Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  1 Chronicles 2 >> 

1ही इस्त्राएलाची मुले होती, रऊबेन, शिमोन, लेवी, यहूदा, इस्साखार, जबुलून,

2दान, योसेफ, बन्यामीन, नफताली, गाद व आशेर.

3एर, ओनान व शेला, ही यहूदाची मुले. बथ शूवा या कनानी स्रीपासून त्याला झाली. यहूदाचा प्रथम जन्मलेला मुलगा एर हा परमेश्वराच्या दृष्टीने वाइट होता त्यामुळे एरला त्याने मारुन टाकले.

4यहूदाची सून तामार हिला पेरेस आणि जेरह हे मुलगे झाले. यहूदाचे हे पाच मुलगे होते.

5हेस्त्रोन आणि हामूल हे पेरेसचे मुलगे होते.

6जेरहला पाच मुलगे होते. ते म्हणजे जिम्री, एथान, हेमान, कल्कोल व दारा.

7जिम्रीचा मुलगा कर्मी. कर्मीचा मुलगा आखार, त्याने देवाच्या समर्पित वस्तूंची चोरी केली आणि इस्राएलांवर संकटे आणली.

8एथानाचा मुलगा अजऱ्या होता.

9यरहमेल, राम आणि कालेब हे हेस्रोनचे मुलगे होते.

10अम्मीनादाब हा रामचा मुलगा. अम्मीनादाब हा नहशोनचा पिता. नहशोन हा यहूदाच्या लोकांचा नेता होता.

11नहशोनचा मुलगा सल्मा. बवाज हा सल्माचा मुलगा.

12बवाज ओबेदाचा पिता झाला आणि ओबेद इशायाचा पिता झाला.

13इशायाचा ज्येष्ठ पुत्र अलीयाब, दुसरा अबीनादाब आणि तिसरा शिमा,

14चवथा नथनेल, पाचवा रद्दाय,

15सहावा ओसेम, सातवा दावीद यांचा पिता झाला.

16सरुवा आणि अबीगईल या त्यांच्या बहिणी अबीशय, यवाब आणि असाएल हे तिघे सरुवाचे मुलगे होते.

17अमासाची आई अबीगईल अमासाचे वडील येथेर हे इश्माएली होते.

18हेस्रोनचा मुलगा कालेब, यरियोथची मुलगी अजूबा ही कालेबची बायको. या दोघांना मुले झाली येशेर, शोबाब आणि अदोन हे अजूबाचे मुलगे.

19अजूबा मेल्यानंतर कालेबने एफ्राथ हिच्याशी लग्र केले. त्यांना मुलगा झाला. त्याचे नाव हूर.

20हूरचा मुलगा उरी. ऊरीचा मुलगा बसालेल.

21नंतर हेस्रोनने, वयाच्या साठाव्या वर्षी माखीरच्या मुलीशी लग्न केले. माखीर म्हणजे गिलादचे वडील त्याच्यापासून तिला सगूब झाला.

22सगूबचा मुलगा याईर. याईरची गिलाद प्रांतात तेवीस नगरे होती.

23पण गशूर आणि अराम यांनी याईर व कनाथ यांची शहरे त्याचप्रमाणे आसपासची साठ शहरेही घेतली. ती सर्व, गिलादचा बाप माखीर याच्या वंशजाची होती.

24हेस्रोन हा कालेब एफ्राथ येथे मृत्यू पावल्यानंतर त्याची बायको अबीया हिच्या पोटी तिला तकोवाचा बाप अश्शूर हा झाला.

25यरहमेल हा हेस्रोनचा प्रथम जन्मलेला मुलगा. राम, बुना, ओरेन, ओसेम व अहीया ही यरहमेलची मुले होती.

26यरहमेलला दुसरी बायको होती, तिचे नाव अटारा. ती ओनामची आई होती.

27यरहमेलाचा प्रथम जन्मलेला मुलगा राम याचे मुलगे मास, यामीन आणि एकर हे होत.

28शम्मय व यादा हे ओनामचे मुलगे. नादाब आणि अबीशूर हे शम्मयचे मुलगे.

29अबीशूराच्या बायकोचे नाव अबीहाईल. त्यांना अहबान आणि मोलीद ही दोन मुलगे झाले.

30सलेद आणि अप्पईम हे नादाबचे मुलगे. यापैकी सलेद मुले न होताच मेला.

31अप्पईमचा मुलगा इशी. इशीचा मुलगा शेशान. शेशानचा मुलगा अहलय.

32शम्मयचा भाऊ यादा याला येथेर आणि योनाथान हे दोन मुलगे होते. येथेर मुले बाळे न होताच मेला.

33पेलेथ आणि जाजा हे योनाथानचे मुलगे, ही यरहमेलची वंशावळ होती.

34शेशानला मुलगे नव्हते, फक्त मुली होत्या. शेशानकडे मिसरचा एक नोकर होता. त्याचे नाव यरहा.

35शेशानने आपली मुलगी आपल्या सेवक यरहाला त्याची बायको म्हणून करून दिली. तिच्या पोटी त्याला अत्ताय झाला.

36अत्ताय नाथानाचा पिता झाला आणि नाथान जाबादाचा पिता झाला.

37जाबाद एफ्‌लालचा पिता झाला, एफलाल हा ओबेदचा पिता झाला.

38ओबेद येहूचा पिता झाला, येहू अजऱ्याचा पिता झाला.

39अजऱ्या हेलसचा पिता झाला. आणि हेलस एलासाचा पिता झाला.

40एलास सिस्मायाचा पिता झाला, सिस्माय शल्लूमचा पिता झाला.

41शल्लूम यकम्याचा पिता झाला, यकम्या अलीशामाचा पिता झाला.

42यरहमेलाचा भाऊ कालेब याचे मुलगे. त्यापैकी मेशा हा प्रथम जन्मलेला. मेशाचा मुलगा जीफ. मारेशाचा मुलगा हेब्रोन.

43कोरह, तप्पूर, रेकेम आणि शमा हे हेब्रोनचे मुलगे.

44शमाने रहम याला जन्म दिला, रहमचा मुलगा यकर्म. रेकेमचा मुलगा शम्मय,

45शम्मयचा मुलगा मावोन. मावोन हा बेथसूरचा पिता.

46कालेबला एफा नावाची उपपत्नी होती. तिला हारान, मोसा, गाजेज ही मुले झाली. हारान हा गाजेजचा पिता.

47रेगेम, योथाम, गेशान, पेलेट, एफा व शाफ हे यहदायचे मुलगे.

48माका ही कालेबची उपपत्नी हिला शेबेर आणि तिऱ्हना हे मुले झाली.

49तिला मद्यानाचा पिता शाफ आणि मखबेना व गिबा यांचा पिता शवा हे ही तिला झाले. अखसा ही कालेबची मुलगी. ही कालेबची वंशावळ होती.

50एफ्राथेचा प्रथम जन्मलेला मुलगा होर याचे मुले. किर्याथ-यारीमाचा पिता शोबाल,

51बेथलहेमचा पिता सल्मा आणि बेथ-गादेरचा पिता हारेफ.

52किर्याथ-यारीमचा पिता शोबाल याचे वंशज हारोवे, मनुहोथमधील अर्धे लोक,

53आणि किर्याथ-यारीममधील घराणी इथ्री, पूथी, शमाथी आणि मिश्राई ही ती होत. त्यापैकी मिश्राईपासून सराथी आणि एष्टाबुली हे झाले.

54सल्माचे वंशज बेथलेहेम व नटोपाथी, अटरोथ-बेथयवाब, अर्धे मानहतकर आणि सारी लोक.

55शिवाय तिराथी, शिमाथी, सुकाथी ही याबेसमध्ये राहणारी लेखकांची घराणी.हे रेखाब घराण्याचा मूळपुरुष हम्मथ याच्या वंशातली केनी लोक होते.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  1 Chronicles 2 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran