Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Daniel 10 >> 

1पारसाचा राजा कोरेश हयाच्या तिसऱ्या वर्षी दानीएल (ज्याला बेल्टशस्सर हे नाव होते) हा संदेश प्राप्त झाला जो सत्य होतो तो एक मोठया युध्दाविषयी होता. दानीएलास तो संदेश त्या दृष्टांतास समज प्राप्त झाला.

2त्या दिवसात मी दानीएल, तिन आठवडे शोक करत होतो.

3ते तिन आठवडे संपेपर्यंत मी पकवान खाल्ले नाही मी द्राक्षारस पिला नाही माझ्या डोक्याला तेल लावले नाही तोवर हे तिन पूर्ण होत नाही.

4पहिल्या महिन्याच्या चोविसाव्या दिवशी मी तैग्रिसनदीच्या काठावर होतो (जी टायग्रीस आठवडे आहे).

5मी डोळे वर करून पाहिले तर मला तागाची वस्त्रे घातलेला आणि कंबरेत उपगज देशाच्या शुध्द सोन्याचा पट्टा घातलेला एक पुरुष दिसला.

6त्याचे शरीर रत्नासारखे असून त्याचा चेहरा विजेसारखा होता, त्याचे डोळे जळणाऱ्या मशालीसारखे असून त्याचे बाहू आणि पाय उजळलेल्या पितळेसारखे होते आणि त्याचा शब्दाचा आवाज मोठया समुदायाच्या आवाजासारखा होता.

7मी दानीएल एकटयाने हा दृष्टांत पाहिला माझ्याबरोबर असणाऱ्या लोकांनी काही पाहिले नाही तरीही त्यांना मोठी भिती वाटली आणि लपण्यासाठी तेथून ते पळून गेले.

8मग मी एकटाच राहिलो आणि तो मोठा दृष्टांत मी पाहिला. माझ्यात बळ उरले नाही. माझा चेहरा भितीने बदलून गेला आणि माझ्यात बळ राहीले नाही.

9मग मी त्याची वाणी एकेली आणि ते ऐकत असता पालथा पडलो आणि मला गाढ झोप लागली.

10एका हाताने मला स्पर्श केला आणि माझे गुडगे आणि तळहात थरथरु लागले.

11तो दूत मला म्हणाला, “दानीएला परमप्रिय पुरुषा मी जे सांगतो ते मन लावून समजून घे; आणि स्थिर रहा, तुला हे सांगण्यासाठी मला पाठवले आहे,” जेव्हा तो हे शब्द बोलला मी थरथरत उभा राहिलो.

12नंतर तो मला म्हणाला, “दानीएला भिऊ नकोस, पहिल्या दिवसापासून तू तुझे मन हे समजून घ्यायला आणि आपल्या देवापुढे नम्र होण्यास ठरविले त्याच दिवशी तुझी प्रार्थना ऐकण्यात आली आणि तुझ्या त्या शब्दास्तव मी आलो आहे.

13पारसाच्या राज्याचा अधिपती मला आडवा आलाय आणि मला तिथे पारसाच्या राजांबरोबर एकविस दिवस ठेवण्यात आले पण मीखाएल मुख्य अधिपतीपैकी एक माझ्या मदतीला आला.

14आता मी तुला हे समजविण्यास आलो आहे की, शेवटच्या दिवसात तुझ्या लोकांचे काय होणार कारण हा दृष्टांत पूर्ण होण्यास बराच वेळ आहे.”

15जेव्हा तो हे शब्द बोलून थांबला मी माझे मुख जमिनीकडे लावले आणि मी त्यावेळी बोलू शकलो नाही.

16तो जो मनुष्यासारखा दिसत होता त्याने माझ्या ओठास स्पर्श केला व मी माझे तोंड उघडले आणि जो माझ्यापुढे उभा होता त्याच्याशी मी बोललो, “हे प्रभू ह्या दृष्टांतामुळे माझे मन अधिर झाले आहे आणि माझ्यात बळ राहीले नाही.

17मी तुझा दास आहे मी आपल्या स्वामीबरोबर कसा बोलू? कारण माझ्यात बळ आणि दम उरला नाही.”

18तो जो मनुष्यासारखा दिसत होता त्याने मला स्पर्श करून मला बळ दिले.

19तो म्हणाला, “हे परमप्रिय मानवा घाबरु नकोस, तुला शांती असो हिंमत धर आता,” नेट धर! जेव्हा तो हे बोलला मला बळ मिळाले आहे व मी म्हणालो, “माझ्या स्वामीने आता बोलावे, कारण तू मला सबळ केले आहे.”

20तो म्हणाला, मी तुझ्याकडे का आलो हे तुला ठाऊक आहे काय? आता मी परत जाऊन पारसाच्या अधिपतीबरोबर लढणार मी गेलो म्हणजे ग्रिसचा अधिपती येईल.

21पण मी तुला ह्या पुस्तकात काय लिहीले आहे ते सांगतो, तुझा अधिपती मीखाएल शिवाय कोणी नाही.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Daniel 10 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran