Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  1 Chronicles 3 >> 

1आणि हेब्रोनात दावीदाच्या मुलांचा जन्म ती ही होते. अहीनवाम इज्रेलकरीण हिजपासून अम्रोन हा जेष्ठ; अबीगईल कर्मेलकरीण हिचा मुलगा दानीएल हा दुसरा,

2गश्शूरचा राजा तलमय याची मुलगी माका हिचा मुलगा अबशालोम हा तिसरा मुलगा, हग्गीथचा मुलगा अदोनीया हा चवथा.

3अबीटलचा मुलगा शफाट्या हा पाचवा. दावीदाची पत्नी एग्ला हिचा इथ्रम हा सहावा.

4दावीदाच्या या सहा मुलांचा जन्म हेब्रोन येथे झाला. दावीदाने तेथे साडेसात वर्षे राज्य केले. यरुशलेम येथे त्याने तेहतीस वर्षे राज्य केले.

5तिथे जन्मलेली दावीदाची मुले बथशूवाला चार मुलगे झाले. बथशूवा अम्मीएलची मुलगी. शिमा, शोबाब, नाथान आणि शलमोन हे तिचे मुलगे.

6इतर नऊ मुलगे इभार, अलीशामा, एलीफलेट,

7नोगा, नेफेग, याफीय,

8अलीशामा, एल्यादा, एलीफलेट.

9ही दावीदाची मुले होती, त्यात त्याच्या उपपत्नीपासून झालेल्या मुलांच्या नावाचा समावेश केलेला नाही. तामार ही त्यांची बहिण होती.

10शलमोनाचा मुलगा रहाबाम होता. रहाबामाचा मुलगा अबीया होता. अबीयाचा मुलगा आसा. आसाचा मुलगा यहोशाफाट.

11यहोशाफाटाचा मुलगा योराम. योरामचा मुलगा अहज्या होता. अहज्याचा मुलगा योवाश होता.

12योवाशचा मुलगा अमस्या होता. अमस्याचा मुलगा अजऱ्या होता. अजऱ्याचा मुलगा योथाम होता.

13योथामचा मुलगा आहाज होता. आहाजचा मुलगा हिज्कीया, हिज्कीयाचा मुलगा मनश्शे.

14मनश्शेचा मुलगा आमोन होता, आमोनचा मुलगा योशीया होता.

15योशीयाचे मुलगे थोरला योहानान, दुसरा यहोयाकीम. तिसरा सिद्कीया, चवथा शल्लूम.

16यहोयाकीमचे मुलगे यखन्या आणि त्याचा मुलगा सिद्कीया होता.

17यखन्याला बाबिलोनमध्ये कैद केल्यानंतर त्याला झालेल्या मुलांची नावे शलतीएल,

18मल्कीराम, पदाया, शेनस्सर, यकम्या, होशामा व नदब्या.

19पदायाचे मुलगे जरुब्बाबेल, शिमी. जरुब्बाबेलचे मुलगे मशुल्लाम आणि हनन्या. शलोमीथ ही त्यांची बहिण होती.

20जरुब्बाबेलाला आणखीही पाच मुले होती. हशूबा, ओहेल, बरेख्या, हसद्या, यूशब-हेसेद ही ती होत.

21पलट्या हा हनन्याचा मुलगा आणि पलट्याचा मुलगा यशया, यशयाचा रफाया, रफायाचा अर्णान. अर्णानचा मुलगा ओबद्या. ओबद्याचा मुलगा शखन्या.

22शखन्याचे वंशज शमाया, शमायाचे सहा मुलगे शमाया, हट्टूश, इगाल, बाहीहा, नाऱ्या आणि शाफाट.

23नाऱ्याला तीन मुलगे एल्योवेनय, हिज्कीया आणि अज्रिकाम.

24एल्योवेनयला सात मुलगे होते. त्यांची नावे होदव्या, एल्याशीब, पलाया, अक्कूब, योहानान, दलाया, अनानी.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  1 Chronicles 3 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran