Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  1 Chronicles 7 >> 

1इस्साखारला चार मुलगे होते. त्यांची नावे अशी, तोला, पुवा, याशूब आणि शिम्मोन.

2उज्जी, रकाया, यरीएल, यहमय, इबसाम आणि शमुवेल हे तोलाचे मुलगे. आपापल्या वडिलांच्या घराण्यात प्रमुख होते. ते आणि त्यांचे वंशज हे शूर लढवय्ये होते. त्यांची संख्या वाढून दावीदाच्या दिवसापर्यंत बावीस हजार सहाशे इतकी झाली.

3इज्रह्या हा उज्जीचा मुलगा. मिखाएल. ओबद्या. योएल आणि इश्शीया हे इज्रह्याचे पाच मुलगे. हे ही आपापल्या घराण्यांचे प्रमुख पुरुष होते.

4त्यांच्या घराण्यात छत्तीस हजार सैनिक युध्दाला तयार होते असे त्यांच्या वंशावळ्यांनी मोजलेले होते. कारण त्यांच्या बायका आणि मुले पुष्कळ होते.

5इस्साखारच्या सर्व घराण्यांमध्ये मिळून सत्याऐंशी लढवय्ये वंशावळ्यांनी मोजलेले होते.

6बन्यामीनला तीन मुलगे होते. बेला, बेकर आणि यदीएल.

7बेलाला पाच मुलगे होते. एस्बोन, उज्जी, उज्जीयेल, यरीमोथ आणि ईरी हे ते पाच होत. ते आपापल्या घराण्यांचे प्रमुख होते. त्यांच्यात बावीस हजार चौतीस सैनिक होते.

8जमीरा, योवाश, अलियेजर, एल्योवेनय, अम्री, यरेमोथ, अबीया, अनाथोथ व अलेमेथ हे बेकेर चे मुलगे.

9आपापल्या घराण्यांचे प्रमुख कोण ते त्यांच्या वंशावळ्यांनी मोजलेले. वीस हजार दोनशे सैनिक होते.

10यदीएलचा मुलगा बिल्हान. बिल्हानची मुले, यऊश, बन्यामीन, एहूद, कनाना, जेथान, तार्शीश व अहीशाहर.

11यदीएलचे मुलगे हे त्यांच्या घराण्याचे प्रमुख होते. त्यांच्याकडे सतरा हजार दोनशे सैनिक युध्दाला तयार होते.

12शुप्पीम आणि हुप्पीम हे ईरचे वंशज आणि अहेरचा मुलगा हुशीम.

13यहसिएल, गूनी, येसर आणि शल्लूम हे नफतालीचे मुलगे. हे सर्व बिल्हेचे वंशज.

14मनश्शेचे मुलगे, अस्रीएल हा त्याची अरामी उपपत्नीपासून झाला. माखीर म्हणजे गिलादचा बाप.

15हुप्पीम आणि शुप्पीम या लोकांपैकी एका बाईशी माखीरने लग्न केले. त्या बहिणीचे नाव माका होते. मनश्शेच्या दुसऱ्या वंशजाचे नाव सलाफहाद होते. त्याला फक्त मुलीच होत्या.

16माखीरची बायको माका हिला मुलगा झाला. तिने त्याचे नाव पेरेस ठेवले. त्याच्या भावाचे नाव शेरेश. शेरेशचे मुलगे ऊलाम आणि रेकेम.

17ऊलामचा मुलगा बदान. हे झाले गिलादचे वंशज. गिलाद हा माखीरचा मुलगा. माखीर मनश्शेचा मुलगा.

18माखीरची बहीण हम्मोलेखेथ हिला इशहोद, अबीयेजेर आणि महला हे मुलगे झाले.

19अह्यान, शेखेम, लिखी आणि अनीयाम हे शमीदचे मुलगे.

20एफ्राईमची वंशावळ पुढीलप्रमाणेः एफ्राईमचा मुलगा शुथेलह. शुथेलहचा मुलगा बेरेद. बेरेदाचा मुलगा तहथ. तहथाचा मुलगा एलादा. एलादाचा मुलगा तहथ.

21तहथचा मुलगा जाबाद. जाबादचा मुलगा शुथेलह. गथ नगरात वाढलेल्या काही लोकांनी एजेर एलद यांना ठार मारले. कारण ते दोघे गथच्या लोकांची गुरेढोरे चोरण्यास गेले होते.

22एजेर आणि एलद हे एफ्राईमचे मुलगे होते. एजेर आणि एलद यांच्या निधनाचा शोक त्याने बरेच दिवस केला. त्याच्या बांधवांनी त्याचे सांत्वन केले.

23मग एफ्राईमचा बायकोशी संबंध येऊन त्याची बायको गर्भवती राहिली आणि तिने एका मुलाला जन्म दिला. त्याने त्याचे नाव बरीया ठेवले. कारण त्याच्या घराण्यात शोकांतिका झाली होती.

24त्याची मुलगी शेरा होती. हिने खालचे आणि वरचे बेथ-होरोन आणि उज्जनशेरा ही बांधली.

25रेफह हा एफ्राईमचा मुलगा. रेफहचा मुलगा रेशेफ. रेशेफचा मुलगा तेलह. तेलहचा मुलगा तहन.

26तहनचा मुलगा लादान. लादानचा मुलगा आम्मीहूद. आम्मीहूदचा अलीशामा.

27त्याचा मुलगा नून आणि नूनचा मुलगा यहोशवा.

28एफ्राईमच्या वंशजांची वतने आणि गावे पुढीलप्रमाणे त्या त्या ठिकाणी ते राहत होते. बेथेल व त्याच्या जवळपासची गावे. पूर्वेला नारान, र्पार्मिला गेजेर आणि आसपासची खेडी, शखेम आणि त्याच्या आसपासची खेडी अगदी थेट अय्या व त्या भोवतालच्या प्रदेशापर्यंत.

29मनश्शेच्या सीमेला लागून असलेली बेथ-शान, तानख, मगिद्दो, दोर ही नगरे व त्यांच्या भोवतालचा प्रदेश एवढ्या भागात इस्राएलचा मुलगा योसेफ याचे वंशज राहत होते.

30इम्रा, इश्वा, इश्वी, बरीया हे आशेरचे मुलगे. त्यांची बहीण सेराह.

31हेबेर, मालकीएल, हे बरीयाचे मुलगे. मालकीएलचा मुलगा बिर्जाविथ.

32यफलेट, शोमर, होथाम हे मुलगे आणि शूवा ही बहीण यांच्या हेबेर हा बाप होता.

33पासख, बिह्माल, अश्वथ हे यफलेटचे मुलगे.

34अही, राहागा. यहूबा व अराम हे शेमेरचे मुलगे.

35शेमेरचा भाऊ हेलेम. त्याचे मुलगे सोफह, इम्ना, शेलेश आणि आमाल.

36सोफहचे मुलगे सूहा, हर्नेफेर, शूवाल, बेरी व इम्ना,

37बेसेर, होद, शम्मा, शिलशा, इथ्रान, बैरा.

38यफुन्ने पिस्पा, अरा हे येथेरचे मुलगे.

39आरह, हन्निएल व रिस्या हे उल्लाचे मुलगे.

40हे सर्व आशेरचे वंशज. ते आपापल्या घराण्यांचे प्रमुख होते. त्यांच्या वंशावळ्यांनी मोजलेले असे ते सव्वीस हजार लढवय्ये पुरुष त्यांच्यात होते.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  1 Chronicles 7 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran