे हे लोकही एकत्र राहणार नाही.

44त्या राज्याच्या दिवसात स्वर्गीय देव एक राज्याची स्थापना करील, त्याचा कधीही नाश होणार नाही, त्यास कोणी जिंकणार नाही ते तर सर्व राज्याच्या तुकडे करून त्या सर्वांचा नाश करील व ते सर्व काळ टिकेल.

45आपण जसे पाहिले कोणी मनुष्याचा हात न लागता एक दगड पर्वतांवरुन तुटून पडला त्याने लोखंड, पितळे, माती, चांदी आणि सोने यांचे तुकडे केले, त्या महान परमेश्वराने राजा पुढे होणाऱ्या घटना कळविल्या आहेत. हे स्वप्न सत्य असून त्याचा हा विश्वसनीय उलगडा आहे.”

46राजा नबुखद्रेस्सराने पालथे पडून दानीएलास साष्टांग दंडवत घातले आणि आज्ञा केली की त्याला अर्पण करून धूप दाखवा.

47राजा दानीएलास म्हणाला, “खरोखर तुझा देव सर्व देवांचा देव आहे, राजांचा राजा आहे, तो जो रहस्यांचा उलगडा करतो, म्हणून तुला हे रहस्या प्रगट करता आहे.”

48नंतर राजाने दानीएलास मोठा सन्मान आणि अद्भुत भेटवस्तु दिल्या. त्याला अवघ्या बाबेलातील परगण्याची सत्ता दिली आणि दानीएल बाबेलाच्या सर्व ज्ञानी लोकांचा मुख्य प्रशासक झाला.

49दानीएलाने राजास केलेल्या विनंतीवरुन, राजाने शद्रुख, मेशख आणि अबेदनगो हयास बाबेलाच्या प्रांताचे प्रशासक नेमले पण दानीएल राजदरबारीचे राहिला.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Daniel 2 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran