Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Daniel 11 >> 

1दारयावेश मेदी राजाच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी मी यासाठी आलो की, मिखाएलास मदत करून त्यास संरक्षण द्यावे.

2आणि आता मी तुला सत्य प्रगट करतो. पारसात तिन राजे उदयास येतील आणि चौथा राजा इतरांपेक्षा जास्त धनवान होईल जेव्हा तो आपल्या धनाच्या मदतीने बलवान झाला मग तो सर्वांस ग्रीसच्या राज्याच्या विरोधास उठवील.

3एक प्रबळ राजा उदयास आल्यावर तो आपली सत्ता फार गाजवील व मनात येईल तसा वागेल.

4आणि तो उभा झाल्यावर त्याचे राज्य मोडून जाईल, चार दिशांत त्यांचे विभाग होईल; पण ते त्याच्या संततीलीा प्राप्त होणार नाही, आणि राज्य उपटले जाईल व ते त्यांच्याखेरीज इतरांस प्राप्त होईल.

5दक्षिणेचा राजा प्रबळ होईल पण त्याचा एक सरदार त्याहूनही बलवान होईल आणि त्याहून मोठया राज्यावर राज्य करील.

6काही वर्षानंतर जेव्हा योग्य वेळ असेल ते आपसात मिलाप करतील. दक्षिणेच्या राज्याची मुलगी उत्तरेच्या राजाकडे कराराची खात्री करण्यास येईल पण तिचे बळ निघून जाईल व तिला सोडून येण्यात येईल ती आणि ज्यांनी तिला आणले ते तिचे वडील आणि तिला त्यावेळी मदत करणारा सोडून देण्यात येईल.

7तरी तिच्या कुळातून एक अंकूर उगवेल तो तिची जागा घेईल तो सैन्यासह उत्तरेच्या राजाच्या गडात प्रवेश करून त्याच्याशी युध्द करील आणि त्यात तो विजयी होईल.

8तो त्यांची दैवते ओतीव मुर्त्या आणि मौल्यवान सोने व चांदीची पात्रे मिसर देशात घेऊन जाईल आणि काही वर्षासाठी उत्तरेच्या राजावर हल्ला करणार नाही.

9उत्तरेचा राजा, दक्षिणेचा वर चढाई करून जाईल पण त्याला स्वदेशी परत जावे लागेल.

10त्याचे पुत्र लढाई करतील आणि मोठे सैन्य जमवतील ते पुराप्रमाणे येत राहतील ते लढाई करून पुन्हा लढाई करून गडापर्यंत धडकतील.

11दक्षिणेचा राजा रागात येऊन उत्तरेच्या राजाबरोबर लढाई करील उत्तरेचा राजा मोठे सैन्य उभारीन पण ते सैन्य दक्षिणेच्या राजास देण्यात येईल.

12जेव्हा सैन्य पुढे चालत राहील, तेव्हा दक्षिणेच्या राजाचे मन गर्वाने भरुन जाईल तो त्याच्या लाखो शत्रूंचा नाश करील तरी तो यशस्वी होणार नाही.

13उत्तरेचा राजा पुन्हा येईल तेव्हा आधीपेक्षा मोठे उकृष्ट व धन घेऊन येईल सैन्य आणि उपकरणे घेऊन येईल. 14 त्यावेळी अनेक लोक दक्षिणेच्या राज्याच्या विरोधास उठतील तुझ्या लोकातून आडदांड लोक दृष्टांत पूर्ण करण्यास उठतील. पण ते पडतील.

14त्यावेळी अनेक लोक दक्षिणेच्या राज्याच्या विरोधास उठतील तुझ्या लोकातून आडदांड लोक दृष्टांत पूर्ण करण्यास उठतील. पण ते पडतील.

15अश्याप्रकारे उत्तरेचा राजा येऊन तटबंदीच्या शहराभोवती मोर्ची लावून नगर काबीज करील. दक्षिणेचे त्यापुढे काही एक चालणार नाही, त्याच्या उत्तम सैनिकही त्यापुढे शक्तीहीन होतील.

16पण उत्तरेचा राजा मनात येईल तसे दक्षिणेच्या राजाशी करील त्याला कोणी थांबवू शकणार नाही, त्या सुंदर भूमीवर तो हाती नाश घेऊन उभा राहील.

17उत्तरेचा राजा आपल्या राज्यातील सर्व ताकदीने येईल. आणि तो उत्तरेच्या राज्याशी करार करील तो दक्षिणेच्या राजाला आपली कन्या भष्ट करण्यास देईल म्हणजे त्यास दक्षिणेचे राज्य नष्ट करता येईल पण त्याची योजना यशस्वी होणार नाही.

18हयानंतर उत्तरेचा राजा आपले लक्ष द्विपाकडे लावू त्यापैकी बरेच काबीज करील पण एक सरदार त्याचा उध्दटपणा थांबवून आणि त्यावर आपला उध्दटपणा किरवील.

19मग तो आपल्या देशातील दुर्गाकडे आपला मोर्ची लावील पण तो ठोकर खाऊन पडेल व तो सापडणार नाही.

20नंतर त्याच्या जागी एक उदयास येईल जो त्या वैभवी राज्यात कर देण्याचा आग्रह करील पण काही दिवसात त्याचा नाश होईल पण तो रागात किंवा युध्दात होणार नाही.

21मग त्याच्या जागी नकारलेला आणि वैभव न मिळालेला असा एक उदयास येईल तो शांतपणे येऊन खुशामतीने राज्य प्राप्त करील.

22त्या लोकांचे भळ त्यापुढे वाहून जाईल दोघे ते सैन्य आणि अधिपती जे कराराद्वारे स्थापित केले होते ते पावतील.

23त्याच्यासोबत संघटन केल्यापासून तो कपटाने वागेल. थोडयाशा लोकांच्या मदतीने तो बलवान होईल.

24सुचना न देता तो प्रांतातील धनवान भागात येईल आणि तो ते करीले जे त्याच्या वडिलांच्यान किंवा त्यांच्या वडीलाने केले नाही तो आपल्या सहकाऱ्यास लुट आणि धन वाटून देईल काही काळ तो किल्ले घेण्याचे कारस्थान करील.

25दक्षिणेच्या राज्याशी तो लढण्यास पूर्ण शक्तीने तयारी करेल दक्षिणेचा राजा मोठा फौजफाटा घेऊन युध्द करेल पण कटकारस्थानामुळे त्याचा निभाव लागणार नाही.

26जे त्याच्या मेजावर जेवले ते पण त्याचा घात करु पाहतील. त्याचे सैन्य पुरासारखे वाहून जाईल आणि त्यापैकी अनेक मरतील.

27ही दोन्ही राजे एकमेकांच्या विरोधास वाईट योजतील एकाच मेजावर बसून एकमेकांशी लबाड बोलतील पण त्यातून काही निघणार नाही, कारण शेवट हा नेमलेल्या वेळीच होणार.

28उत्तरेचा राजा मोठी संपत्ती आपल्या देशात घेऊन जाईल पण त्याचे मन पवित्र कराराच्या विरोधात राहील त्याच्या मनात येईल तसे तो वागेल आणि तो आपल्या भूमीत परत येईल. 29 नेमलेल्या समयी तो दक्षिणेस परतून पुन्हा हल्ला करील पण हयावेळी त्याचे काहीच चालणार नाही.

29नेमलेल्या समयी तो दक्षिणेस परतून पुन्हा हल्ला करील पण हयावेळी त्याचे काहीच चालणार नाही.

30कारण कित्तिमाचे जहाज त्याच्या विरोधात येतील आणि तो निराश होऊन मागे फिरेल तो पवित्र करारावर खिन्न होऊन ज्यांनी हा करार सोडला त्यांच्यावर लक्ष करील.

31त्याचे सैन्य उठून वेदी आणि गड भ्रष्ट करतील रोजची बलिहवन ते बंद करतील आणि नाशदायी अमंगळाची ते स्थापना करतील.

32जे कराराविषयी दुष्टपण करतात त्यास तो फुस लावील, पण जे लोक आपल्या देवाला जाणतात ते बलवान होऊन मोठे काम करतील.

33लोकांमधील चतूर इतरांना समज देतील पण ते बरेच दिवस तलवार अग्नी पडतील बंदिवास व लूटालूट यांनी संकटात पडतील.

34जेव्हा ते पडतील त्यांना थोडी मदत मिळेल आणि बरेच त्यांच्यात सामील होतील जे बोलतील तसे करणार नाही.

35काही चतुर पडतील यासाठी की ते शुध्द, स्वच्छ आणि निर्मळ व्हावे जेव्हा पर्यंत नेमलेली वेळ येत नाही.

36राजा मनात येईल तसे करील तो आपणास इतर सर्व देवासमोर उंच आणि महान करील आणि देवा विरोधात तो धक्कादायक गोष्टी बोलेल, कोपाची पुर्णता होईपर्यंत तो बढती मिळविल जे ठरले आहे ते घडेलच.

37तो आपल्या पुर्वजाचे देव, स्त्रियांच्या प्रेमाचे किंवा कोणत्याही देवाचा सन्मान करणार नाही तो गर्वाने वागले आणि आपणास त्या सर्वांहून उंच करील.

38त्याच्याऐवजी दुर्गाच्या देवाताचा आदर करील तो त्या देवाचा आदर करील ज्याची ओळख त्याच्या पुर्वजास नव्हती तो सोने रुपे, हिरे आणि बहुमुल्य वस्तुंनी त्यांची पुजा करील.

39तो परक्या देवाच्या मदतीने बलाढय दुर्गावर हल्ला करील. ते हयाला जाणतात त्यांचा तो आदर करील त्यांना तो अनेक लोकांवर शासक नेमील व किंमतीसाठी जमिनीचे तुकडे करील.

40शेवटच्या वेळी दक्षिणेचा राजा हल्ला करील. उत्तरेचा राजा त्याकडे रथ, स्वार आणि अनेक जहाज घेऊन वाऱ्यासारखा येईल. तो अनेक राज्यावर हल्ला करून त्यांना पुरासारखे पुसुन टाकील.

41तो वैभवी देशात येईल आणि अनेक लोक पडतील पण अनेकांचा त्याच्या हातून बचाव होईल अदोम, मवाब आणि अम्मोनाचे सरदार, हे त्याच्या हातून सुटतील.

42तो अनेक देशावर आपले बळ वाढवील, मिसर त्यातून सुटणार नाही.

43त्याला मिसर देशातील सोने, आणि रुपे आणि तेथील सर्व खजिन्यावर त्याला अधिकार मिळाले. लूबी आणि कुशी त्याची चाकरी करतील.

44पण पुर्वेकडून आणि उत्तरेकडून येणारी बातमी त्याला चिंताग्रस्त करील तेव्हा तो मोठया रागाने अनेकांचा नाश करण्यासाठी निघुन जाईल.

45तो आपला शाही तंबू समुद्राच्या आणि पवित्र पर्वताच्या मधात ठोकील. तो त्याच्या शेवटास येईल. पण कोणी त्याला मदत करणार नाही.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Daniel 11 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran