Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  1 Chronicles 5 >> 

1रऊबेन इस्राएलाचा थोरला मुलगा होता. पण त्याने आपल्या वडीलांचे अंथरूण अशुध्द केले म्हणून त्याच्या जेष्ठपणाचे अधिकार योसेफाच्या मुलांना दिले. म्हणून थोरला मुलगा म्हणून त्याची नोंद नाही.

2यहूदा आपल्या भावांपेक्षा पराक्रमी होता आणि पुढारीपण त्याच्यापासून आले. पण ज्येष्ठपणाचे अधिकार योसेफाला मिळाले होते.

3इस्त्राएलाचा थोरला मुलगा रऊबेनचे मुलगे हनोख, पल्लू, हस्रोन आणि कर्मी.

4योएलचे वंशज हे होते: योएलचा मुलगा शमाया होता. शमायाचा मुलगा गोग होता. गोगचा मुलगा शिमी होता.

5शिमीचा मुलगा मीखा होता. मीखाचा मुलगा राया होता. रायाचा मुलगा बाल होता.

6बालचा मुलगा बैरा होता. अश्शूरचा राजा तिल्गथ-पिल्नेसर याने कैद केले. बैरा रऊबेन वंशाचा नेता होता.

7योएलचे भाऊ आणि त्यांची घराणी यांची नोंद वंशावळींच्या नोंदीवरुनच येथे केली आहे. ईयेल मुख्य, जखऱ्या,

8योएलचा मुलगा शमा याचा मुलगा आजाज याचा मुलगा बेला. नबो आणि बाल मौन येथपर्यंत ते अरोएर राहत होते.

9फरात नदीच्या जवळ अगदी पूर्वेला वाळवंटाच्या कडेपर्यंत त्यांनी वस्ती केली होती. कारण गिलाद प्रांतात त्यांच्या गुरेढोरांची फार वाढ झाली होती.

10शौलाच्या कारकीर्दीत बेलाच्या लोकांनी हगरी लोकांशी लढाई करून त्यांचा पराभव केला. ते गिलादच्या पूर्वेकडील सर्व देशात त्यांच्याच तंबूत राहिले.

11त्यांच्या जवळच गाद घराण्यातील लोक बाशान प्रांतात सलका येथपर्यंत राहत होते.

12योएल हा बाशानाला मुख्य नायक होता. दुसरा शाफाम. मग यानय व शाफाट.

13त्यांच्या वडिलांच्या घराण्यातले त्यांचे नातलग मीखाएल, मशुल्लाम, शबा, योरय, याकान, जीया आणि एबर हे सात.

14हे अबीहईलचे वंशज. अबीहईल हूरीचा मुलगा. हूरी यारोहाचा मुलगा आणि यारोहा गिलादचा. गिलाद मीखाएलचा. मीखाएल यशीशायाचा मुलगा. यशीशाया यहदोचा मुलगा. यहदो बूजाचा मुलगा.

15अही हा अब्दीएलचा मुलगा. अब्दीएल गूनीचा मुलगा. अही हा त्या घराण्याचा प्रमुख.

16ते गिलादात व बाशानाच्या गावात, शारोनच्या कुरणात आपल्या सीमात राहत होते.

17यहूदाचा राजा योथाम याच्या दिवसात आणि इस्त्राएलाचा राजा यराबाम यांच्या दिवसात या सर्वाची मोजणी वंशावळ्यांवरून झाली होती.

18मनश्शेच्या वंशातील अर्धे लोक आणि रऊबेनी व गादी लोकांमधून ढाली, तलवारी, धनुष्य-बाण चवेचाळीस हजार सातशे साठ सैनिक युध्द शिक्षण घेतलेले होते.

19हगरी, यतूर, नाफीश, नोदाब या लोकांशी त्यानी लढाया केल्या.

20आणि ते त्यांच्याशी लढत असता त्यांना साहाय्य मिळाले तेव्हा हगरी व त्यांच्याबरोबरच्या सर्व लोकांचाही त्यांनी पराभव केला. कारण त्यांनी लढाईच्या वेळी देवाला हाक मारली व त्यांनी त्याच्यावर भरवंसा ठेवला होता म्हणून त्याने त्यांना प्रतिसाद दिला.

21त्यांनी त्यांची जनावरे यासह, पन्नास हजार उंट, दोन लाख पन्नास हजार मेंढरे, दोन हजार गाढवे आणि एक लाख माणसे मिळवले.

22पुष्कळ शत्रू मारले गेले कारण देव त्यांच्यासाठी लढला. त्यांना कैद करून नेईपर्यंत ते तिथेच राहिले.

23बाशानपासून बाल-हर्मोन, सनीर आणि हर्मोन डोंगर येथपर्यंत मनश्शेच्या अर्ध्या वंशातील लोकांनी वस्ती केली. तेथे त्यांची संख्या बरीच वाढली.

24मनश्शेच्या घराण्याचे प्रमुख, एफेर, इशी, अलीएल, अज्रीएल, यिर्मया, होदव्या, यहदीएल, हे सर्व बलवान, धैर्यवान आणि प्रसिध्द पुरुष, आपापल्या घराण्यांचे ते पुढारी होते.

25पण ते आपल्या पूर्वजांच्या देवाशी अविश्र्वासू राहिले. देवाने त्यांच्यासमोर ज्यांना नष्ट केले होते त्या देशाच्या लोकांच्या देवतांचीच त्यांनी उपासना केली.

26इस्राएलाच्या देवाने अश्शूरचा राजा पूल व तिल्गथ पिल्नेसर याना इर्षेला पेटवले. त्याने मनश्शेचा अर्धा वंश, रऊबेन आणि गाद घराण्यातील लोकांना कैद केले. त्यांना हलह, हाबोर, हारा आणि गोजान नदीजवळ आणले. तेव्हापासून आजपर्यत ते तेथे राहत आहेत.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  1 Chronicles 5 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran