Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  1 Chronicles 8 >> 

1बेला हा बन्यामीनचा ज्येष्ठ पुत्र. आश्बेल हा दुसरा आणि अहरह हा तिसरा.

2चौथा नोहा व पाचवा राफा.

3अद्दार, रोरा, अबीहूद,

4अबीशूवा, नामान, अहोह,

5गेरा, शफूफान आणि हुराम हे बेलाचे मुलगे.

6एहुदाचे पुत्र गेबा येथल्या पितृकुलाचे प्रमुख होते. त्यांस पाडाव करून मानाहथ येथे नेले.

7नामान, अहिया व गेरा यांस त्याने कैदी करून नेले. त्यांस उज्जा व अहिहूद हे झाले.

8शहरयिमाने मवाबात आपल्या बायका हुशीम आणि बारा यांना घटस्फोट दिला. यानंतर त्याला दुसऱ्या एका बायकोपासून मुले झाली.

9त्याची बायको होदेश हिच्यापासून त्याला योबाब, सिब्या, मेशा, मल्काम,

10यऊस. शख्या, मिर्मा हे मुलगे झाले. ते आपल्या वडिलांच्या घराण्यांचे प्रमुख होते.

11हुशीम पासून शहरयिमाला अबीटूब आणि एल्पाल हे मुलगे झाले.

12एबर, मिशाम शमेद, बरीया आणि शमा हे एल्पाचे मुलगे. शमेदने ओनो आणि लोद व त्या आसपासची गावे वसवली.

13बरीया आणि शमा हे अयालोनमधील घराण्यांचे प्रमुख होते. त्यांनी गथ येथील रहिवाश्यांना हुसकावून लावले.

14हे बरीयाचे मुलगे: अह्यो, शाशक, यरेमोथ,

15जबद्या. अराद, एदर,

16मीखाएल, इश्पा, योहा हे बरीयाचे मुलगे.

17जबद्या, मशुल्लाम, हिज्की, हेबेर,

18इश्मरय, इज्लीया, योबाब हे एल्पालचे मुलगे.

19याकीम, जिख्री, जब्दी,

20एलीएनय, सिलथय, अलीएल,

21अदाया, बराया, शिम्राथ हे शिमीचे मुलगे.

22इश्पान, एबर, अलीएल,

23अब्दोन, जिख्री, हानान,

24हनन्या, एलाम, अनथोथीया,

25इफदया, पनुएल हे शाशकचे मुलगे होत.

26शम्शरय, शहऱ्या, अथल्या,

27यारेश्या, एलीया, जिख्री हे यरोहामचे मुलगे.

28हे सर्व आपापल्या घराण्यांचे प्रमुख होते. ते यरुशलेम येथे राहत होते.

29गिबोनचा बाप यइएल. तो गिबोनमध्ये राहत होता. त्याची बायको माका.

30त्याचा ज्येष्ठ पुत्र अब्दोन. सूर, कीश, बाल, नादाब,

31गदोर, अह्यो, जेखर आणि मिकलोथ ही इतर मुले.

32शिमा हा मिकलोथचा मुलगा. आपल्या यरुशलेममधील बांधवांच्या जवळच हे सर्व राहत होते.

33कीशचा बाप नेर. कीश शौलचा बाप. आणि शौल योनाथान, मलकीशुवा, अबीनादाब, एश्बाल यांचा.

34योनाथानचा मुलगा मरीब्बाल. मरीब्बाल मीखाचा बाप.

35पीथोन, मेलेख, तरेया आणि आहाज हे मीखाचे मुलगे.

36यहोअद्दाचे वडील आहाज. यहोअद्दा आलेमेथ, अजमाबेथ व जिम्री यांचा बाप होता. जिम्री हा मोसाचा बाप होता.

37बिनाचा पिता मोसा. बिनाचा मुलगा राफा. राफाचा एलासा. एलासाचा आसेल.

38आसेलला सहा मुलगे होते. ते म्हणजे अज्रीकाम, बोखरु, इश्माएल, शाऱ्या, ओबद्या, हान.

39आसेलचा भाऊ एशेक. त्याचे मुलगे: ज्येष्ठ मुलगा ऊलाम, दुसरा यऊष आणि तिसरा अलिफलेत.

40ऊलामचे मुलगे शूर आणि उत्तम धनुर्धर होते. मुले, नातवंडे मिळून दिडशे जण होते. हे सर्व बन्यामीनाचे वंशज होते.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  1 Chronicles 8 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran