Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  1 Chronicles 9 >> 

1इस्राएलच्या सर्व लोकांची नोंद वंशावळीप्रमाणे केलेली आहे. इस्राएलाच्या राजाच्या पुस्तकात ती लिहिलेली आहे. त्यांच्या पापामुळे यहूदाच्या लोकांना बाबेल येथे कैद करून नेण्यात आले.

2त्यापैकी जे सगळ्यात आधी आपल्या, गावात येऊन राहिले ते म्हणजे इस्राएल लोक याजक, लेवी आणि मंदिरातील कामकरी वर्ग.

3यरुशलेममध्ये राहणाऱ्या यहूदा, बन्यामीन, एफ्राईम आणि मनश्शे घराण्यातील लोक राहत होते.

4ऊथय हा अम्मीहूदचा मुलगा. अम्मीहूद हा अम्रीचा मुलगा. अम्री इम्रीचा मुलगा. इम्री बानीचा मुलगा. बानी पेरेसच्या वंशजांपैकी. पेरेस हा यहूदाचा मुलगा.

5यरुशलेममध्ये राहणारे शिलोनी लोक असे, ज्येष्ठ पुत्र असाया आणि त्याचे मुलगे.

6यरुशलेममधील जेरह चे वंशज म्हणजे यऊवेल आणि त्याचे एकंदर सहाशे नव्वद भाऊबंद.

7बन्यामीन घराण्यातील लोक: सल्लू हा मशुल्लामचा मुलगा. मशुल्लाम होदव्याचा मुलगा. होदवा हस्सनुवाचा मुलगा.

8इबनया हा यरहोरामचा मुलगा. एला उज्जीचा मुलगा. उज्जी मिख्रीचा मुलगा. मशुल्लाम शफाटयाचा मुलगा. शफाटया रगुवेलचा मुलगा रगुवेल इबनीया याचा मुलगा.

9त्याचे नातेवाइक वंशावळीच्या यादीत लिहिले ते एकंदर नऊशे छपन्न होते. हे सर्व आपापल्या घराण्यांचे प्रमुख होते.

10यरुशलेममधील याजक यदया, यहोयारीब, याखीन,

11अजऱ्या. अजऱ्या हा हिल्कीयाचा मुलगा. हिल्कीया मशुल्लामचा मुलगा. मशुल्लाम सादोकचा. सादोक मरायोथचा आणि मरायोथ अहीटूबचा मुलगा. अहीटूब हा देवाच्या मंदिरावरील प्रमुख अधिकारी होता.

12यहोरामचा मुलगा अदाया होता. यहोराम हा पशहूरचा मुलगा. पशहूर मल्कीयाचा, आणि अदीएलचा मुलगा मसय. अदीएल यहजेराचा मुलगा, यहजेरा मशुल्लामचा मुलगा, मशुल्लेम मशिल्लेमीथचा, मशिल्लेमीथ इम्मेराचा मुलगा.

13असे एकंदर एक सातशे साठ याजक होते. ते आपापल्या घराण्यांचे मुख्य होते. देवाच्या मंदिरातील सेवेच्या कामाची जबाबदारी त्यांच्यावर होती.

14यरुशलेममधील लेवी घराण्यातले लोक हश्शूबचा मुलगा शमाया. हश्शूब अज्रीकामचा मुलगा. अज्रीकाम हशब्याचा मुलगा. हशब्या हा मरारीच्या वंशातला.

15याखेरीज बकूबकर, हेरेश, गालाल आणि मतन्या हे ही यरुशलेममध्ये राहत होते. मतन्या मीखाचा मुलगा. मीखा जिख्रीचा मुलगा. जिख्री आसाफचा मुलगा.

16ओबद्या शमाया याचा मुलगा. शमाया गालालचा मुलगा. गालाल यदूथूनचा मुलगा. याखेरीज आसा याचा मुलगा बरेख्या हाही तेथे राहत होता. आसा एल्कानाचा मुलगा. एल्काना हा नटोफाथी लोकांच्या जवळच्या छोट्या गावांमध्ये राहत होता.

17यरुशलेममधील द्वाररक्षक शल्लूम, अक्कूब, टल्मोन, अहीमान आणि त्यांचे नातलग. शल्लूम हा त्यांच्यावरचा मुख्य.

18हे लोक आता राजाच्या पूर्वेकडच्या प्रवेशद्वारापाशी उभे असतात. हे लेवीच्या वंशातले होते.

19शल्लूम हा कोरे याचा मुलगा. कोरे हा एब्यासाफचा मुलगा. एब्यासाफ कोरहचा मुलगा. शल्लूम आणि त्याचे भाऊबंद हे द्वारपाल होते. ते कोरहच्या वंशातले होते. निवासमंडपाच्या द्वाररक्षणाचे काम त्यांच्याकडे होते. आपल्या पूर्वजांप्रमाणेच ते हे काम पार पाडत होते. त्यांच्या पूर्वजांकडेही हीच जबाबदारी होती.

20पूर्वी फिनहास द्वारपालाचा प्रमुख होता. फिनहास हा एलाजारचा मुलगा. परमेश्वर त्याच्या संगती होता.

21जखऱ्या निवासमंडपाचा द्वारपाल होता.

22निवासमंडपाचे रक्षण करणारे असे एकंदर दोनशे बारा निवडक द्वाररक्षक होते. आपापल्या गावांच्या वंशावळ्यांमध्ये त्यांची नावे लिहिलेली आहेत. त्यांचा विश्वासूपणा पाहून दावीद आणि शमुवेल संदेष्टा यांनी त्यांची नेमणूक केली होती

23परमेश्वराच्या मंदिराच्या, निवासमंडपाच्या प्रवेशद्वारांवर राखण करण्याची जबाबदारी या द्वारपालांची आणि त्यांच्या वंशजांची होती.

24पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण अशी चार दिशांना प्रवेशद्वारे होती.

25आसपासच्या गावांमध्ये राहणारे द्वारपालांचे नातेवाईक वेळोवेळी त्यांच्या मदतीला येत. आले की सलग सात दिवस मदतीला राहत.

26या सर्व द्वारपालांचे नायकत्व चार लेवी द्वारपालांकडे होते. देवाच्या मंदिरातील खोल्या आणि खजिना यांची जपणूक करण्याचे काम त्यांचे होते.

27देवाच्या मंदिरावर पहारा करण्यासाठी ते रात्रभर त्याच्या सभोवती जागे राहत. दररोज सकाळी मंदिराचे दरवाजे उघडण्याचे काम त्यांच्याकडे होते.

28मंदिरात वापरावयाच्या पात्रांची देखभाल काही द्वारपाल करत. ती पात्रे बाहेर काढताना आणि पुन्हा आत ठेवताना ते ती मोजून ठेवत असत.

29आणि त्यांच्यांतले काहीजण सामानावर व पवित्रस्थानाच्या सर्व पीठ, द्राक्षारस, तेल, धूप, सुवासिक द्रव्य आणि साधनांची काळजी घेण्यास यावर नेमलेले होते.

30याजकांचे काही मुले सुवासिक द्रव्याचे मिश्रण करण्याचे काम करत असत.

31लेव्यातला एक मत्तिथ्या, जो शल्लूम कोरही याचा थोरला मुलगा होता. अर्पणाच्या भाकरी तयार करण्याऱ्यांचा प्रमुख होता.

32कहाथीच्या वंशातील त्यांचे काही भाऊ, प्रत्येक शब्बाथवारी समक्षतेच्या भाकरी तयार करण्याऱ्यांचे प्रमुख होते.

33लेव्यांच्या घराण्यांचे प्रमुख आणि गायक होते ते मंदिरातील खोल्यांत राहत होते. कारण जेव्हा ते कामातून मोकळे होत असत, त्यांना रात्रंदिवस आपले नेमून दिलेले काम करावे लागत असे.

34हे लेव्यांच्या घराण्यांतील प्रमुख होते, जशी त्यांची वंशावळ्यांमध्ये नोंद केली होती. ते यरुशलेमत राहत होते.

35गिबोनचे वडील ईयेल गिबोनात राहत होते. त्याच्या बायकोचे नाव माका होते.

36ईयेल्या ज्येष्ठ मुलाचे नाव अब्दोन. सूर, कीश, बाल, नेर आणि नादाब त्याची आणखी मुले,

37गदोर, अह्यो, जखऱ्या आणि मिकलोथ ही त्याचीच मुले.

38मिकलोथ शिमामाचा पिता होता. तेसुध्दा यरुशलेमेमध्ये आपल्या भाऊबंदाजवळच राहत होते.

39नेर हे कीशाचा पिता होता. कीश शौलाचा पिता होता. शौल योनाथान, मलकी शुवा, अबीनादाब आणि एश्बालाचा पिता होता.

40मरीब्बाल हा योनाथानचा मुलगा. मीखा हा मरीब्बालाचा मुलगा.

41पीथोन, मेलेख आणि तरहेया हे मीखाचे मुलगे.

42आहाज याराचा पिता होता. यारा आलेमेथ, अजमावेथ आणि जिम्री यांचा पिता होता. जिम्रीन मोसाचा पिता होता.

43मोसा बिनाचा पिता होता. बिना रफायाचा पिता होता. रफाया एलासाचा पिता होता. एलासा आसेलाचा पिता होता.

44आसेलाला सहा मुलगे झाले. त्यांची नावे अज्रीकाम, बोखरु, इश्माएल, शाऱ्या, ओबद्या आणि हानान. ही आसेलाची मुले होती.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  1 Chronicles 9 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran