Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  1 Chronicles 4 >> 

1यहूदाच्या मुलांची नावे पेरेस, हेस्रोन, कर्मी, हूर आणि शोबाल.

2शोबालचा मुलगा राया त्याचा मुलगा यहथ. यहथाची मुले अहूमय आणि लहद. सराथी लोक म्हणजे या दोघांचे वंशज होत.

3इज्रेल, इश्मा व इद्बाश ही एटामाची मुले. त्यांच्या बहिणीचे नाव हस्सलेलपोनी होते.

4पनुएलाचा मुलगा गदोर आणि एजेरचा मुलगा हूशा ही हूरची मुले. हूर हा एफ्राथाचा प्रथम जन्मलेला मुलगा आणि बेथलेहेमाचा बाप होता.

5अशूरचा मुलगा तकोवा. तकोवाला दोन बायका होत्या. हेला आणि नारा.

6नाराला अहुज्जाम, हेफेर, तेमनी आणि अहष्टारी हे मुलगे झाले.

7सेरथ, इसहार, एथ्रान हे हेलाचे मुलगे.

8हक्कोसाने आनूब आणि सोबेबा यांना जन्म दिला. हारुमचा मुलगा अहरहेल याच्या घराण्यांचे कुळही कोसच होते.

9याबेस आपल्या भावांपेक्षा फार आदरनीय होता. त्याच्या आईने त्याचे नाव याबेस ठेवले. ती म्हणाली, कारण याच्यावेळी मला असह्य प्रसववेदना झाल्या.

10याबेसने इस्राएलाच्या देवाची प्रार्थना केली. याबेस म्हणाला, “तू खरोखर मला आशीर्वाद दे. माझ्या प्रदेशाच्या सीमा वाढीव. तुझा हात माझ्यावर असू दे; मला हानी होण्यापासून दूर ठेव कारण मला ती सहन करण्याची गरज पडू नये.” आणि देवानेही त्याची प्रार्थना मान्य केली.

11शूहाचा भाऊ कलूब. कलूबचा मुलगा महीर. महीरचा मुलगा एष्टोन.

12बेथ-राफा, पासेहा आणि तहिन्ना ही एष्टोनची मुले. तहिन्नाचा मुलगा ईर-नाहाश. हे रेखा येथील लोक होत.

13अथनिएल आणि सराया ही कनाजची मुले. हथथ आणि म्योनोथाय ही अथनिएलाची मुले.

14म्योनोथायने अफ्राला जन्म दिला आणि सरायाने यवाबला जन्म दिला. यवाब हा गे-हराशीम कारागिरांचा मूळपुरुष होय. तेथील लोक कुशल कारागीर असल्यामुळे त्यांनी हे नाव घेतले.

15यफुन्ने याचा मुलगा कालेब. कालेबची मुले म्हणजे इरु, एला आणि नाम. एलाचा मुलगा कनज.

16जीफ, जीफा, तीऱ्या आणि असरेल हे यहल्ललेलचे मुलगे.

17एज्राचे मुलगे येथेर व मरद, येफेर व यालोन. मेरेदाची मिसरी बायकोने मिर्याम, शम्माय आणि एष्टमोवाचा पिता इश्बह यांना जन्म दिला.

18त्याच्या यहूदी बायकोला गदोराचा पिता येरेद, सोखोचा पिता हेबेर आणि जानोहाचा पिता यकूथीएल हे झाले. हे बिथ्याचे मुले होते, फारोची मुलगी बिथ्या जिच्याशी मेरेदाने लग्न केले होते.

19होदीयाची बायको ही नहमाची बहीण होती. हिचे मुलगे गार्मी कईला आणि माकाथी एष्टमोवा यांचे पिता होते.

20अम्नोन, रिन्ना, बेन हानान, तिलोन हे शिमोनचे मुलगे. इशीचे मुलगे जोहेथ आणि बेन-जोहेथ.

21यहूदाचा मुलगा शेला. एर, लादा, कोजेबा योकीम, योवाश आणि साराफ ही शेलाची संतती होती. एर हा लेखाचा पिता.

22लादा मारेशाचा आणि बेथ-अश्बेच्या विणकर घराण्यांचा संस्थापक योवाश आणि साराफ यांनी मवाबी बायकांशी लग्ने केली. त्यानंतर ते बेथलहेमला परतले. फार जुन्या बातमीतून ही नोंद घेतली आहे.

23शेलाचे वंशज हे कुंभार असून ते नेताईम आणि गदेरा येथे राजाच्या चाकरीत होते.

24नमुवेल, यामीन, यारिब, जेरह, शौल हे शिमोनचे मुलगे.

25शौलचा मुलगा शल्लूम. शल्लूमचा मुलगा मिबसाम. मिबसामचा मुलगा मिश्मा.

26मिश्माचा मुलगा हम्मूएल. हम्मूएलचा मुलगा जक्कूर. जक्कूरचा मुलगा शिमी.

27शिमीला सोळा मुलगे आणि सहा मुली होत्या. पण शिमीच्या भावांना फारशी मुले बाळे झाली नाहीत. यहूदातील घराण्यांप्रमाणे त्यांचे घराणे वाढले नाही.

28शिमीच्या वंशजातील लोक बैर-शेबा, मोलादा व हसर-शुवाल,

29बिल्हा, असेम, तोलाद,

30बथुवेल, हर्मा सिकलाग,

31बेथमर्काबोथ, हसर-सुसीम, बेथ-बिरी व शाराइम येथे राहत होते. दावीदाच्या कारकीर्दीपर्यंत ही त्यांची नगरे होती.

32एटाम, अईन, रिम्मोन, तोखेन आणि आशान ही या पाच गावांची नावे.

33बालापर्यंत पसरलेल्या खेड्यापाड्यांमधूनही ते राहत होते. आपल्या वंशावळींची नोंदही त्यांनीच ठेवली.

34त्यांच्या घराण्यातील वडिलाची नांवे मेशोबाब, यम्लेक, अमस्याचा मुलगा योशा,

35योएल, येहू हा योशिब्याचा मुलगा, सरायाचा मुलगा योशिब्या, असिएलचा मुलगा सराया,

36एल्योवेनाय, याकोबा, यशोहाया, असाया, अदिएल, यशीमिएल, बनाया,

37जीजा हा शिफीचा मुलगा. शिफी हा अल्लोनचा मुलगा, अल्लोन यदायाचा मुलगा, यदाया शिम्रीचा मुलगा, आणि शिम्री शमायाचा मुलगा.

38ज्यांची नावे येथे दाखल केली आहेत ते सर्व आपआपल्या कुळांचे प्रमुख होते. त्यांच्या घराण्याची झपाटयाने वाढ झाली.

39ते खोऱ्याच्या पूर्वेला गदोरच्या सीमेबाहेरही जाऊन पोहोंचले. आपल्या कळपांना चरायला कुरण हवे म्हणून जमिनीच्या शोधात ते गेले.

40त्यांना विपुल व चांगली कुरणे मिळाली. तो देश मोठा असून शांत व स्वस्थ होता. हामाचे वंशज पूर्वी या भागात राहत असत.

41हिज्कीया यहूदाचा राजा होता त्यावेळची ते लोक गदोरपर्यंत आले आणि हामच्या लोकांशी त्यांनी लढाई केली. हामच्या लोकांच्या राहुट्या त्यांनी उद्ध्वस्त केल्या. तेथे राहणाऱ्या मूनी लोकांनाही त्यांनी ठार केले. आजही या भागात मूनी नावाचे लोक आढळत नाहीत. तेव्हा या लोकांनी तेथे वस्ती केली. मेंढरांसाठी कुरण असल्याने ते तेथे राहिले.

42शिमोनाच्या घराण्यातील पाचशे माणसे सेईर डोंगरावर त्याच्या नेत्याबरोबर गेली. इशीचे मुलगे पलटया, नाऱ्या, रफाया आणि उज्जियेल हे होते.

43काही अमालेकी लोकांचा त्यातूनही निभाव लागला ते तेवढे अजून आहेत. त्यांना शिमोन्यांनी ठार केले. तेव्हापासून सेईरमध्ये अजूनही शिमोनी लोक राहत आहेत.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  1 Chronicles 4 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran